जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LOC) लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. ही चकमक माछिल आणि दुदनियाल भागात झाली. सध्या या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी, लष्कराने माहिती दिली की कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. जवानांनी संध्याकाळी ७ वाजता गोळीबार केला. परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली.
माहितीनुसार, माछिल नियंत्रण रेषेजवळ सैन्याला संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यामुळे तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. सैन्यदलाने संशयित घुसखोरांना आव्हान दिले त्यानंतर गोळीबार झाला. “जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये, भारतीय लष्कराच्या जवानांना नियंत्रण रेषेवर काही संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यांनी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हालचालींवर गोळीबार केला. परिसरात कारवाई सुरू आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे,” असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी, कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एक जुना तोफगोळा शोधून तो सुरक्षितपणे निकामी केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी संध्याकाळी हिरानगर सेक्टरमधील करोल मथुरा सीमावर्ती गावातील एका शेतातून हा तोफगोळा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि तोफगोळा सुरक्षितपणे निकामी करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा..
बिहारच्या जनतेने आता राजदचे हे बघण्याची वेळ आलीय
पॅलेस्टाईनच्या मान्यतेसाठी इस्रायली संसदेत ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी
देवाभाऊ देवासारखे धावले; दुबईत नोकरीसाठी गेलेल्या मुलाचे अंतिम दर्शन आईवडिलांना घडले
इस्रायली अपहृतांची अखेर दोन वर्षांनी सुटका
हिवाळ्यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आपली दक्षता वाढवली आहे, कारण या काळात सीमापार घुसखोरीचे प्रयत्न वाढण्याची अपेक्षा आहे. एका वरिष्ठ बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर माहितीवरून असे दिसून येते की दहशतवादी सीमेपलीकडे असलेल्या विविध लाँच पॅडवर खोऱ्यात घुसखोरी करण्यासाठी वाट पाहत आहेत. ते म्हणाले, हिवाळ्यापूर्वी घुसखोरीचे प्रयत्न वाढतात असे सामान्यतः दिसून येते. हे लक्षात घेऊन, आम्ही आमच्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना सतर्क ठेवले आहे आणि सीमेवर सतर्कता वाढवली आहे. अचूक संख्या सांगणे कठीण आहे, परंतु आमच्याकडे असलेल्या अहवालांनुसार, आमचा शेजारी देश दहशतवाद्यांना घुसखोरी सुलभ करण्यासाठी सीमेपलीकडे काही लाँच पॅड बांधत आहे.







