बकरी ईदच्या दिवशी ब्रह्मगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणी श्री बजरंग बलीच्या मूर्तीच्या अंगावर गोमास टाकून विटंबना केल्याची घटना घडली होती. मात्र त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या गोरक्षक संग्राम ढोलेपाटील यांच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत संग्राम पाटील यांनी व्हीडिओच्या माध्यमातून पोलीस अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यावरच कसे गुन्हे दाखल करत आहेत, असा सवाल उपस्थित केला.
ढोले पाटील म्हणतात की, या प्रकरणात आरोपी मोकळे आहेत मात्र माझ्यावरच गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
तेहरानने होर्मुझच्या दिशेने ड्रोन डागल्यानंतर अमेरिकेचे इराणच्या रडार केंद्रांवर हल्ले
नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा आर. प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय
भातखळकर करून गेले, श्रेय लाटण्यासाठी सुर्वे आले!
सऊदी अरेबियाची नवी समुद्री व्यापार वाट
श्री बजरंग बलींची विटंबना केल्यानंतर त्याविरोधात ढोले पाटील आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. त्याविरोधात चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अरविंद प्रधान यांनी तक्रार दाखल केली. टिपू सुलतानचे पोस्टर रॅलीतील तरुणांनी फाडले असा आरोपही प्रधान यांनी केला आहे. या रॅलीतील किशोर औटी, गोपाळ उनवणे, सोमनाथ गाड़े, अभिषेक वीर, सचीन दाभाडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम पाटील यांनी म्हटले आहे की, मी ब्रह्मगाव येथे उपस्थित नसताना माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा का दाखल केला? मी ५०-६० लोकांसह तिथे दंगा केल्याचा पोलीस माझ्यावर आरोप लावतात. पण मी तिथे नव्हतो तर माझ्याविरोधात गुन्हा कसला? श्री बजरंग बलींची विटंबना करणारे मात्र मोकाट आहेत, त्यांच्यावर कधी कारवाई होणार?
