प्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीने विकसित केलेल्या एआय चॅटबॉट, ग्रोकशी साधलेला एक संवाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांच्या झालेल्या संवादाची एक पोस्ट शेअर करण्यात आली असून ती व्हायरल झाली आहे. एलोन यांनी ग्रोकला हिंदू देवता गणपतीविषयी विचारले होते. यानंतर ग्रोकने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एलोन मस्क यांनी हिंदू देवता- अडथळे दूर करणारे म्हणून ओळखले जाणारे- भगवान गणेशाची प्रतिमा अपलोड केली आणि विचारले, “हे काय आहे?” यानंतर एआय टूलने त्या प्रतिमेचे विश्लेषण केले, जी पारंपारिक दक्षिण भारतीय पितळेची मूर्ती असल्याचे दिसून आले आणि ती भगवान गणेशाची मूर्ती असल्याचे अगदी अचूक ग्रोकने ओळखले. ग्रोकने पुढे देवतेच्या प्रतीकात्मक घटकांचे आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचे वर्णन करून सविस्तर स्पष्टीकरण दिले. “ही हिंदू देवता असलेल्या गणपतीची एक लहान पितळेची (किंवा कांस्य) मूर्ती आहे, असे चॅटबॉटने उत्तर दिले.
— Elon Musk (@elonmusk) November 11, 2025
पुढे म्हटले की, महत्त्वाची ओळख पटवणारी वैशिष्ट्ये: एकाच दंतासह हत्तीचे डोके, पारंपारिक वस्तू धरलेले चार हात आणि डोक्याच्या मागे सजावटीची कमान असलेला कमळाच्या तळावर बसलेला. पायाजवळील उंदीर जे गणेशाचे वाहन आहे, असे त्यात म्हटले आहे. चॅटबॉटने पुढे म्हटले आहे की, अशा मूर्ती सामान्यतः घरातील देवस्थानांमध्ये आढळतात आणि दैनंदिन पूजेसाठी वापरल्या जातात.
हे ही वाचा..
षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही!
दिल्ली स्फोटातील संशयित डॉ. उमर शिकवत असलेल्या फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात छापेमारी
“भारतावरील कर कमी करणार पण…” काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
लाल किल्ला बॉम्बस्फोटातील संशयित, फरीदाबाद मॉड्यूलच्या डॉ. उमरचा फोटो आला समोर
एलोन मस्क यांची ही पोस्ट लवकरच व्हायरल झाली. वापरकर्त्यांनी चॅटबॉटची अचूकता आणि सांस्कृतिक समजुतीचे कौतुक केले. तसेच अनेक वापरकर्त्यांनी एआयच्या तपशीलांच्या अचूकतेबद्दल आणि खोल ज्ञानाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे ओळखण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता किती पुढे गेली आहे यावर टिप्पणी केली.







