कोल्ड्रिफ कफ सिरप मृत्यू प्रकरणासंदर्भात अटक करण्यात आलेल्या बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना मध्य प्रदेशातील जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला आहे. प्रवीण सोनी यांनी औषध लिहून देण्यासाठी औषध कंपनीकडून १०% कमिशन घेतल्याचे पोलिसांनी कोर्टाला सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सोनी आणि इतर अनेक डॉक्टरांनी हे सिरप सेवन केलेल्या मुलांना लघवी रोखण्याचा आणि मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंतीचा त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतरही ते लिहून देणे सुरू ठेवले होते.
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, डॉ. सोनी यांनी कोल्ड्रिफ सिरप लिहून देण्यासाठी संबंधित औषध कंपनीकडून १०% कमिशन घेतल्याची कबुली दिली आहे. कोर्टाला माहिती देण्यात आली की कोल्ड्रिफ लिहून दिल्यानंतर किमान सात मुलांचा मृत्यू झाला आहे, तर इतर सहा जणांवर रुग्णालयात मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे उपचार सुरू आहेत.
तपासादरम्यान असं निष्पन्न झालं आहे की २४ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबर या कालावधीत डॉ. प्रवीण सोनी यांनी पाच वर्षांखालील अनेक बालकांना कोल्ड्रिफ सिरप लिहून दिलं. हे करत असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या २०२३ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार हे औषध चार वर्षांखालील मुलांसाठी निषिद्ध असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. तरीही, या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून डॉ. सोनी यांनी औषध देणं सुरूच ठेवलं, असं तपासात आढळून आलं आहे.
न्यायालयाने ८ ऑक्टोबर रोजीच्या आपल्या आदेशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या २०२३ च्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ दिला, ज्यात स्पष्टपणे इशारा देण्यात आला होता की कोल्ड्रिफ सारखी फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लिहून देऊ नयेत.
आता जपानमध्येही यूपीआयद्वारे पेमेंट्स करता येणार
घाणेरड्या टॉयलेटची माहिती द्या, FASTag वर ₹१००० मिळवा
बिहार विधानसभा निवडणूक: भाजपकडून बिहार निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
दिल्लीत चिनी नेटवर्कशी जोडलेला आरोपी अटक
विषारी संयुग आढळले, एफआयआर नोंदवला
कोल्ड्रिफ सिरपच्या नमुन्यांमध्ये इथिलीन ग्लायकोल या विषारी रसायनाची उपस्थिती प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये आढळल्यानंतर पोलिसांनी ४ ऑक्टोबर रोजी एफआयआर नोंदवला. तपासकर्त्यांनी सांगितले की मूत्रपिंड निकामी होण्याच्या घटना आणि मृत्यूंसाठी हा पदार्थ जबाबदार असण्याची शक्यता आहे.
पुरवठा साखळी, कंपनीचे अधिकारी आणि आर्थिक प्रोत्साहनासाठी औषधाची जाहिरात करण्यात सहभागी असलेल्या डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पोलिस आता त्यांचा तपास वाढवत आहेत. कारवाईचा भाग म्हणून मध्य प्रदेश सरकारने आधीच संपूर्ण राज्यात कोल्ड्रिफच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे.







