वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांचे मृत्यू प्रकरण चर्चेत असतानाचं रोहतकमधील सायबर सेलमध्ये तैनात असलेल्या हरियाणाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने तीन पानांची चिठ्ठी आणि एक व्हिडिओ संदेश मागे सोडला असून ज्यामध्ये त्याने भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) संदीप कुमार यांचा मृतदेह रोहतक-पानिपत रस्त्यावरील एका ट्यूबवेलजवळ आढळला. पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ संदेशाची तपासणी केली जात आहे. त्यांच्या चिठ्ठीत, एएसआयने आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पूरण कुमार हे भ्रष्ट अधिकारी होते. त्यांच्याविरुद्ध भरपूर पुरावे आहेत, असे चिठ्ठीत म्हटले आहे. “निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यासाठी मी माझे जीवन अर्पण करत आहे. या भ्रष्ट कुटुंबाला सोडता कामा नये,” असे चिठ्ठीत अधिकाऱ्याने लिहिले आहे.
व्हिडिओमध्ये शर्मा यांनी आरोप केला आहे की, जातीचे राजकारण आणि भ्रष्टाचाराने विभागात खोलवर संसर्ग झाला आहे. “ज्या दिवशी हा दुसरा अधिकारी नियुक्त झाला, त्या दिवशी त्याने जातीचे राजकारण करायला सुरुवात केली आणि लोकांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली. त्याने स्वतःच्या भ्रष्ट लोकांना नियुक्त केले. हे भ्रष्ट लोक नंतर फाईल्स पाहू लागले आणि चुका शोधू लागले – कारकुनी इत्यादी – आणि नंतर संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यावर अत्याचार केले आणि पैसे उकळले. महिला पोलिस अधिकाऱ्यांना बदलीची धमकी देण्यात आली आणि त्यांचा विनयभंग करण्यात आला,” असे ते म्हणाले.
हेही वाचा..
घाणेरड्या टॉयलेटची माहिती द्या, FASTag वर ₹१००० मिळवा
बिहार विधानसभा निवडणूक: भाजपकडून बिहार निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
विद्यार्थिनीला हिजाब घालू न दिल्याने पालक शाळेत घुसले
दिल्लीत चिनी नेटवर्कशी जोडलेला आरोपी अटक
५२ वर्षीय आयपीएस अधिकारी वाय पुरण कुमार यांच्या चंदीगडमधील सेक्टर ११ येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आलेल्या मृत्यूच्या चौकशीदरम्यान ही ताजी आत्महत्या घडली आहे. रोहतकच्या सुनारिया येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात तत्कालीन महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कुमार यांनी त्यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पुरण कुमार जपानच्या अधिकृत दौऱ्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये डीजीपी शत्रुजीत कपूर आणि रोहतकचे माजी एसपी नरेंद्र बिजर्निया यांच्यासह आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे घेतली होती आणि त्यांच्यावर छळ, जाती-आधारित भेदभाव याचे आरोप केले होते. आता एएसआयने केलेल्या नवीन आरोपांमुळे कुमारच्या मृत्यू प्रकरणातील चालू तपास आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.







