28 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरधर्म संस्कृतीगौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची हीच वेळ

गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची हीच वेळ

Google News Follow

Related

आपल्यातील काही घटक हे समाजात तिरस्कार परसरवत आहेत. हे मानवतेसाठी धोकादायक आहे. गौतम बुद्धांचे आयुष्य हे एखाद्या दीपस्तंभासारखं आहे. मानवतेवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र यावं आणि बुद्धांच्या शिकवणीच्या आधारे मानवजातीसाठी काम करुन ते सुंदर करावं. जगभर तिरस्कार पसरत असताना गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे, असं बौद्ध पोर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आज वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगभरातील बौद्ध भिक्खुंशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या वतीनं संयुक्तपणे करण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जगासमोर हवामान बदलाचं संकट आवासून उभं आहे, धृवांवरील बर्फ वितळत आहे. जग एका मोठ्या संकटातून जात आहे. अशा वेळी गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग महत्वाचा आहे. निसर्गाचा आदर करणे, पृथ्वीचे संवर्धन करणे ही गौतम बुद्धांची शिकवण आहे. जगभरातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी असलेला भारतही शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे याचा अभिमान आहे.”

कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचं सांगत मोदी म्हणाले की, “कोरोनामुळे अनेकांना दु:ख आणि वेदना सहन करावी लागली. गेल्या अनेक दशकांत अशा पद्धतीची महामारी आली पाहिली नव्हती.”

वर्षभरात कोरोनावर लस शोधणाऱ्या डॉक्टरांचा अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी जगभरातील ५० हून अधिक बौद्ध भिक्खुंनी भाग घेतला होता.

हे ही वाचा:

‘सुपर स्प्रेडर’ शेतकरी आंदोलनाला आज दिल्लीत सुरवात

व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट; १ जूनपासून शटर उघडणारच

डॉ. जयंत नारळीकर उलगडणार ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठा’

बारावी परीक्षेवरून विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना बौद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, “बुद्धांची शिकवण संपूर्ण जगाला दु:ख आणि वेदनेपासून मुक्तीचा मार्ग दाखवते. बुद्धांच्या ज्ञान, करुणा आणि सेवेच्या मार्गावर चालत सर्व देशवासियांनी एकजुटता दाखवावी आणि सर्वांना कोरोनातून मुक्ती मिळावी.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा