नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील पीडितेला ज्या समस्येमुळे या जाळ्यात अडकावे लागले ते कारण समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
नाशिकमधील टीसीएस कंपनीतील प्रकरणात धर्मांतर, लैंगिक शोषण असे प्रकार घडले. हे सगळं पीडित तरुणींना का सहन करावं लागलं त्याची कारणं स्पष्ट झाली आहेत.
कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीने हा सगळा अन्याय सहन केला असे समोर आले आहे. कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरेपीसाठी तिला औषधं आणि पैशांची गरज होती. त्यामुळे पीडिता या कॉर्पोरेट जिहादमधील मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली, अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
अमेरिकी सैन्य जहाजांवर इराणचे ड्रोन हल्ले
ड्रोन आयात प्रकरणी लाचखोरीच्या आरोपावरून DGCA चे उपमहानिदेशक अटकेत
२० हून अधिक जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली
इस्लामाबादमध्ये हाय अलर्ट: मोठी हॉटेल्स बंद, वाहतूक ठप्प
कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला सदर पीडित बळी पडल्याची माहिती आहे. आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नाही, कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी पीडितीने सर्व सहन केले असं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या पीडितेची कहाणी जाणून घेतली.
टीसीएस कंपनीत जाऊन चौकशी पथकाने तब्बल दीड तास चौकशी केली. कंपनीतील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विभाग, कॅन्टीन, वेटींग रूमची केली पाहणी. सलग तिसऱ्या दिवशी महिला आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून गेल्या दोन दिवसापासून झाडाझडती सुरु आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या चार सदस्यीय पथकाने नाशिकच्या या कंपनीत जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि तपास केला.
निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी
नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची होण्याची शक्यता आहे. नाशिक न्यायालयात ही सुनावणी होईल.. गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार आहे. टीसीएस प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांचे पथक निदा खानच्या शोधात आहे.
