राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा शताब्दी वर्ष साजरे करत असून त्यानिमित्ताने १ ऑगस्टला रा.स्व. संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्फूर्तिदायी चरित्रावर आधारित मै कहता हूँ, यह हिंदू राष्ट्र है – डॉ. हेडगेवार हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. विलेपार्ले येथे या चित्रपटाचा शो होत असून सनसिटी थिएटर्समध्ये १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत चित्रपट पाहता येईल. दररोज संध्याकाळी या चित्रपटाचा शो ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जयानंद शेट्टी, सहार भाग, नित्यानंद नगर, यांच्या ६-७ वर्षाच्या अथक प्रयत्नाने मै कहता हूं, यह हिंदू राष्ट्र हैं – डॉक्टर हेडगेवार हा चित्रपट पूर्ण झाला आहे. शुक्रवार १ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट आपल्या जवळील चित्रपट गृहात रिलीज होत आहे. या चित्रपट निर्मितीसाठी जयानंद यांनी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. या चित्रपटासाठी आवश्यक आर्थिक तजवीज त्यांनी आपली संपत्ती विकून उभी केली आहे. हा चित्रपट सर्वांनी जरूर पाहावा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यामागची प्रेरणा नेमकी काय होती, याचा धगधगता इतिहास जाणून घ्यावा अशी विनंती शेट्टी यांनी केली आहे.
हे ही वाचा:
दहशतवाद्यांना सोडा, निरपराधांना धरा!
गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये!
प्रमिलाताई मेढे यांच्या निधनाबद्दल संघप्रमुख मोहन भागवत यांची श्रद्धांजली
चर्चेचं उत्तर कोण देईल हे सरकार ठरवेल, विरोधक नव्हे
या चित्रपटाचा जो ट्रेलर रीलिज झाला आहे, त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा पूर्वेतिहास समोर येतो. हिंदू समाजाला संघटित करण्याची आवश्यकता का होती, कोणते संकट हिंदू समाजावर घोंघावत होते, त्या काळातील काँग्रेसने कशी बोटचेपी भूमिका हिंदूंच्या बाबतीत घेतली होती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या चित्रपटातून मिळतात. डॉ. हेडगेवारांनी या सगळ्या परिस्थितीतूनच हिंदूंना संघटित करण्यासाठी १९२५मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीजारोपण केले.







