छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्र विषयांवरील भव्य उपक्रम

१०० चित्रकाव्यांचे भव्य कलादालन

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्र विषयांवरील भव्य उपक्रम
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या सहकार्याने आणि सईशा प्रोडक्शन्स, मुंबई निर्मित व प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज आणि “शिवचरित्र” या विषयांना संपूर्णतः वाहिलेल्या ४ दिवसीय भव्य अशा उपक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर येथे करण्यात आलेले आहे. निमित्त आहे ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा वर्षसोहळा…
सदर उपक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल..
१. शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन – संपूर्ण शिवचरित्र, आपली संस्कृती, आपले गडदुर्ग, शिवकाळातील परिचित-अपरिचित योद्धे आणि अशा सर्वच विषयांवर आधारित १०० चित्रकाव्यांचे भव्य कलादालन ४ दिवस म्हणजेच २३, २४, २५, २६ मे २०२४ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. सकाळी १० वा. ते रात्रौ ८ वाजेपर्यंत हे दालन सर्वांसाठी खुले असेल. (प्रवेश विनामूल्य आहे.)
हे ही वाचा:
“काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय”
लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार
पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मॅनेजरचे निलंबन; मतदानाच्या आदल्या रात्री खुली होती बँक
२५ गोळ्या मारून पाकिस्तनाचे ड्रोन बीएसएफने पळवून लावले!
२. ” संगीत शिवस्वराज्यगाथा ” या संपूर्ण शिवशाहीवर आधारित ४२ नवगीतांमधून साकारलेल्या धगधगत्या संगीतमय शिवचरित्राचे सादरीकरण रविवार २६ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे असेल. गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई, दीप्ती आंबेकर, अनिल नलावडे हे असतील तर ओघवत्या शैलीतील शिवचरित्र कथन पद्मश्री राव यांचे असेल. या गीतांना भव्य एलईडी स्क्रीनवर जुन्या ऐतिहासिक चलचित्रांची साथसोबत असेल.
अशा या शिवचरित्रातील आचार, विचार, संस्कारांनी प्रेरित ४ दिवसीय भव्य उपक्रमास आपण सर्वांनीच आपल्या कुटुंबियांसहित, मित्रपरिवारांसहित भेट द्यावी. तसेच शाळा, महाविद्यालये आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी, तरुण पिढीने याचा जरूर लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे, आपल्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया ग्रुप्सवर सदर उपक्रमाची माहिती नक्की शेयर करावी जेणेकरून हे राष्ट्रकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य लाभेल, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि सईशा प्रोडक्शन्स यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: सईशा प्रोडक्शन्स, मुंबई पद्मश्री राव ९८२१५५४१३०
Exit mobile version