दिवंगत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक झाल्यानंतरच अंत्यसंस्कार करू!

सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) संदीप कुमार यांच्या कुटुंबियांची मागणी

दिवंगत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक झाल्यानंतरच अंत्यसंस्कार करू!

रोहतकमधील सायबर सेलमध्ये तैनात असलेले सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) संदीप कुमार यांनी तीन पानांची चिठ्ठी आणि एक व्हिडिओ संदेश मागे सोडत आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठीत दिवंगत आयपीएस वाय पूरन कुमार यांचे नाव लिहित भ्रष्टाचाराचा आरोप केले आहेत. यामुळे आयपीएस वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणाला देखील वेगळे वळण मिळाले आहे. अशातच संदीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी संदीप यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. यामुळे तणाव वाढला आहे.

सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) संदीप कुमार यांच्या कुटुंबाने त्यांचा मृतदेह पोलिसांना देण्यास नकार दिला असून मृतदेह ते त्यांच्या मूळ गावी घेऊन गेले आहेत. संदीप यांच्या मृत्यूप्रकरणी दिवंगत आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्या पत्नी आयएएस अधिकारी अमनीत पुरण कुमार यांना अटक करण्याची मागणी त्यांचे कुटुंब करत आहे.

७ ऑक्टोबर रोजी चंदीगडमध्ये आत्महत्या करून निधन झालेल्या दिवंगत आयपीएस अधिकाऱ्याच्या बंदूकधारीला अटक केल्यानंतर एएसआय संदीप यांचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बंदूकधारीला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कुटुंबीयांचा असा दावा आहे की संदीप यांनी त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांना छळाबद्दल सांगितले होते. “आमचा भाऊ शहीद आहे. भगतसिंग यांनी ज्याप्रमाणे ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला त्याचप्रमाणे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला,” असे संदीप यांचे चुलत भाऊ शिशपाल लाथर म्हणाले. सरकारने वाय पूरन कुमार यांच्या २००० ते ३००० कोटी रुपयांच्या मालमत्तेची चौकशी करावी, असे त्यांनी पुढे म्हटले. पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि जातीच्या राजकारणामुळे संदीप यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबाने मागण्या पूर्ण होईपर्यंत अंतिम संस्कार करण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा..

गोपनीय कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेले एशले टेलिस कोण आहेत?

सिल्क रुटचे पुनरुज्जीवन होणार; भारताची वखान कॉरीडोअरवर नजर

“नेहमी ऑनलाईन येणारे उद्धव ठाकरे आज प्रत्यक्ष मंत्रालयात, पण कामासाठी नाही, तक्रारींसाठी!”

कफ सिरप प्रकरण: लघवी रोखली जाणे, मूत्रपिंड निकामी होण्याचे त्रास; तरीही डॉक्टर औषधं लिहीतच राहिला!

कुटुंबाने सांगितले की, त्यांना संदीपच्या मृत्यूची माहिती टेलिव्हिजनवरील बातम्यांद्वारे मिळाली. संदीप हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रोहतकमध्ये राहत होते. त्यांचे आजोबा १९६५ च्या युद्धांमध्ये लढले होते. त्यांचे वडील पोलिसात इन्स्पेक्टर होते, ज्यांचे निधन झाले आहे. आता संदीप याच्या पश्चात पत्नी, आई, सात वर्षांचा मुलगा आणि दोन मुली आहेत.

मंगळवारी रोहतक- पानिपत रस्त्यावरील एका ट्यूबवेलजवळ एएसआय संदीप कुमार यांचा मृतदेह आढळला. पोलिसांना तीन पानांची एक चिठ्ठी आणि एक व्हिडिओ संदेश सापडला ज्यामध्ये त्यांनी दिवंगत आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या चिठ्ठीत संदीपने दावा केला की त्यांना चालू असलेल्या तपासासंदर्भात अटक होण्याची भीती आहे आणि ते म्हणाले की ते निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यासाठी” आपले जीवन अर्पण करत आहेत.

Exit mobile version