नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या एकात्मतेला असलेला धोका अधोरेखित केला. त्यांनी स्पष्ट केले की, “एकतेतील विविधता” हे भारताचे प्राण असून, जात, भाषा, प्रांतीयवाद आणि अतिरेकी विचार यामुळे निर्माण होणारे विभाजन राष्ट्राला आतून कमकुवत करू शकते.
मोदी म्हणाले, “सामाजिक समानता म्हणजे वंचितांना प्राधान्य देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे. मात्र आज अतिरेकी विचार, प्रांतीयवाद, जातीय-भाषिक वाद, बाह्य शक्तींचे षडयंत्र—अशा असंख्य संकटांचा सामना आपल्याला करावा लागत आहे.”
लोकसंख्यात्मक बदलावर विशेष भर
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की घुसखोरी) व बाह्य शक्तींचे धोके कायम असले तरी, आज सामाजिक समानतेसमोर अधिक मोठं आव्हान लोकसंख्यात्मक बदल आहे. हे प्रकरण केवळ अंतर्गत सुरक्षेशीच नाही तर भविष्यातील शांततेशी जोडलेलं आहे, असे ते म्हणाले. याच कारणामुळे त्यांनी लाल किल्ल्यावरून “Demographic Mission” ची घोषणा केली होती. “आपली लोकसंख्या रचना बदलण्याचा कट सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनवून आपली एकता खंडित करण्याचे डाव रचले जात आहेत,” असा कठोर इशारा त्यांनी दिला.
हे ही वाचा:
लढाऊ विमानांसाठी एचएएलला जीई-४०४ जेट इंजिन
यूपीआय व्यवहारांवर शुल्क लावण्याचा प्रस्ताव नाही
बरेली हिंसाचार: तौकीर रझाचे दोन सहकारी गोळीबारात जखमी, अटक!
दिल्लीत पोलिस, गुन्हेगारांमध्ये चकमक
सरकारच्या कामगिरीवर समाधान
मोदींनी सांगितले की, सरकार या आव्हानांना वेगाने उत्तर देत आहे, आणि त्याबाबत ते “अत्यंत समाधानी” आहेत.
विशेष टपाल तिकिट व स्मृती नाण्याचे प्रकाशन
या प्रसंगी मोदींनी आरएसएसच्या योगदानाचा गौरव करणारे स्मृती चिन्हे राष्ट्राला अर्पण केली. ₹१०० चे स्मृती नाणे : एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह, तर दुसऱ्या बाजूला प्रथमच “भारत माता”ची प्रतिमा – सिंहावर विराजमान, तिच्यासमोर वंदन करणारे स्वयंसेवक. विशेष टपाल तिकिट : १९६३ च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये स्वयंसेवकांच्या अभिमानास्पद सहभागाचे चित्रण.
मोदींनी शेवटी देशवासियांना आवाहन केले की सामाजिक समानतेचे मूल्य सतत जपले गेले पाहिजे आणि “एकतेतील विविधता” हीच राष्ट्राची खरी ताकद आहे.







