27.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषगडचिरोली: माओवादीचा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लौजुलाने शस्त्रे टाकली!

गडचिरोली: माओवादीचा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लौजुलाने शस्त्रे टाकली!

इतर ६० जणही आले शरण

Google News Follow

Related

गडचिरोली मधून मोठी बातमी समोर आली आहे. सीपीआय/माओवादीचे पॉलिट ब्युरो सदस्य मल्लौजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. तसेच त्याच्यासोबत अंदाजे ६० माओवादी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील शस्त्र समर्पित केले आहेत. ही घटना माओवादीसाठी मोठा धक्का मानली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्य सरकारांच्या नेतृत्वाखाली देशभरात पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नक्षली कमकुवत झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते आत्मसमर्पण करत आहेत. सप्टेंबरमध्ये नक्षली सोनूने शस्त्रे टाकण्याचे संकेत देणारी एक प्रेस रिलीज जारी केली होती. छत्तीसगड आणि देशातील इतरत्र मोठ्या प्रमाणात माओवादी सदस्यांचाही त्याला पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे तो छत्तीसगड किंवा तेलंगनामध्ये तो आत्मसमर्पण करेल अशी माहिती समोर आली होती. मात्र, त्याने आत्मसमर्पणासाठी गडचिरोलीची निवड केली आणि आपल्यासह ६० जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.

दरम्यान, उर्वरित नक्षल्यांची नावे आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेवून सर्व माहिती सादर करतील अशी माहिती आहे.

हे ही वाचा :

ग्वाल्हेरमध्ये एअरबेसजवळ १२ वर्षांपासून राहत होते बांग्लादेशी घुसखोर; ८ जणांना अटक!

आयपीएस अधिकारी आत्महत्या प्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक सक्तीच्या रजेवर

पाक पंतप्रधानांसमोरच ट्रम्प म्हणाले, “मोदींनी चांगले काम केले…” पुढे काय झाले?

कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा