मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील महाराजपूरा एअरफोर्स स्टेशनजवळ ८ बांग्लादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण मागील १२ वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. हे लोक त्या परिसरात भाड्याने घर घेऊन राहत होते. हरियाणाच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पानीपत येथून सुरुवात, ग्वाल्हेरपर्यंत धागेदोरे
एक आठवड्यापूर्वी हरियाणा पोलिसांनी पानीपत येथून काही बांग्लादेशी घुसखोरांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांची माहिती समोर आली. यानंतर हरियाणा पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना माहिती दिली आणि हरियाणाची एक टीम ग्वाल्हेरमध्ये पोहोचली. त्यानंतर या ८ घुसखोरांना अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्वजण एका कुटुंबातील आहेत. मोहम्मद शरीफ (४० ), सीलिमा (२५ ), रफीक (१४), चुमकी,अदोरी, आशिक, रातुल शेख, उजा, अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व जण बांग्लादेशातील जेस्सोर शहराचे रहिवासी आहेत. चौकशीत समोर आले की, मोहम्मद शरीफ यांचे वडील ‘नूर’ भारतात सर्वप्रथम आले होते. नूर यांचा मृत्यू बावडीमध्ये पडून झाला आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब ग्वाल्हेरमध्ये स्थायिक झाले.
हे ही वाचा :
आयपीएस अधिकारी आत्महत्या प्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक सक्तीच्या रजेवर
पाक पंतप्रधानांसमोरच ट्रम्प म्हणाले, “मोदींनी चांगले काम केले…” पुढे काय झाले?
कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा
रातुल शेखने पोलिसांना सांगितले की, त्याने पाच वर्षांपूर्वी ₹४००० देऊन बांग्लादेशची सीमा पार केली होती आणि तेव्हापासून तो इथे राहत आहे.







