26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरधर्म संस्कृतीदुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ – वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी

दुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ – वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी

Google News Follow

Related

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता, लम्बोष्टी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी ॥

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना. दुर्गा देवीचे सातवे रूप म्हणजे ‘कालरात्री’. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा केली जाते. तर, दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘ब्रह्मचारिणी’ रुपाची आराधना केली जाते. तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘चंद्रघंटा’ रुपाला पूजले जाते. चौथा दिवस असतो ‘कुष्मांडा’ देवीचा. पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ देवीला पूजले जाते, सहावे रूप म्हणजे ‘कात्यायनी’ आणि सातवे रूप म्हणजे ‘कालरात्री’.

कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधार्‍या रात्रीप्रमाणे काळा असून डोक्यावरील केस विखुरलेले आहेत. तीन डोळे असून देवीच्या गळ्यात चमकणारी माळ आहे. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात, असं म्हटलं जाते.

पौराणिक कथेनुसार, शुभ- निशुंभ, रक्तबीज यांनी पृथ्वीवर हाहाःकार माजवला होता. सर्व देवांनी त्रस्त होऊन श्री शंकराकडे धाव घेतली. त्यावेळी शंकरांनी पार्वतीला दैत्यांचा नाश करण्यास सांगितले. पार्वतीने दुर्गा रूप धारण करून शुंभनिशुंभ त्यांचा वध केला. परंतु रक्तबीजाशी युद्ध करताना मात्र जसजसे त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडू लागले तसतसे त्या रक्ताच्या थेंबांमधून नवीन रक्तबीजासारखेच राक्षस निर्माण होऊ लागले. तेव्हा दुर्गेने आपल्या तेजातून कालरात्री निर्माण केली. कालरात्रीने रक्तबीजाचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्याआधीच आपल्या मुखात धरला. रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडणे बंद झाले तसा तो क्षीण होत गेला आणि दुर्गेने त्याचा वध केला.

हे ही वाचा : 

जीएसटी फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार महेश लांगा यांना अटक

वडील, काकांना दहशतवाद्यांनी मारले, पण शगुनने विजय मिळवून दिला रोखठोक संदेश!

मुंबईकरांचे घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार

जम्मू- काश्मीरसह देशातील जनतेला कळून चुकलंय, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पर्याय

देवीचे स्वरुप नावाप्रमाणे कालरात्रि आहे. देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते. चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड्ग, तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे. देवीचे वाहन गर्दभ आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा