भारतात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा असा दिवाळी सण, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आला आहे. युनेस्को यासंबंधीची घोषणा बुधवार, १० डिसेंबर रोजी केली. नवी दिल्ली येथे होणाऱ्या युनेस्कोच्या बैठकीत ७८ देशांमधून अनेक नामांकनांचा विचार केला जात असताना दिवाळीची निवड ही या सणाचे विशेष जागतिक महत्त्व अधोरेखित करते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या घोषणेमुळे सर्व भारतीय आनंदी आहेत. त्यांनी एक्सवर लिहिले की, “भारतातील आणि जगभरातील लोक खूप आनंदी आहेत. आमच्यासाठी दिवाळी ही आमच्या संस्कृती आणि मूल्यांशी जवळून जोडलेली आहे. ती आमच्या संस्कृतीचा आत्मा आहे. ती प्रकाश आणि सत्याचे प्रतीक आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश झाल्यामुळे या सणाची जागतिक लोकप्रियता आणखी वाढेल. भगवान श्री राम यांचे आदर्श नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत राहोत.”
People in India and around the world are thrilled.
For us, Deepavali is very closely linked to our culture and ethos. It is the soul of our civilisation. It personifies illumination and righteousness. The addition of Deepavali to the UNESCO Intangible Heritage List will… https://t.co/JxKEDsv8fT
— Narendra Modi (@narendramodi) December 10, 2025
अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आंतरसरकारी समिती (ICH) चे सत्र भारत पहिल्यांदाच आयोजित करत आहे. समितीचे २० वे सत्र ८ ते १३ डिसेंबर दरम्यान लाल किल्ल्यावर होत आहे. युनेस्कोचे उद्दिष्ट हे या यादीद्वारे जगभरातील विविध सांस्कृतिक परंपरांच्या विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि भावी पिढ्यांसाठी त्यांचे जतन सुनिश्चित करणे आहे.
भारताच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळी सणाचा समावेश करण्याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, युनेस्कोने शांततेच्या चिरंतन मानवी इच्छेचा आणि चांगुलपणाच्या विजयाचा सन्मान केला आहे. दिवाळी हा भारतीयांसाठी पिढ्यानपिढ्या साजरा केला जाणारा एक भावनिक सण आहे. युनेस्कोचा हा टॅग देखील एक जबाबदारी आहे. आता आपण खात्री केली पाहिजे की, दिवाळी कायमचा आपला वारसा राहील.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर लिहिले की, दिवाळी वाईटावर चांगल्याचा विजय आणि भगवान रामाचे अयोध्येत पुनरागमन या सार्वत्रिक सणाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. या घोषणेसह, भारताच्या सांस्कृतिक इतिहासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन मान्यता मिळाली आहे आणि दिवाळीचे जागतिक महत्त्व आणखी ठळक झाले आहे.
हे ही वाचा:
“राहुल गांधी हे ‘अर्धवेळ राजकीय नेते’!”
गोव्यातील नाईट क्लबचा सह-मालक अजय गुप्ताला अटक
मायक्रोसॉफ्ट भारतात १.५ लाख कोटी रुपये गुंतवणार
पाच दिवसात ‘धुरंधर’ने कमावले १५० कोटी
भारतातील १५ गोष्टी सध्या युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट आहेत, ज्यात कुंभमेळा, कोलकात्याची दुर्गा पूजा, गुजरातचे गरबा नृत्य, योग, वैदिक जपाची परंपरा आणि रामलीला महाकाव्य ‘रामायण’चे पारंपारिक सादरीकरण यांचा समावेश आहे.







