30 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरधर्म संस्कृतीभोंदू ख्रिश्चन धर्मगुरू पॉल दिनाकरणच्या प्रार्थना सभेची परवानगी रद्द करा!

भोंदू ख्रिश्चन धर्मगुरू पॉल दिनाकरणच्या प्रार्थना सभेची परवानगी रद्द करा!

प्रार्थनेच्या आडून हिंदूंचे धर्मांतरण; हिंदू एकता आंदोलनाची मागणी

Google News Follow

Related

कवलापूर येथील प्रस्तावित विमानतळाच्या जागेवर, १३ ते १५ मार्च, दरम्यान भोंदू ख्रिश्चन धर्मगुरू, पॉल दिनाकरण याच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रार्थना सभेच्या, कार्यक्रमांमध्ये प्रार्थनेने आजार बरे करणे, कॅन्सर बरा करणे व्यंधत्व दूर करणे, आर्थिक समस्या दूर करणे, दैवी शक्तीने व्यसनमुक्ती दुर करणे , अपंगांना चालवणे मूकबधरी यांना बोलते करणे,इत्यादी प्रकारचे चमत्कार सार्वजनिक रित्या केले जाणार आहेत.

यामुळे हिंदू धर्मातील, गोरगरीब अशिक्षित हिंदू समाजातील लोक या गोष्टींना बळी पडणार आहेत या प्रार्थनेसभेच्या आडून, नंतर धर्मांतरण केले जाणार आहे यामुळे सांगलीतील सकल हिंदू समाज , हिंदू एकता आंदोलन, चेतना मातंग परिषद, यांनी या कार्यक्रमाला सांगली जिल्हा प्रशासनाने दिलेली परवानगी रद्द करावी ही मागणी केली आहे. या मागणीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन सांगली सर्किट हाऊस माधवनगर रोड येथे केले होते.

या पत्रकार परिषदेत माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले सांगली शहरातील ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित विवाहित तरुणीने, नवरा व सासू-सासरे यांच्या ख्रिश्चन धर्मांतरांच्या जाचाला कंटाळून सात महिन्यांची गरोदर असताना गळफास लावून आत्महत्या केली होती, याप्रकरणी नवरा,सासू-सासरे न्यायालयीन कोठडीत आहेत.

आटपाडी तालुक्यातील ख्रिश्चन धर्मगुरू संजय गेळे , याची जिल्हाधिकारी यांनी एक वर्षासाठी तडीपारी केली आहे , ही प्रकरणे ताजी असताना, भोंदू ख्रिश्चन धर्मगुरू पॉल दिनाकरण हा प्रार्थनेने आजार बरे होतात, प्रार्थनेने लग्न ठरवून मुले होतात, प्रार्थनेने ट्यूमर निघून जातो, लकवा मारलेला पेशंट बरा होतो,असं सांगणारा, कार्यक्रम सांगलीत होत आहे याला जिल्हा प्रशासन परवानगी देतेच कशी , अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कोणत्या बिळात लपून बसले आहेत , ते या विरोधात आवाज का उठवत नाही, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

सदरचा कार्यक्रम म्हणजे वैज्ञानिक क्षेत्राला आव्हान देणारा असून देशातलं व राज्यातल्या सरकार, चार लाख कोटी रुपये आरोग्य विभागासाठी खर्च करते ते काय मूर्ख आहेत. राज्यातल्या सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतरण विरोधी कायद्याला प्रस्तावाला मान्यता दिली असून त्यामध्ये सात वर्षाची सक्त मजुरी पाच लाखाचा दंड या धर्मांतरण करणाऱ्याला शिक्षेची तरतूद केलेली आहे,असे असताना , जिल्हा प्रशासन परवानगी देतेच कशी या प्रार्थना सभेचे पोलिसांनी रेकॉर्डिंग करावं, त्या प्रार्थना सभेच्या कार्यक्रमा वेळी आम्ही सांगितलेले चमत्कार,त्या स्टेजवर केले गेले तर भोंदू ख्रिश्चन धर्मगुरू पॉल दिनाकरण, याच्यासह या कार्यक्रमाचे आयोजक, व या कार्यक्रमाला परवानगी देणाऱे अधिकारी यांच्यावर सरकारने गुन्हे दाखल करावेत, या कार्यक्रमासंदर्भात,मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सांगली जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांनी आवाज उठवून भोंदू ख्रिश्चन धर्मगुरू पॉल दिनाकरण याच्यावर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडावे.

हे ही वाचा:

जागतिक तणावातही भारताच्या विकासाचा वेग कायम

घाबरून सिलिंडर बूक करू नका!, सरकारचे आवाहन

ही वर्ल्ड कप ट्रॉफी संपूर्ण भारताची!

धोनीशिवाय सीएसके अधुरीच!

या बैठकीमध्ये, चेतना मातंग परिषदेचे अभिमन्यू भोसले, हिंदू एकताचे जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, हिंदू एकताचे कवलापूरचे भूषण गुरव, यांनी, आपले मत मांडले या पत्रकार परिषदेला पैलवान प्रदीप निकम, गजानन माने अनिरुद्ध कुंभार, सोमनाथ गोटखिंडे, यश पाटील प्रेम देसाई, कृष्णा नायडू, अरविंद यतनाळे, सुमित शिंगे,दिग्विजय शिंदे, व सर्व सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा