आधी मुस्लिम हो, मगच लग्न…जबरदस्तीमुळे हिंदू युवकाची सांगलीत आत्महत्या

मुस्लिम तरुणीला अटक करा, हिंदू एकता आंदोलनाची मागणी

आधी मुस्लिम हो, मगच लग्न…जबरदस्तीमुळे हिंदू युवकाची सांगलीत आत्महत्या

सांगली खणभागात राहणारा दुर्वेश शेवाळे या हिंदू युवकाने मुस्लिम तरुणीने धर्म परिवर्तन कर अन्यथा लग्नास नकार समज या कारणाने नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले. संबंधित तरुणीने लग्नासाठी मुस्लिम धर्म स्वीकारण्याची अट घातली होती, यावरून झालेल्या वादातून आणि नैराश्यातून दुर्वांकने हे पाऊल उचलले अशी माहिती हिंदू एकता आंदोलनाचे जुने कार्यकर्ते दुर्वांक शेवाळे चे वडील व त्याच्या कुटुंबियांनी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांना दिली.

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे दुर्वांक शेवाळे च्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी व त्यांचे सांत्वन करण्यासाठी गेले असता दुर्वांक शेवाळे याचे वडील म्हणाले की, दुर्वांक हा पुणे येथे नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो सांगलीत घरी आला होता. खाणभाग मध्ये घराजवळ मूळची कोल्हापूरची तरुणी तिच्या आजीकडे राहण्यासाठी वरचेवर येत होती. यातूनच या दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र संबंधित तरुणीने ‘लग्नासाठी धर्म स्वीकारावा लागेल’ व दिवसातून पाच वेळा नमाज पड अशी अट घातली होती. त्यामुळे तो काही दिवसांपासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता. गुरुवारी दुपारी याच विषयावरून फोनवर बोलत असताना त्याने घरात गळफास लावून घेतला. नंतर दुर्वांकच्या आईचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये दुर्वांक आणि संबंधित मुस्लिम तरुणीमधील धर्म परिवर्तनाच्या अटीसंदर्भातील सर्व संभाषण (चॅटिंग) आढळून आले. व सदर प्रकारण सांगली शहर पोलिस तपास दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा:

घसरला… लढला… जिंकला! सिनरची विंबल्डनमध्ये विजयी एन्ट्री

श्री चरणी अजूनही नंबर वन

“आमचे राजकारण तोडण्यासाठी नव्हे, तर जोडण्यासाठी”

अवघ्या ३ महिन्यांत भारतीयांनी विकले तब्बल ५० टन जुने सोने!

तरी सदर प्रकरणात स्वतः माजी आमदार नितीन शिंदे यांनी लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करा व सदर मुलीचा फोन जप्त करून फोन मधील डिटेल्स काढा अशा सूचना फोनवरून पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मुलीला तात्काळ अटक करा. सदर मुलीला पाठीशी घालणाऱ्याना सह आरोपी करा.

यावेळी हिंदु एकता आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, प्रसाद रिसवडे, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, भूषण गुरव, दिग्विजय शिंदे, हार्पितसिंग गौड, गजानन माने, राम काळे, अनिकेत अंबरूळे.

Exit mobile version