आता लोकल रेल्वेच्या डब्यातून धर्मांतरणांचे रॅकेट

आता लोकल रेल्वेच्या डब्यातून धर्मांतरणांचे रॅकेट
लोकल ट्रेन की धर्मांतराचा ‘अड्डा’? हा केवळ एक प्रश्न नसून मुंबई आणि आसपासच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या डोळ्यांदेखत घडणारे एक कटू वास्तव आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात, पोटापाण्याच्या चिंतेत बुडालेल्या सामान्य कष्टकरी, मध्यमवर्गीय विशेषतः भोळ्या सहिष्णू हिंदू प्रवाशांना लक्ष्य करून लोकल ट्रेनमध्ये पद्धतशीर धर्मप्रसाराचा खेळ सुरू आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) एसी लोकलमध्ये थेट ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारी, प्रवाशांना आकर्षित करणारी पत्रके चिकटवण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर अशा प्रकारे धार्मिक प्रचारासाठी आणि धर्मांतराला प्रवृत्त करण्यासाठी केला जात असल्याने रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावर आता गंभीर विचार करून कृती करण्याची वेळ आली आहे.
पनवेल-सीएसएमटी (सकाळी ९.०९) एसी लोकलच्या डब्यांमध्ये प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मराठी भाषेत छापलेली पत्रके लावण्यात आली. ‘जीवनारेखा हवी आहे का?’, ‘येशू देव आहे’, ‘तुम्हाला प्रीती करण्यासाठी बनवले होते’ अशा भावनिक आणि मानसिक दबावात असलेल्या व्यक्तींना आकर्षित करणाऱ्या मथळ्यांचा वापर या पत्रकांमध्ये आहे. वैयक्तिक अडचणी, नोकरी जाणे, कौटुंबिक समस्या आणि मानसिक थकवा यांचा गैरफायदा घेऊन, ‘फक्त येशूच तुम्हाला वाचवू शकतो’ अशा आशयाचा प्रचार या पत्रकांद्वारे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला जात आहे. इतकेच नव्हेतर ‘www.ThisLoveStory.org’ या संकेतस्थळाचा पत्ता देऊन सहिष्णू हिंदू प्रवाशांना अधिक माहितीच्या नावाखाली जाळ्यात ओढण्याचा थेट प्रयत्न सुरू आहे.

 

सामान्यतः रेल्वेमध्ये कोणत्याही व्यावसायिक किंवा धार्मिक जाहिराती लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाची अधिकृत परवानगी आवश्यक असते. मग अशा धर्मांतराला प्रवृत्त करणारी पत्रके एसी लोकलमध्ये लावण्याची हिंमत कोणाची झाली? रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे प्रशासन झोपले आहे का? असा संतप्त सवाल आता प्रवासी संघटना आणि नागरिक विचारत आहेत.
हे ही वाचा:

व्हेनेझुएलात ५० हजार लोक बेपत्ता, पुन्हा भूकंपाचे धक्के

कतारमधील रास लफ्फान दुर्घटनेतील मृत भारतीयांचे पार्थिव भारतात रवाना

भारतात ४५°C… तरी निभावतो! पण ब्रिटनमध्ये ३५°C होताच लोक हैराण; नेमकं असं का?

वरळी सी-लिंकवरून व्यापाऱ्याची आत्महत्या

 

 

दोषींवर कारवाई कधी?

या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. अशी पत्रकं कोणी लावताना दिसल्यास तात्काळ सुजाण नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला माहिती द्यावी. एसी लोकल असल्याने संबंधित प्रकार रेल्वे सुरू असतानाच घडला असणार हे निश्चित. त्यामुळे मुंबईची लोकल ही जनतेची संपत्ती असून तिचे विद्रूपीकरण करण्याचे काम कोणी करत असेल, तर त्यास रोखणे हे आपले कर्तव्य आहे, असे डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी स्पष्ट केले आहे.

धार्मिक स्वातंत्र्याखाली चाललेले उद्योग!

हिंदू समाजाला लक्ष्य करून ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी धार्मिक स्वातंत्र्याखाली हे उद्योग चालविले आहेत. रेल्वे, बाजार, शहरात, एसटी डेपो अशा अनेक ठिकाणी यांचा सुळसुळाट आहे. लोकलच्या डब्यांमध्ये काही व्यक्ती अचानक हातात धार्मिक पुस्तिका घेऊन उभ्या राहतात. सुरुवातीला त्या अत्यंत प्रेमाने, शांतपणे संवाद साधतात.

‘तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे का?’, ‘तुम्ही आजारी आहात का?’, ‘तुमची संकटे दूर होत नाहीत का?’ असे भावनिक प्रश्न विचारून ते प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. हा कोणताही वैयक्तिक किंवा उत्स्फूर्त प्रयत्न नसून हा एक संघटित, प्रशिक्षित आणि नियोजनबद्ध धर्मप्रसाराचा भाग आहे. यासाठी तरुणांना, महिलांना प्रशिक्षण दिले जाते. लोकलच्या डब्यात प्रवाशांना खिळवून कसे ठेवायचे, त्यांच्या भावनांशी कसे खेळायचे, याचे रीतसर तंत्र या मिशनरींनी विकसित केले आहे. विनामूल्य बायबल वाटणे, येशू ख्रिस्ताच्या चमत्कारांच्या खोट्या गोष्टी सांगणे आणि हिंदू सण-परंपरांबद्दल संभ्रम निर्माण करणे, हा या मोहिमेचा मुख्य अजेंडा असतो.

लोकलमध्ये रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणारे असतात. कोणाच्या घरात आजारपण असते, कोणावर कर्जाचा डोंगर असतो, तर कोणाची मुले सुशिक्षित बेरोजगार असतात. अशा मानसिकदृष्ट्या खचलेल्या आणि हतबल हिंदू प्रवाशांना हे मिशनरी हेरतात. त्यांच्या फसवणुकीची पद्धत कुटिल असते. सुरुवातीला ते हिंदू देवी-देवतांचा थेट अपमान करत नाहीत, तर ‘तुमचे देव वाईट नाहीत, पण त्यांच्याकडे तुमच्या समस्यांचे निवारण करण्याची शक्ती नाही,’ असा संभ्रम निर्माण करतात.

 

 

‘फक्त येशूच तुम्हाला वाचवू शकतो,’ असा खोटा प्रचार केला जातो. कॅन्सर, अर्धांगवायू (पॅरालिसिस) यांसारखे गंभीर आजार केवळ येशूची प्रार्थना केल्याने बरे होतात, असे नुसते दावे करून वैद्यकीय विज्ञानाची आणि मानवी बुद्धीची थट्टा उडवली जाते. पैशांचे आमिष, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन किंवा नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून हळूहळू या हिंदूंचे धर्मांतर केले जाते.

‘हालेलूइया’चा भोंदूबाजार…

विदारक भाग म्हणजे ‘चांगाई सभा’ आणि त्यामध्ये होणारा ‘हालेलूइया’चा भोंदूबाजार. लोकल ट्रेनमध्ये संपर्क साधल्यानंतर या भोळ्या प्रवाशांना हुशारीने या तथाकथित ‘चांगाई सभांमध्ये’ येण्याचे आमंत्रण दिले जाते. मुंबईच्या उपनगरांमध्ये, ठाणे, पालघर, कल्याण आणि नवी मुंबई परिसरातील बंद सभागृहांमध्ये किंवा मैदानात या सभा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात.

या चांगाई सभा म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा, जादूटोणा आणि मानसिक संमोहन यांचा बाजार असतो. तिथे स्टेजवर येऊन काही लोक अचानक ओरडू लागतात, नाचू लागतात आणि ‘माझा आजार बरा झाला’, ‘मला दिसायला लागले’, ‘माझे अपंगत्व दूर झाले’… असे खोटे दावे करतात. हे सर्व पूर्वनियोजित आणि पैसे देऊन आणलेली माणसे असतात जे केवळ सामान्य जनतेला फसवण्यासाठी हा तमाशा करतात.

‘हालेलूइया-हालेलूइया’च्या मोठ्या आवाजातील घोषणांनी संपूर्ण वातावरण असे तयार केले जाते की तिथे आलेला सामान्य माणूस आपली विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. विज्ञानाच्या युगात अशा प्रकारे आजार बरे करण्याचा दावा करणे हा कायद्याने गुन्हा आहे तरीही कायद्याला धाब्यावर बसवून हा भोंदूबाजार राजरोसपणे सुरू आहे. दुर्दैवाने, आजमितीला यात हजारो हिंदू बांधव अडकल्याचे आपण पाहत आहोत.

सरकार कुठे आहे?

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ ’महाराष्ट्रात लागू झाला आहे. या विधेयकात स्पष्टपणे नमूद आहे. आमिष, फसवणूक, जबरदस्ती, धमकी किंवा कोणत्याही प्रकारच्या लबाडीने केलेले धर्मांतर आता थेट गुन्हा मानला जाणार आहे आणि या गुन्ह्यासाठी केवळ औपचारिक शिक्षा नाही, तर कठोर कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः एक गोष्ट स्पष्ट सांगतो, आपल्या मुलींना टार्गेट करून, योजनाबद्ध पद्धतीने जाळे विणून धर्मांतर करण्याचा जो खेळ चालत होता, तो आता थांबणार आहे. हे सगळे काही योगायोगाने होत नव्हते, तर ठरवून, स्क्रीप्टनुसार केले जात होते. पण, आता हा खेळ बंद होणार आहे. कारण, हा कायदा असा आहे की, जे कोणी या प्रकारात सहभागी होतील, त्यांना थेट कायद्याचा चाप बसणार आणि सहज सुटणे शक्य होणार नाही.

धर्मांतर करण्याची कायदेशीर प्रक्रिया विशद करणारे, गैरमार्गाने होणारे धर्मांतर थांबवण्यासाठी व असेे धर्मांतर करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील तेरावे राज्य आहे. यापूर्वी ओडिसा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, कर्नाटक, हरियाणा व राजस्थान या राज्यांनी असा कायदा पारित केलेला आहे.

हिंदूंनी जागे होण्याची गरज

केवळ एका लोकल ट्रेनमधील समस्येपुरती मर्यादित बाब नसून, हिंदू संस्कृती आणि लोकसंख्येचे संतुलन बिघडवण्याचे एक मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे. सर्वप्रथम प्रत्येक हिंदूने आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व, इतिहास व तत्त्वज्ञान समजून घेतले पाहिजे. आपल्या सनातन धर्मात प्रत्येक समस्येचे उत्तर आहे हे समाजात ठामपणे मांडले पाहिजे. छद्मी मिशनरी ज्या गरीब, वंचित हिंदू बांधवांना लक्ष्य करत आहेत, त्यांना हिंदू समाजानेच आर्थिक, सामाजिक आणि वैद्यकीय मदत केली पाहिजे. समाजात कोणीही उपेक्षित राहणार नाही याची काळजी आपण घेतली तर कोणीही धर्मांतराला बळी पडणार नाही.

यातील आणखीन एक उल्लेखनीय बाब म्हणजे सहिष्णू हिंदू बांधवांना भ्रमित करण्याच्या या कामात चर्च आणि डावे (नक्षली) यांची हातमिळवणी आहे. धर्म प्रमाण मानणारे आणि धर्म अफूची गोळी समजणारे दोन्ही एकच ! Cultural communism आणि Wokism चे हे उदाहरण!! उद्देश एकच – भारत राष्ट्राचे विघटन!!

आमचे तीर्थ, प्रसाद म्हणजे अंधश्रद्धा पण तेच पाद्री मंत्र म्हणून देत असलेला पाणी म्हणजे येशूचा चमत्कार! आम्ही केलेली देवाची प्रार्थना, उपवास ही अंधश्रद्धा पण रविवारची चर्चमधील प्रार्थना म्हणजे येशूचा विज्ञानवादी आविष्कार. पृथ्वी गोल आहे म्हणणाऱ्या गॅलिलिओला तुरुंगात पाठवणारा संप्रदाय विज्ञानवादी आणि ग्रहांच्या स्थितीवर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण कधी असणार, हे सांगणारा हिंदू धर्म मात्र अवैज्ञानिक!

सगळीकडे अत्याचार होण्याचे ठिकाण मंदिर, अत्याचार करणार कोण ? तर शेंडी ठेवलेले पुजारी आणि या असहाय अत्याचारित महिला, मुले यांना आसरा कोण देणार तर हमखास चर्चचा पाद्री. अनाथ बालकांना बेवारस सोडणारे हिंदू आई बाप पण अनाथ गृहे (ऑर्फनेज) चालवणारे मात्र ख्रिश्चन पाद्री. हे सिनेमा, नाटक, कथा, कादंबरी यात चित्रित होत असताना आम्ही बघत राहिलो आणि त्याचा सुप्त मनावर होणाऱ्या परिणामातून आमच्याच विरुद्ध आम्ही विमर्श कधी प्रस्थापित करत गेलो, हे आम्हाला कळलेच नाही.

मध्ययुगात वावरणाऱ्या एकेश्वरवादी पंथांनी संपूर्ण मानवसृष्टीचे नुकसान केले. या पंथातील तत्त्वज्ञानाचे सार म्हणजे survival of the fittest हे आहे. त्याला उत्तर जर सर्वे भवन्तु सुखिनः असेल तर आपल्या समाजाला पुन्हा हिंदू करणे काळाची गरज आहे.

Exit mobile version