अखंड भारत व्यासपीठ व एकात्म विकास परिषद यांच्या माध्यमातून अखंड भारत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड भारताची सांस्कृतिक एकात्मता हा या कार्यक्रमाचा विषय आहे.
बाळासाहेब ठाकरे सभागृह, तीन हात नाका, ज्ञान साधना कॉलेज जवळ, ठाणे येथे १० ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमातील वक्ते असतील-
प्रशांत पोळ (भारत विभाजन का घटनाक्रम)
पुलिंद सामंत (अखंड भारत की सांस्कृतिक एकात्मता)
सदानंद सप्रे (विभाजन कैसे समाप्त किया जा सकता है और उसमे हमारी क्या भूमिका होगी)
सुमंत आमशेकर कार्यक्रमाचा समारोप करतील तर प्रज्ञा प्रवाह पश्चिम क्षेत्र संयोजक सुनील किटकरू यांचेही भाषण होईल.
याच कार्यक्रमात मोहन दिगंबर अत्रे यांच्या हिंदू युवका, उठ पेटुनी या पुस्तकाचे प्रकाशन दु. १२वाजता होईल.
हे ही वाचा:
दिल्लीत मुसळधार पावसात भिंत कोसळून २ मुलांसह ८ जणांचा मृत्यू!
GeM पोर्टलचा मोठा टप्पा पार – ₹१५ लाख कोटींची खरेदी पूर्ण!
निवडणूक आयोगाने फक्त राहुल गांधींशीच चर्चा करावी – आदित्य ठाकरे
पंतप्रधान मोदींचा कर्नाटक दौरा!
कार्यक्रमाचे आयोजन अखंड भारत व्यासपीठचे अध्यक्ष संजय ढवळीकर, एकात्म विकास परिषदेचे विवेक गणपुले, अखंड भारत व्यासपीठाचे कार्यवाह अभय जगताप, कार्याध्यक्ष सुनील ढेंगळे, अ. भा. व्यासपीठाचे संघटक मोहन दिगंबर अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन होत आहे.







