बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी भाजपाने मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचा समावेश आहे. चौधरी यांना तारापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सिन्हा लखीसरायमधून निवडणूक लढवतील.
२४३ जागांच्या बिहार विधानसभेसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे आणि निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाटणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावे औपचारिकपणे जाहीर केली. एनडीएचा एक प्रमुख घटक म्हणून, भाजप यावेळी जनता दल (संयुक्त) आणि इतर मित्रपक्षांसोबत युती करून निवडणूक लढवेल. एनडीएमधील जागावाटप व्यवस्थेनुसार, भाजप यावेळी १०१ जागांवर निवडणूक लढवेल.
विधानसभा निवडणुकीत भाजप ज्या १०१ जागांवर निवडणूक लढवत आहे, त्यापैकी पहिल्या यादीत ७१ विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे आहेत. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूरमधून तर विजय सिन्हा हे लखीसरायमधून निवडणूक लढवतील. इतर काही महत्त्वाच्या नावांमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते राम कृपाल यादव दानापूरमधून, प्रेम कुमार गया येथून, माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद कटिहारमधून, आलोक रंजन झा सहरातून आणि मंगल पांडे सिवानमधून निवडणूक लढवणार आहेत. माजी मंत्री रेणू देवी यांना बेतिया येथून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP releases first list of 71 candidates for Bihar Assebly elections. Deputy CM Samrat Choudhary to contest from Tarapur, Deputy CM Vijay Kumar Sinha from Lakhisarai, State Minister Nitin Nabin from Bankipur and Renu Devi to contest from Bettiah. pic.twitter.com/brXr2q2Ym7
— ANI (@ANI) October 14, 2025
हे ही वाचा :
२०२७ चा क्रिकेट वर्ल्डकप विराट, रोहित खेळणार?
एआय हब स्थापनेसाठी गुगलकडून अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी गुंतवणूक भारतात!
बालकांच्या मृत्यूनंतर भारतात ‘या’ तीन खोकल्याच्या सिरपविरुद्ध WHO चा इशारा
ग्वाल्हेरमध्ये एअरबेसजवळ १२ वर्षांपासून राहत होते बांग्लादेशी घुसखोर; ८ जणांना अटक!
बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे ६ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.४३ कोटी आहे, ज्यामध्ये सुमारे १४ लाख पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदान मध्य बिहारमधील १२१ मतदारसंघांमध्ये होईल, ज्यामध्ये पूरग्रस्त आणि ग्रामीण भागांचा समावेश असेल. ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात सीमावर्ती भागातील १२२ मतदारसंघांमध्ये मतदान होईल.







