अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्रीरामांच्या जन्मतिथि निमित्त ठाण्यात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू जागृती न्यास संचालित घंटाळी मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे या रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा भाग म्हणूनच भगवान श्रीरामांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
रविवार, १० एप्रिल रोजी रामनवमीचे औचित्य साधून दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. विष्णूयागाने या कार्यक्रमाला सुरूवात होईल. दहा वाजेपर्यंत हा विष्णूयाग चालणार आहे. नौपाडा परिसरातील घंटाळी मंदिरात हा रामजन्मोत्सव पार पडेल. सकाळी अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत सुप्रसिद्ध किर्तनकार वर्षा रानडे सहस्रबुद्धे यांचे राम जन्माचे किर्तन असणार आहे. तर दुपारी तीन ते पाच भजन सेवा रंगणार आहे.
हे ही वाचा:
भारतीय केळी, बेबीकॉर्नची कॅनडा वारी
आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या
सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; तर आंदोलकांना १४ दिवसांची कोठडी
आता यूपीतील जनतेला मिळणार देशात कुठेही रेशन
त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता भगवान श्रीरामचंद्रांची पालखी घेऊन भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. ढोल ताशाच्या गजरात तसेच लेझीम खेळत ही मिरवणूक निघेल. तर आठ वाजता मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण आणि महाआरती होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे







