26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरधर्म संस्कृतीअफगाणिस्तानात भर स्टेडियममध्ये १३ वर्षीय मुलाने दिली मृत्युदंडाशी शिक्षा

अफगाणिस्तानात भर स्टेडियममध्ये १३ वर्षीय मुलाने दिली मृत्युदंडाशी शिक्षा

कुटुंबाची हत्या करणाऱ्या शरियानुसार शिक्षा

Google News Follow

Related

पूर्व अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतातील एका सार्वजनिकरित्या मृत्युदंड दिल्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ  सोशल मीडियावर समोर आला आहे. अनेक वृत्तसंस्थांच्या  माहितीनुसार, येथे एका कौटुंबिक हत्याकांडात दोषी ठरलेल्या व्यक्तीला मंगळवारी खोस्तमधील एका स्टेडियममध्ये ठार मारण्यात आले. त्या व्यक्तीने एका कुटुंबातील १३ लोकांची हत्या केली होती, ज्यात ९ लहान मुलांचा समावेश होता.

ही शिक्षा सुमारे हजारो लोकांच्या उपस्थितीत देण्यात आली. विशेष म्हणजे, ही शिक्षा त्या पीडित कुटुंबातील १३ वर्षांच्या मुलाने दिली, कारण त्याच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य या हत्याकांडात मारले गेले होते.

शिक्षा दिलेल्या व्यक्तीची ओळख तालिबान अधिकाऱ्यांनी मंगल अशी केली आहे. त्याला अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले होते आणि तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह आखुंदजादा यांनी त्याच्या मृत्युदंडाला मंजुरी दिली होती.

या सार्वजनिक मृत्युदंडावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी याला “अमानुष, क्रूर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात” असल्याचे म्हटले.

हे ही वाचा:

पुतिन यांच्या भेटीपूर्वी भारत- रशियामध्ये ‘या’ लष्करी कराराला मिळाली मान्यता

“पाकिस्तानचे दावे हास्यास्पद!” भारताने फटकारले

‘सर्वोच्च’ खदखद की, अप्रासंगिक झाल्याची सल?

तमिळनाडूच्या पाच उत्पादनांना जीआय टॅग

ही मृत्युदंडाची शिक्षा तालिबानने २०२१ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर केलेल्या ११व्या न्यायालयीन मृत्युदंडाची घटना असल्याचे अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

अफगाण सर्वोच्च न्यायालयाने एका निवेदनात म्हटले, खोस्त प्रांतात एका खुनीवर ‘किसास’ (प्रतिशोधाच्या इस्लामिक शिक्षेनुसार) दैवी आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.  न्यायालयाने पुढे सांगितले की, “सभेच्या शेवटी राष्ट्रीय सुरक्षेच्या बळकटीसाठी, लोकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांपर्यंत अधिक सहज पोहोच मिळण्यासाठी आणि संपूर्ण देशात इस्लामिक शरीयतची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.”

खोस्तमधील क्रीडा स्टेडियममध्ये झालेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला हजारो लोक ज्यात पीडितांच्या नातेवाईकांचाही समावेश होता, उपस्थित होते. खोस्तचे तालिबान राज्यपाल यांचे प्रवक्ते मोस्तघफर गुरबाज यांनी पुष्टी केली की मंगलला सुमारे १० महिन्यांपूर्वी अली शीर आणि तेरेझिओ जिल्ह्यांमध्ये राहणारे अब्दुल रहमान आणि त्यांचे इतर कुटुंबीय यांची हत्या केल्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले होते. व्हिडिओमध्ये स्टेडियमच्या आत आणि बाहेर हजारो लोकांनी खचाखच गर्दी केली आहे असे दिसते. पाच गोळ्यांचे आवाज होताच लोकांनी धार्मिक घोषणाबाजी सुरू केली.

अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “खूनी मंगल, ताला खानचा मुलगा आणि रहमत खानचा नातू, पक्तिया प्रांतातील सईद करम जिल्ह्यातील साजनक भागातील मूळ रहिवासी असून खोस्त प्रांतातील अलीशेरो आणि तेरेझिओ जिल्ह्याच्या कुजी अबुखानी भागात सध्या राहत होता.
त्याने जाणीवपूर्वक अब्दुल रहमान — जबित यांचा मुलगा, अली खानचा नातू याची हत्या केली होती.”

सर्वोच्च न्यायालयाचे एक पत्रक एक्सवर पोस्ट करण्यात आले. तालिबान अधिकाऱ्यांच्या मते, या व्यक्तीला पहिल्या न्यायालय, अपील न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय — या सर्व न्यायिक प्रक्रियांनंतर दोषी ठरवण्यात आले. पीडितांच्या कुटुंबियांना क्षमादान किंवा समझोत्याचा पर्याय देण्यात आला होता, ज्यामुळे मंगलचे प्राण वाचू शकले असते. परंतु कुटुंबीय मृत्यूदंडावर ठाम राहिले.

स्थानिक स्रोतांच्या हवाल्याने अफगाणिस्तानच्या अमू न्यूजने सांगितले की, फाशीची अंमलबजावणी त्या 13 वर्षांच्या मुलाने केली, ज्याला आधी विचारण्यात आले होते की तो दोषी व्यक्तीला माफ करू इच्छितो का. त्याने क्षमा करण्यास नकार दिल्यानंतर त्यानेच घातक गोळी झाडली.

खोस्त पोलिस प्रवक्ता मुस्तघफिर गुरबाज यांनीही मंगळची ओळख पटवून सांगितले की हा खटला एका संपूर्ण विस्तारित कुटुंबाच्या — ज्यात नऊ मुले आणि त्यांची आई — यांच्या हत्येशी संबंधित होता, असे अमू न्यूजने नोंदवले आहे.

“ही आहे इस्लामी व्यवस्था आहे, जी कोणालाही घाबरत नाही आणि अल्लाहच्या आज्ञा पृथ्वीवर अंमलात आणते,” असे काबूलस्थित पत्रकार डब्ल्यू. ए. मुबारिझ यांनी एक्स वर पोस्ट केले.

अफगाणिस्तानातील तालिबान आणि त्यांची “न्याय” पद्धत

तालिबानने पुन्हा कठोर शरिया कायदा लागू केला आहे, ज्यामध्ये सार्वजनिक मृत्युदंड, चाबकाने मारणे आणि इतर शारीरिक शिक्षांचा समावेश आहे. हे १९९० च्या दशकाच्या अखेरीस त्यांच्या मागील राजवटीत वापरलेल्या पद्धतींचे पुनरुज्जीवन मानले जाते.

मानवाधिकार संघटनांनी वारंवार तालिबानच्या न्यायव्यवस्थेवर पारदर्शकतेचा अभाव, योग्य न्यायप्रक्रियेची कमतरता आणि न्यायाधिकारातील अन्याय यासाठी टीका केली आहे. यूएनचे अफगाणिस्तानसाठी विशेष प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी या फाशीचा तीव्र निषेध केला. त्यांनी एक्सवर लिहिले, “सार्वजनिक देहदंड अमानवीय आहे, ही क्रूर आणि असामान्य शिक्षा असून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे. त्यांनी तालिबानला त्वरित सार्वजनिक मृत्युदंड आणि बदला घेण्याच्या हत्या थांबवण्याचे आवाहन केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा