35 C
Mumbai
Tuesday, March 24, 2026
घरधर्म संस्कृतीऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची सिडनीतील मशिदीत उडविली हुर्यो

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची सिडनीतील मशिदीत उडविली हुर्यो

इस्रायलला पाठिंबा देत असल्याबद्दल व्यक्त केला संताप

Google News Follow

Related

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांना रमजान महिन्यानिमित्त सिडनीतील मशिदीत आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान निषेधाचा सामना करावा लागला. अँथनी अल्बानिस आणि गृहमंत्री टोनी बुर्क हे स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ईदच्या नमाजासाठी सिडनीतील लाकेम्बा मशीद येथे उपस्थित होते. ही ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे आणि मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या नेत्यांच्या निमंत्रणावरून ते येथे आले होते.

कार्यक्रमादरम्यान काही उपस्थितांनी त्यांना नरसंहाराचे समर्थक असे संबोधत त्यांची हुर्यो उडविली आणि इथून चालते व्हा  अशा घोषणा दिल्या. या वेळी मशिदीतील एका नेत्याने सरकारने मुस्लिम ऑस्ट्रेलियन नागरिकांशी अधिक संवाद साधावा असे आवाहन करणारे भाषण केले.

ऑस्ट्रेलियातील मुस्लिम समाजामध्ये इस्रायल गाझा युद्धाबाबतच्या सरकारच्या भूमिकेबद्दल आणि देशातील वाढत्या इस्लामोफोबियाबद्दल मोठी नाराजी असल्याचे दिसून येते. एका व्यक्तीने पंतप्रधानांवर जोरात घोषणा देत विरोध केला, त्याला पोलिसांनी मशिदीतून बाहेर काढले. नंतर त्याला कोणताही गुन्हा न नोंदवता सोडण्यात आले आणि पुढे जाण्यास सांगितले, असे वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेसने दिले.

भाषण संपल्यानंतर पंतप्रधान जेव्हा मशिदीतून बाहेर पडत होते, तेव्हाही काही लोकांनी त्यांच्यावर घोषणा देत विरोध सुरूच ठेवला. एका व्यक्तीने “तो इथे का आला आहे? त्याला बाहेर काढा! ही लाजिरवाणी गोष्ट आहे” असे म्हटले. कार्यक्रमानंतर मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या लेबनिझ मुस्लिम असोसिएशनने निवेदन जारी करून सांगितले की, हे पंतप्रधानांचे स्वागत होते आणि ते पुढेही आपली दारं खुली ठेवतील.

निवेदनात म्हटले आहे, “गाझामधील दुःख आणि लेबनॉनमधील विध्वंसामुळे भावना तीव्र आहेत, हे आम्हाला समजते. हे आमच्या समुदायासाठी दूरचे प्रश्न नाहीत. पण आम्हाला हेही स्पष्ट करायचे आहे की, देशाच्या निवडून आलेल्या नेतृत्वाशी संवाद साधणे म्हणजे धोका देणे नाही. उलट, त्यांना आवाज देण्याचा तो मार्ग आहे.”

यानंतर अल्बानिस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मशिदीत उपस्थित ३० हजार पेक्षा अधिक लोकांपैकी बहुसंख्य लोकांनी त्यांचे सकारात्मक स्वागत केले. ते म्हणाले, “एकूण प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता,” असे द गार्डियनच्या ऑस्ट्रेलिया आवृत्तीनुसार त्यांनी सांगितले. काही लोकांचा विरोध हा सरकारने अलीकडेच हिज्ब उत तहरीरसारख्या अतिरेकी संघटनांवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे असू शकतो, असेही त्यांनी सूचित केले.

या आधी, पंतप्रधानांनी सोशल मीडियावर या भेटीबद्दल पोस्ट करत नमाजात सहभागी होणे “सन्मानाची बाब” असल्याचे म्हटले होते आणि उपासकांशी भेटतानाचे फोटोही शेअर केले होते. कार्यक्रमादरम्यान समुदाय नेते गेमेल खैर यांनी सांगितले की, “आपण पूर्णपणे राजकारणापासून दूर राहू शकत नाही, पण केवळ फोटोसाठी नेत्यांना बोलावणेही योग्य नाही.”

हे ही वाचा:

जूनमध्ये ‘या’ देशात उतरणार टीम इंडिया

मोहम्मद अजहरुद्दीन टीम इंडियात पदार्पण करणार?

नंबर वन टी-२० फलंदाजाला कोण सल्ला देणार?

इराणच्या नतांज अणु केंद्रावर हल्ला!

मशिदीने सोशल मीडियावर सांगितले की, गाझा संघर्ष सुरू झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधानांना नमाजासाठी आमंत्रित करण्यात आले होते. २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये तणाव वाढला आहे. त्या हल्ल्यात १२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि २५१ लोकांना ओलीस ठेवण्यात आले. त्यानंतर इस्रायलच्या कारवाईत गाझामध्ये ७२ हजारपेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे हमास-नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांत ईद कार्यक्रमांमध्ये राजकारण्यांना विरोधाचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नाही. समीक्षकांचे मत आहे की धार्मिक कार्यक्रमांमध्ये राजकारण टाळले पाहिजे. गेल्या वर्षीच्या निवडणूक प्रचारादरम्यान, लिबरल पक्षाचे जेसन वूड यांनाही मेलबर्नमधील एका मशिदीत निषेधाचा सामना करावा लागला होता आणि त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले होते.

अँथनी अल्बानीस यांच्या सरकारवर गाझा संघर्ष आणि डिसेंबरमध्ये झालेल्या बॉन्डी येथील गोळीबार प्रकरणाच्या हाताळणीवरूनही टीका होत आहे. त्या घटनेत ज्यू समुदायाच्या कार्यक्रमात १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यातील एका आरोपीला घटनास्थळी ठार करण्यात आले, तर दुसऱ्यावर सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. हा हल्ला इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने प्रेरित असल्याचा आरोप आहे आणि तो ऑस्ट्रेलियातील जवळपास तीन दशकांतील सर्वात मोठा सामूहिक गोळीबार होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा