मोबाईलवर जोरजोरात बोलण्यावरून एकाची हत्या

तपास सुरू, आरोपी अटकेत

मोबाईलवर जोरजोरात बोलण्यावरून एकाची हत्या

NEW DELHI, INDIA - 2020/07/29: In this photo illustration, a boy playing PUBG (PlayerUnknown's Battlegrounds) on his smartphone. Indian government is considering a ban on the battle royale format games over data security concerns. (Photo Illustration by Ajay Kumar/SOPA Images/LightRocket via Getty Images)

मोबाईल फोनवर जोरजोराने बोलण्यावरून झालेल्या वादात सहकाऱ्याला इमारतीवरून खाली लोटुन दिल्याची घटना कांदिवली पश्चिम येथे सोमवारी सकाळी समोर आली आहे.या घटनेत गंभीर जखमी झालेला तरुणाचा मृत्यू झाला आहे,
कांदिवली पोलिसांनी एका तरुणावर हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने कांदिवली परिसरात खळबळ उडाली आहे.

जितेंद्र चौहान असे मृत तरुणाचे नाव आहे, अफसर जमिर उद्दीन आलम याला या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कांदिवलीच्या साईबाबा नगर येथील दैवी इंटरनिटी या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सी.जी लाईफस्पेस कंपनीकडून कारपेंटर ( सुतार) काम सुरू आहे. या बाधकाम साईटवर सुतारकाम करणारे १२ ते १३ जण होते. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एका सुपरवायझरची नेमणूक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

जगात अस्तित्वात नसलेले दोन फोन नंबर हाच गुन्ह्याचा पुरावा…

Harihareshwar मनःशांतीचा किनारा

राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत १० दिवसांत उत्तर द्या!

परकोट्यातील शिव मंदिराच्या शिखरावर कलशाची स्थापना

शनिवारी रात्री काम आटोपून जेवण करून सर्वजण दुसऱ्या मजल्यावर मोकळ्या जागेत आयपीएल क्रिकेट सामने मोबाईलवर बघत बसले होते. त्यावेळी अफसर जमिर हा त्यांच्याकडे आला आणि त्याने जितेंद्र चौहानकडे तंबाखू मागितला. चौहानने त्याला नाही म्हणून सांगितले. रात्री १० वाजता जितेंद्र चौहान हा मोबाईल फोनवर जोरजोरात बोलत होता, त्यावेळी अफसर जमिर त्या ठिकाणी आला आणि त्याने फोनवर ओरडून बोलू नको, असे जितेंद्रला सांगितल्यावर दोघात वाद झाला. इतर कामगारांनी दोघांचा वाद सोडवला.

जितेंद्र चौहान हा इमारतीच्या कट्ट्याजवळ उभा असताना अफसर त्या ठिकाणी आला आणि त्याने जितेंद्र चौहानला धक्का देऊन इमारतीवरून खाली लोटले. दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने जितेंद्रच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अफसर जमिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version