26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरधर्म संस्कृतीनऊ वर्षांनंतर दिवेआगरमधील सुवर्णगणेशाची झाली प्रतिष्ठापना

नऊ वर्षांनंतर दिवेआगरमधील सुवर्णगणेशाची झाली प्रतिष्ठापना

Google News Follow

Related

रायगड जिल्ह्यातील दिवेआगरमधील श्रीगणेशाच्या सुवर्णमूर्तीची प्रतिष्ठापना पुन्हा एकदा करण्यात आली आहे. त्यामुळे दिवेआगर गावातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही प्रतिष्ठापना करण्यात आली. गेली ९ वर्षे या सुवर्णगणेशासाठी गावकरी अथक संघर्ष करत होते, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

नऊ वर्षांपूर्वी म्हणजे मार्च २०१२मध्ये दिवेआगरमधील या देवस्थानात दरोडा पडला आणि त्यात ही मूर्ती चोरण्यात आली. सुवर्णगणेश चोरीला गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यातच या दरोड्यात मंदिरातील दोन सुरक्षा रक्षकांना ठार करण्यात आले होते. त्यामुळे या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर त्या दरोडेखोरांनी ती मूर्ती वितळविली. पण नंतर ते पोलिसांच्या कारवाईनंतर पकडले गेले. पुढे त्यांना कठोर शिक्षाही झाली. त्या दरोडेखोरांकडून १ हजार ६०० किलो इतक्या सोन्याची ही मूर्ती पळविण्यात आली होती. पण त्यांना पकडण्यात आल्यावर त्यांच्याकडून १ किलो ३५१ ग्रॅम सोने मिळविण्यात आले. पण ते सोने गावकऱ्यांना मिळावे यासाठी संघर्ष सुरू झाला. कोर्ट कचेऱ्या, सरकारी पातळीवरील प्रयत्न यातून शेवटी ही मूर्ती पुन्हा एकदा घडविता आली. यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर करून पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडे सुवर्णगणेशाचा नव्याने मुखवटा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले.

 

हे ही वाचा:

अनिल परबांच्या घरावर फेकली शाई

पेंग्विन पुन्हा ‘हाय- वे’च्याच हवाली!

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आपल्याच कार्यालयावर दगडफेक

ईडी म्हणते, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना मुलाची साथ

 

आता या सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा दिवेआगरमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग बोर्डिंग व्यावसायिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. मात्र पुन्हा अशी दरोड्याची घटना घडू नये यासाठी कडेकोड सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे. आता देवस्थानातच पोलिस चौकी उभारल्यामुळे आणि सशस्त्र पोलिस तैनात केल्यामुळे चोरीच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री गावकऱ्यांना वाटते आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा