31 C
Mumbai
Tuesday, March 10, 2026
घरधर्म संस्कृतीदिल्लीतील तरुणकुमार हत्या: जिहाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास भाग पाडू नका

दिल्लीतील तरुणकुमार हत्या: जिहाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास भाग पाडू नका

हिंदू सणांवर होणाऱ्या जिहादी हल्ल्यांची यादी जाहीर करत विहिपची इशारा 

Google News Follow

Related

धुलिवंदनाच्या दिवशी तरुण खटीक यांची जिहादी जमावाने केलेल्या सामूहिक हत्येचा विश्व हिंदू परिषदने कठोर शब्दांत निषेध केला आहे. सोमवारी (९ मार्च) प्रेस कांफेरेंस दरम्यान विहिपचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, “दिल्लीच्या उत्तम नगर येथील एक क्षेत्रात सात वर्षांच्या एका निरागस मुलीने रंग खेळताना आपल्या काकांच्या दिशेने पाण्याचा फुगा फेकला होता. त्यातल्या पाण्याचे काही थेंब तिथून जाणाऱ्या एका मुस्लिम महिलेवर उडाले. त्यानंतर मुस्लिम महिलेच्या नातेवाईकांनी तरुण खटीक यांच्या आई-वडीलांना निर्दयीपणे मारहाण केली. संध्याकाळी रंग खेळून परतलेल्या तरुण खटीकवर जिहादी जमवाने हल्ला केला. उत्तम नगरच्या एका गल्लीत तलवारी, दगड आणि लाठ्यांनी हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली. त्या महिलेला हे माहीत नव्हते का की होळी हा रंगांचा सण आहे आणि त्याचे थेंब कोणावरही पडू शकतात?”
ते म्हणाले, “होळीच्या दिवशी त्या महिलेचे घराबाहेर पडणे आणि पाण्याचे थेंब पडल्याने 25-30 जिहाद्यांचा जमाव शस्त्रांसह बाहेर येऊन हिंसाचार करणे हा केवळ योगायोग असूच शकत नाही. अद्याप या हत्याकांडाचा कट रचणाऱ्या महिलेला अटकही करण्यात आलेली नाही. तिला तात्काळ अटक करून कठोर चौकशी करणे आवश्यक आहे. देशभरात असे दिसून आले आहे की जिहादी अनेकदा दंगलीत महिला आणि अल्पवयीन मुलांना पुढे करतात, जेणेकरून ते कायदेशीर कारवाईपासून वाचू शकतील. आता त्यांच्या या रणनीतीवरही आळा घालण्याची वेळ आली आहे.”
डॉ. जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हिंदू सण आणि शोभायात्रांवर हल्ले करून मॉब लिंचिंगद्वारे हिंदूंची हत्या करणे हे एकच उदाहरण नाही. याच वर्षी होळीच्या दिवशी हिंदूंच्या रक्ताने होळी खेळण्यासाठी ११ पेक्षा अधिक हल्ले झाले. मागील १० वर्षांत फक्त होळीच्या दिवशी झालेल्या हल्ल्यांच्या ४२ पेक्षा अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.
होळीच नव्हे, तर हिंदूंचा असा एकही सण नाही ज्यावर जिहादी हल्ले करत नाहीत. मागील १० वर्षांत हिंदू सणांवर २४० पेक्षा अधिक प्राणघातक हल्ले झाले असून त्यामध्ये अनेक हिंदूंना घेरून मारण्यात आले आहे. याची एक यादी या प्रसिद्धिपत्रकासोबत देण्यात आली आहे, जी फक्त काही नोंदवलेल्या घटनांवर आधारित आहे. विश्व हिंदू परिषदेनुसार वास्तव यादिपेक्षा अधिक भयावह आहे.
डॉ. जैन म्हणाले की, जिहाद्यांमध्ये हिंदूंविषयी क्रूरता आणि द्वेष वाढत चालला आहे. दुसरीकडे उत्तम नगर येथील हिंदू समाजाच्या प्रतिक्रियेमुळे त्यांनाही स्पष्ट झाले असेल की आता हिंदू समाजाचा संतापही वाढत आहे. तो फक्त कायदेशीर कारवाईची वाट पाहत शांत बसणार नाही. रामास्वामी उदयार प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी सर्वांनी लक्षात ठेवावी की, जर एखादा वर्ग हिंदूंना त्यांच्या उत्सव आणि शोभायात्रा आयोजित करण्यात अडथळा आणत असेल, तर त्या वर्गालाही विचार करावा लागेल की जिथे ते अल्पसंख्यांक आहेत तिथे ते आपले धार्मिक कार्यक्रम कसे आयोजित करू शकतील.
विश्व हिंदू परिषदने इशारा देत सांगितले आहे की मदनी, ओवैसी आणि वर्क यांसारख्या कट्टरपंथीयांना तसेच त्यांच्या सोबत हातमिळवणी करणाऱ्या तथाकथित सेक्युलर नेत्यांनी हिंदू समाजाला त्याच पद्धतीने उत्तर देण्यास भाग पाडू नये ज्या पद्धतींचा वापर हिंदूंविरुद्ध होत आहे.
छोट्या-छोट्या गोष्टींवर मोठा गाजावाजा करणाऱ्या राहुल गांधीसह सर्व नेते तरुण खटीकच्या निर्घृण हत्येबाबत आजपर्यंत शांत आहेत. यावरून स्पष्ट होते की हे लोक अशा हत्याकांडांना मौन समर्थन देत आहेत. जिहादी हिंसेचे बळी ठरलेले तरुणसारखे अनेक युवक अनुसूचित समाजातून येतात. या समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा दावा करणारे मीम-भीमवादी, सेक्युलर आणि बंधुभावाच्या घोषणा देणारे नेते या प्रकरणात का गप्प बसतात, हे आश्चर्यकारक आहे.
विश्व हिंदू परिषदने तरुणच्या मॉब लिंचिंगमध्ये सहभागी काही आरोपींवर झालेल्या तात्काळ कारवाईचे स्वागत केले असून मुस्लिम महिला तसेच इतर अनेक आरोपींवर कठोर कारवाई अजुनही बाकी असल्याचे म्हटले आहे. विहिपने पुढील मागण्या केल्या आहेत:
  • आरोपींवर अशी कठोर कारवाई करावी की भविष्यात अशा प्रकारच्या कृत्यांपूर्वी इतरांना दहा वेळा विचार करावा लागेल.
  • जिहाद्यांना भडकावणाऱ्या मुल्ला-मौलवींवरही कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. कट्टरपंथ आणि दहशतवादाचे केंद्र बनलेल्या मदरशांवर पूर्ण आणि तात्काळ बंदी घालण्याची गरज आहे.
  • दिल्लीसह सर्व राज्य शासनांनी चौकशी आयोगांची स्थापना करावी, जे वाढत्या जिहादी क्रूरतेची आणि हिंदूंविषयी पसरविल्या जाणाऱ्या द्वेषाची तसेच गुन्हेगारांना शिक्षा न मिळण्याची कारणे सखोलपणे तपासून दोषींवर कठोर कारवाईची शिफारस करतील.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा