पावसाळी अधिवेशनावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे यांच्यासह भेटून मजार मोगल सम्राट बादशाह शहंशाह हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड हटवण्याचे निवेदन दिले होते. त्या निवेदनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश करून अ प्रमाणे कारवाई करा असा शेरा केला होता. त्याची प्रत घेऊन आज हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व हिंदू एकताचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी यांना भेटून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आदेशाची प्रत देण्यासाठी जाणार होते. पण छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व हिंदू व एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा बंदीची नोटीस काढली.
यावेळी हिंदू एकतेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली येथील शिवतीर्थ जवळ सदर जिल्हा बंदीचा व छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात संतप्त निदर्शने करून जाहीर निषेध केला.
यावेळी बोलताना हिंदू एकताच आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, पावसाळी अधिवेशनावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना औरंगजेबाच्या थडग्यावरील “मजार मोगल सम्राट बादशहा शहनशहा हजरत औरंगजेब आलमगीर” नावाचा बोर्ड काढण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने निवेदन दिले होते. त्या निवेदनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाच्या थडगावरील “मजार मोगल सम्राट बादशहा शहनशहा हजरत औरंगजेब आलमगीर” नावाचा बोर्ड काढण्याचे फोनवरून आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु पंधरा दिवस झाले तरीही महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही म्हणून आम्ही त्या आदेशाची प्रत घेऊन त्या आदेशाची अंमलबजावणी करून कारवाई करावी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना सदरच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी जाणार होतो. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जिल्हा बंदी केलेली आहे.
हे ही वाचा:
‘मोदी, योगी यांचे नाव घेण्यासाठी दबाव होता!’
‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असे कोणाला म्हणाले राज पुरोहित
जिल्हा प्रशासन हे हिंदुत्वाचा व शिवभक्तांचा आवाज दडपन्याचा प्रयत्न करत आहे. तरी सदर छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हाधिकारी याची तात्काळ बदली करून औरंगजेबाच्या थडग्यावरील “मजार मोगल सम्राट बादशहा शहनशहा हजरत औरंगजेब आलमगीर” नावाचा बोर्ड काढून टाका व औरंगजेबाच्या कबरीवर गलफ, फुले, चादर चढवण्यास बंदी घाला. अन्यथा येत्या आठ दिवसात हिंदू एकता आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथे येऊन सदरचा बोर्ड काढून फेकून देईल.
यावेळी जिल्हा बंदीच्या नोटीसा घेऊन आलेल्या प्रशासनाचे अधिकारी यांच्याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाची प्रत व हिंदू एकता आंदोलनाच्या निवेदनाची प्रत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी देण्यात आली.
यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, संजय जाधव, दत्ता भोकरे, मनोज साळुंखे, सोमनाथ गोटखिंडे, प्रदीप निकम, अवधूत जाधव, अनिरुध्द कुंभार, गजानन मोरे, कृष्णा नायडू, अरविंद येतनाळे, अरुण वाघमोडे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, शांताराम शिंदे, रवींद्र वादवणे, रवी सावंत, सुमित शिंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.







