१७६१ ला झालेल्या पानिपतच्या युद्धानंतर १० ऑगस्ट १७६३ मध्ये थोरले माधवराव पेशवे यांनी हैदराबादच्या निजामाचा आताच्या बीडमधील राक्षसभुवन येथे दारुण पराभव केला. त्यामुळे १० ऑगस्ट हा दिवस हिंदवी साम्राज्य विजय दिन म्हणून साजरा केला जातो. एका हिंदू राजाचा इस्लामिक शासकावर विजय म्हणून या दिवसाला महत्त्व आहे.
यानिमित्ताने १० ऑगस्टला होणाऱ्या २६२व्या हिंदवी साम्राज्य विजय दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम श्री शनैश्वर मंदिर परिसर, राक्षसभुवन, ता. गेवराई, जिल्हा बीड येथे होणार आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये पोहोचले!
मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम!
१५ दिवसांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह काठमांडूमध्ये सापडले
सिगारेट न दिल्याने पठ्ठयानी दुकानदारावर पिस्तूल रोखली, मिर्झापूर मधील घटना
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असेल ती कॅबिनेट मंत्री अतुल सावे, छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षा अभियानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, विचारवंत प्रकाश महाजन, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज कुणाल दादा मालुसरे तसेच प्रमुख वक्ते असतील इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांची.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, शनिदेव पूजन, शस्त्र पूजन, गोमाता पूजन, अश्व पूजन, ध्वज पूजन तसेच थोरले माधवराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाईल.
समस्त हिंदू आघाडी, हिंदवी साम्राज्य विजय दिन उत्सव समिती या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. संपर्क : 9112999294







