31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरधर्म संस्कृतीतिरुप्परनकुंद्रम कार्तिक दीप प्रज्वलनाला 'उबाठा'चा का आहे विरोध?

तिरुप्परनकुंद्रम कार्तिक दीप प्रज्वलनाला ‘उबाठा’चा का आहे विरोध?

उबाठा खासदाराची हिंदुविरोधी सही

Google News Follow

Related

सध्या मदुराई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात इंडी आघाडीने महाभियोग याचिका सादर केली आहे. स्वतःला हिंदुत्वाचे शिलेदार आणि बाळासाहेबांचे सुपुत्र, वारसदार म्हणवणाऱ्या उद्धव सेनेच्या खासदारांनी अतिशय या महभियोगाच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
न्यायमूर्ती स्वामिनाथन यांचा गुन्हा हा आहे की, मदुराई येथील तिरुपरनकुंद्रम टेकडीवर कार्तिक दीप प्रज्वलित करण्याची परवानगी त्यांनी हिंदू समाजाला दिली. या टेकडीवरचे २३०० वर्षांचा ज्ञात इतिहास असलेले भगवान मुरुगन मंदिर हे, तमिळनाडूतील हिंदू संस्कृती अध्यात्मिकता आणि श्रद्धेचा अमूल्य ठेवा आहे. अशा पवित्र वास्तूची हेळसांड करण्याच्या या प्रयत्नात उबठाने मदत केली आहे.
एखाद्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीला (उदा. राष्ट्रपती, सरन्यायाधीश, न्यायाधीश, राज्यपाल इत्यादी) त्यांच्या पदावरून कायद्याने काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे महाभियोग. भारतात हे संविधानाने दिलेल्या विशेष प्रक्रियेने होते. याला “अभिवचन प्रस्ताव” किंवा “इम्पीचमेंट मोशन” म्हणतात. आजपर्यंत गेल्या ७५ वर्षांत केवळ १० वेळा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. असा महाभियोग प्रस्ताव याचिका इंडि आघाडीच्या १०७ खासदारांनी सादर केली आहे. या मागची कहाणी म्हणजे हिंदूंच्या जागृत, ज्वलंत इतिहासाचे, आपल्या देवाधर्माच्या रक्षणासाठी अखंड लढा दिल्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे राममंदिरप्रमाणेच हा न्यायालयीन विजयही सकल हिंदू समाजाने सण साजरा करून साजरा करण्यासारखा महत्त्वाचा आहे.
हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या, भुराजकीयदृष्ट्या सोयीस्कर, धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या अशा तिरुपरकुंद्रम टेकडीवर दीप लावण्यासाठी हिंदूंना न्यायालयात धाव घ्यावी हेच मुळात दुर्दैवी आहे. या केसचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला तरी डीएमकेच्या हिंदुविरोधी सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली करत आपला अधिकार दामटत टेकडीच्या खाली घाईघाईने दीपोत्सव घडवून आणला. यावर न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले कारण हा सरळ सरळ न्यायालयाचा अवमान होता.

हे ही वाचा:

घुसखोरीच्या प्रयत्नात असताना जैश संबंधित दहशतवाद्याला अटक

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे क्रांतिकारकांच्या आकाशगंगेतील तेजस्वी तारा

पाकिस्तानात मिळणार संस्कृतचे धडे!

श्रीलंकेतील पुलांचे भारतीय सैन्याकडून पुनरुज्जीवन

हा विषय इथेच संपत नाही. गेंड्याच्या कातडीचे हिंदू विरोधी डीएमके, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि मुख्य म्हणजे अगदी आतापर्यंत स्वतःला हिंदुरक्षक म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग याचिका सादर केली आहे. अशा प्रकारे आता संसदेतही दीपोत्सवाच्या या विवादाने पेट घेतला आहे. जस्टिस जी.आर. स्वामीनाथन यांच्या दीपथून आदेशाच्या विरोधात १०७ विरोधी खासदारांनी त्यांच्याविरुद्ध महाभियोगाचा अर्ज सादर केली आहे.

विरोधकांचा आरोप आहे की, न्यायालयाचा हा निर्देश धार्मिक तणाव वाढवणारा होता आणि घटनात्मक मर्यादांपलीकडे गेला होता. तमिळनाडू सरकारने आधीच कायदा-व्यवस्था सुधारण्याच्या बहाण्याने आदेश मान्य करण्यास नकार दिला आहे. आता हा मुद्दा संसद, न्यायपालिका आणि राज्य सरकार यांच्यातील टोकाच्या संघर्षाचे रुप घेत आहे.

सपा, काँग्रेस, उद्धव ठाकरे डीएमके अशा कट्टर हिंदूविरोधी पक्षांनी केवळ मुस्लिम मतपेटीला सांभाळण्यासाठी हा महाभियोग आणला आहे यात संशय नाही. इतकेच नव्हे तर ही जागा दिंडीगुल या गेल्या दोन दशकांत ख्रिस्ती बहुल झालेल्या जिल्ह्यात आहे. इथे हिंदू समाजाचा हक्काचा टेहळणी बुरुज निर्माण होऊ देणे ख्रिस्ती आणि डाव्यांना कसे चालेल? त्यामुळे तेही हिंदू पक्षाच्या विरोधात कडवे पणाने उभे ठाकले आहेत.

गेल्या शतकापासून हिंदू समाज एकवटत चालला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हिंदू इकोसिस्टम निर्माण होताना दिसत आहे. यासाठी कोणतेही डीप स्टेट काम करत नाही. तर समाजातूनच हा आत्मोन्नतीचा मार्ग प्रशस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. कारण या सर्वामागे नैसर्गिक, सुंदर पद्धतीने गुंफलेले, समाजाच्या प्रत्येक घटकाचा एकेक आणि संघटित अशा दोन्ही स्वरूपात विचार करणारे, विकासवर्ती तत्त्वज्ञान आहे. गेल्या दशकभरात या आत्मजागृतीचा वेग प्रचंड पटीने वाढला आहे. न्यायालयातही सज्जनशक्ती ठामपणे या कट्टरवादी पक्षांच्या धमक्यांना न जुमानता योग्य असा न्याय्य निर्णय करू लागले आहे.

सरकार कोई भी हो, सत्ता तो अपनी ही चलेगी हा माज आता करता येत नाही. स्वाभिमानी जागृत समाज कोट्यवधींच्या संख्येने आपल्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी सिद्ध होत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतीय शक्ती आपले वर्चस्व दाखवत आहेत.

सरकारात बसून हिंदुत्ववादी समाज भारताला हितकर असे गट, मित्र जमवत आहे. तसे करार घडवून आणले जात आहेत. स्वाभाविकच आंतरराष्ट्रीय बाजार शक्तींची पकड ढिली पडत आहे. त्यामुळे ते चवताळले आहेत. आणि अशा घोडचुका करून मूळ भारतीय समाजापासून अधिकाधिक दूर जात चालले आहेत.

परंतु हिंदू समाजाने अखंड सावध जागृत राहणे हाच शाश्वत उपाय असणार आहे. राष्ट्रीय विचारांना बळकटी देणाऱ्या, अंत्योदयाच्या योजना अमलात आणणाऱ्या राजकीय पक्षांना उचलून धरणे आवश्यक आहे. हिंदू समाजाची सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक शक्ती निर्माण करणे हे केवळ आणि केवळ हिंदू समाजाच्या हातात आहे. आपल्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवश्यक तो प्रत्येक दगड पार करणे हे आपले हिंदू म्हणून आणि भारतीय म्हणून परम कर्तव्य आहे.

त्यासाठी कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता हिंदू म्हणून जो पक्ष, जी विचारधारा भारताला, राज्यांना आणि शहरांना आधार देईल त्याच लोकांना लोकशाही व्यवस्थेचा फायदा घेऊन सत्तेत बसवणे हे आपले परम कर्तव्य असणार आहे. सध्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक येऊ घातल्या आहेत. या उबाठा गटाच्या खासदार अरविंद सावंत यांनी महाभियोग प्रस्तावावर सही केली आहे. मुंबईकर यावर काय विचार करत असतील?

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा