दिल्लीतील सायबर पोलिस ठाणे, शाहदरा यांनी ५० लाख रुपयांच्या वॉट्सअॅप गुंतवणूक फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याचे चिनी नागरिकांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून आयफोन १३ आणि त्यातील वॉट्सअॅप चॅट्स जप्त केल्या आहेत, ज्यातून या फसवणुकीच्या नेटवर्कचा उलगडा झाला आहे. ही कारवाई शिखा गुप्ता यांच्या तक्रारीवर करण्यात आली. शिखा यांनी सांगितले की, एका विदेशी कंपनीच्या नावाखाली वॉट्सअॅपवर त्यांना बनावट नफा दाखवणारे स्क्रीनशॉट दाखवून गुंतवणुकीसाठी आकर्षित केले गेले. विश्वास ठेवून त्यांनी आपल्या बँक खात्यातून २.९० लाख रुपये जमा केले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान पोलिसांनी बँक खात्याचे KYC तपशील मिळवले, ज्यामध्ये ५० हजार रुपये जमा असल्याचे आढळले. बँकेने नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाची माहिती दिली. त्यानंतर इन्स्पेक्टर विजय कुमार (एसएचओ/सायबर शाहदरा) यांच्या नेतृत्वाखाली, एसीपी मोहिंदर सिंग यांच्या देखरेखीखाली एक तपास पथक तयार करण्यात आले. या पथकात एसआय पुष्पेंद्र पांडे, एसआय विवेक यादव, एचसी विक्रांत शर्मा, एससीटी सचिन साहलोत आणि विकास कुमार यांचा समावेश होता.
हेही वाचा..
कोविडने बाधित वडिलांच्या मुलांच्या मेंदूवर होऊ शकतो परिणाम
मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानने केले मदतीसाठी आवाहन
तालिबानने पाकिस्तानी चौक्यांवर एकाच वेळी कसा केला हल्ला?
२०२७ चा क्रिकेट वर्ल्डकप विराट, रोहित खेळणार?
टीमने बँक व्यवहार, IP लॉग आणि वॉट्सअॅप चॅट्सचे विश्लेषण केले. त्यानंतर उत्तराखंडमध्ये छापा टाकून आरोपी राजीब दत्ता याला अटक करण्यात आली. तो मोबाइल क्रमांकाद्वारे खात्याचे संचालन करत होता. त्याच्याकडून आयफोन १३ जप्त करण्यात आला असून, त्यातील वॉट्सअॅप चॅट्समध्ये चिनी नागरिकांसोबतच्या आर्थिक व्यवहारांबद्दल आणि कमिशनविषयक संभाषणाचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा मोठ्या आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेटचा एक भाग आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, इतर साथीदारांची ओळख, पैशाचा स्रोत आणि ठकवलेली रक्कम परत मिळवणे या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल पुराव्यांचे विश्लेषणही सुरू आहे.



