30 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरधर्म संस्कृती'जेएनयू'मध्ये मराठीचा झेंडा आता फडकणार! कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र

‘जेएनयू’मध्ये मराठीचा झेंडा आता फडकणार! कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलैला उद्घाटन

Google News Follow

Related

दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) मराठी भाषेसाठी स्वतंत्र अध्यासन केंद्र असावं, ही कल्पना १७ वर्षांपूर्वी मांडली होती. पण ही कल्पना वर्षानुवर्षं कागदावरच राहिली. अनेक परिपत्रकं, बैठकं, आश्वासनं झाली. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीच झाली नाही. मराठी विद्यार्थ्यांच्या मनात एक खोल प्रश्न सतत भिरभिरत राहिला: “आपल्या भाषेला इथे स्थान कधी मिळणार?”आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रखडलेल्या प्रकल्पाला नवसंजीवनी दिली. ‘प्रलंबित राहिलेलं काहीही अपूर्ण ठेवायचं नाही’ या त्यांच्या कार्यशैलीनुसार त्यांनी ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रा’चा प्रस्ताव पुन्हा पुढे रेटला आणि केवळ काही महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत हे केंद्र प्रत्यक्षात आणलं. २४ जुलै रोजी फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्राच्या स्थापनेचा कोनशिला समारंभही पार पडणार आहे.

‘कुसुमाग्रजांच्या नावाचे मराठी भाषेचे केंद्र सुरू होणे म्हणजे मराठीचा अभिमान आणि अस्मिता यांचाच गौरव आहे. ‘जेएनयू’मध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय २००५ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. परंतु आजवर मराठी भाषेसाठी ‘मेळावे’, ‘सभासद संमेलने’, ‘भाषणाचे गाजावाजा’ असे उपक्रम भरपूर झाले. तथापि प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय, शैक्षणिक पातळीवरील प्रयत्न आणि प्रशासकीय कृतिशीलता कमीच होती. याउलट फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अनेक ठोस निर्णय झाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी दिल्लीत अहर्निश प्रयत्न केले गेले.३ ऑक्टोबर २०२४ला ‘अभिजात मराठी दिवस’ म्हणून जाहीर केला असून मराठी अभिजात सप्ताहदेखील साजरा होणार आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी उच्च शिक्षणात तिचा वापर सुरू केला. मराठी माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षण सुरू करणे, कृषी आणि तांत्रिक शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय असेल वा ‘एमपीएससी’च्या सर्व परीक्षा मराठीतून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय असेल; हे सगळेच निर्णय एकात्मिक दृष्टिकोनातून झाले. भाषिक अस्मितेची व्याख्या केवळ घोषणांपुरती न ठेवता ती शिक्षण, प्रशासन आणि संशोधन यांच्यात प्रत्यक्ष उतरविण्याची ही दिशादर्शक वाट आहे. मराठीचा वापर शासकीय व्यवहारात सक्तीने लागू करण्याचा निर्णय मराठीप्रेमी सरकारने घेतला. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठीतून संवादही आता अनिवार्य केला गेला आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी जी ठोस पावले उचलली, ज्या उपाययोजना राबवल्या, त्या प्रत्यक्षात आणताना, त्याचा राजकीय लाभ काय होईल किंवा भाषिक मतांच्या समीकरणांची गणिते मांडण्यासाठी नव्हे. ठाकरे बंधूना निवडणुका जवळ आल्या की मुंबईतील मराठी भाषिकांची आठवण होते आणि मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो. निवडणुका झाल्या की पुन्हा मायमराठीचा विषय ते गुंडाळून बाजूला ठेवून देतात. मात्र डबल इंजिन सरकारची कार्यपद्धती तशी नाही. सरकारची भूमिका ही केवळ प्रशासकीय नाही, तर ती सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्याही परिवर्तनाची आहे.

जेएनयूच्या भिंती आता शिवरायांचा जयघोष ऐकतील!

कधी काळी जेएनयू हे ‘डाव्या विचारांचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखले जात होते. याच विश्वविद्यालयात भारतविरोधी घोषणांनी भिंती थरथरल्या होत्या. “भारत तेरे टुकड़े होंगे” आणि “अफझल हम शर्मिंदा हैं…” असे घोष, तिरंग्याचा अवमान, आणि ‘आजादी’च्या गोंगाटात देशाच्या अस्मितेलाच प्रश्नांकित करण्यात आलं होतं.

मात्र आता तिथे नवा अध्याय लिहिला जातोय. याच जेएनयूच्या परिसरात आता छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्र उभं राहतंय. एका अशा हिंदू राष्ट्रनायकावर अभ्यास होणार आहे, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, मुघल-सुलतानशाहीला ललकारी दिली आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षतेचा खरा पाया घातला. ही केवळ घटना नाही, ही इतिहासाने केलेला काव्यात्म न्याय आहे.

 

हे ही वाचा:

भारताने ५ वर्षांनंतर चिनी नागरिकांसाठी दरवाजे पुन्हा उघडले!

लालू कुटुंबाविरुद्धचा निर्णय आता ५ ऑगस्टला

संसदेत राजकीय तणावामुळे गोंधळाची शक्यता

बिहारच्या मतदार यादीतून ५२ लाखांहून अधिक नावे वगळली!

 

या अध्यासन केंद्रात अभ्यासले जाणार आहेत:
हिंदवी स्वराज्याचा इतिहास व धोरणं
गनिमी काव्याची युद्धनीती आणि शिवरायांचं नौदल धोरण
शिवरायांची रामकृष्ण नीती आणि सामरिक बुद्धिमत्ता
तत्कालीन समाजव्यवस्था आणि स्त्री-सक्षमीकरण
महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण
भक्ती संप्रदायातील संत परंपरा आणि सामाजिक प्रभाव‘डिप्लोमा’ आणि ‘पोस्ट ग्रॅज्युएट’ अभ्यासक्रमांद्वारे या विषयांवर शास्त्रशुद्ध संशोधन होणार आहे. डॉ. अरविंद वेल्लारी आणि डॉ. जगन्नाथन यांसारखे तज्ज्ञ अभ्यासक यात योगदान देणार आहेत. हे केंद्र म्हणजे छत्रपतींच्या कार्याला जागतिक बौद्धिक व्यासपीठावर मान्यता मिळवून देण्याचा यत्न आहे.

मराठी, छत्रपती, आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन

‘राष्ट्रविरोधी डाव्या विचारां’साठी कुप्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठात ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र’ सुरू होणं, ही एक सखोल सांस्कृतिक पुनर्रचना आहे. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या अभिमानाच्या ओळीस पुन्हा अर्थ मिळतो आहे. आज मराठीच्या आणि शिवरायांच्या नावाने केवळ घोषणा देणारे अनेक असतील, पण महाराजांचे विचार आचरणात आणणाऱ्यांना ही घटना निश्चितच प्रेरणा देणारी आहे. जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्र उभं राहत आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे — राष्ट्रविघातक विचारांना आता जागा उरणार नाही. “भारत तेरे तुकडे होंगे…” म्हणणाऱ्यांची आता खैर नाही. कारण जिथे छत्रपतींचा विचार जागृत असतो, तिथे राष्ट्रविरोधी शक्तींचं अस्तित्व शक्यच नाही!

 

जेएनयूमधील मराठी केंद्र – मूलभूत माहिती
स्कूल ऑफ लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चर स्टडीज (SLL&CS) अंतर्गत सेंटर ऑफ इंडियन लँग्वेजेस (CIL) मध्ये मराठी शिकवली जाते.

येथे साहित्य, भाषाशास्त्र आणि भाषांतर अभ्यास यांचा समावेश होतो.

CIL मध्ये शिकवल्या जाणाऱ्या ९ भारतीय भाषांपैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे.

  • ८.३ कोटीहून अधिक मराठी मातृभाषिक
    → जेएनयूसारख्या राष्ट्रीय विद्यापीठात मराठी अभ्यास केंद्र असणे आवश्यक आहे, कारण या भाषेचा समाजावर मोठा प्रभाव आहे.
  • ९.९ कोटी एकूण मराठी भाषिक
    → उच्चशिक्षणातील मराठी साहित्य, अनुवाद, आणि सांस्कृतिक संशोधनाची गरज अधोरेखित होते.
  • ८,८४७ एकूण विद्यार्थी (२०२१)
    → यामध्ये काही विद्यार्थी भारतीय भाषांमध्ये विशेष अभ्यास करतात; नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) मराठीसारख्या स्थानिक भाषांना महत्त्व प्राप्त होत आहे.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा