31 C
Mumbai
Monday, May 27, 2024
घरराजकारण“काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय”

“काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय”

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबाबतच्या विधानावर नरेंद्र मोदींची सडकून टीका

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशातील कंधमाल येथून जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांसह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला. पाकिस्तानला सन्मान द्यावा या त्यांच्या वक्तव्यावरून नरेंद्र मोदींनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.

मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जबरदस्त निशाणा साधला. मणिशंकर अय्यर यांचे नाव न घेता काँग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “एक दिवस असा होता जेव्हा भारताने जगाला आपल्या क्षमतेची ओळख करून दिली होती. दुसरीकडे काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते आहे. काँग्रेसच्या या कमकुवत वृत्तीमुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांनी ६० वर्षांपासून दहशतीचा सामना केला आहे. देशाला किती दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला? दहशतवाद्यांना धडा शिकवण्याऐवजी हे लोक दहशतवादी संघटनांच्या बैठका घेत असत, हे देश विसरू शकत नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस या लोकांमध्ये नव्हते का? कारण आम्ही कारवाई केली तर आमची व्होट बँक नाराज होईल, असे काँग्रेस आणि इंडी आघाडीला वाटत होते,” असा घाणाघाती शाब्दिक हल्लाबोल नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला.

यावेळी त्यांनी पोखरण अणुचाचणीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “२६ वर्षांपूर्वी याच दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती आणि आम्ही दाखवून दिले होते की, देशभक्तीने ओतप्रोत असलेले सरकार राष्ट्रहितासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, देशातील जनतेसाठी काम करेल. एक दिवस असा होता की भारताने आपल्या क्षमतेची ओळख जगाला करून दिली. दुसरीकडे काँग्रेस आपल्याच देशाला वारंवार घाबरवण्याचा प्रयत्न करते आहे,” असं नरेंद्र मोदी सभेत म्हणाले.

हे ही वाचा:

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकविरोधी निदर्शनात फडकला तिरंगा

२५ गोळ्या मारून पाकिस्तनाचे ड्रोन बीएसएफने पळवून लावले!

लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

खळबळजनक! आई, पत्नी, मुलांची हत्या करून आरोपीची गोळ्या झाडून आत्महत्या

मणिशंकर अय्यर एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, “भारताने पाकिस्तानचा सन्मान केला पाहिजे. कारण आपल्या शेजारी राष्ट्राकडे अणुबॉम्ब आहे. आपण सन्मान राखला नाही तर ते अणुबॉम्ब हल्ला करण्याचा विचार करु शकतात. विद्यमान सरकार म्हणते की, तिथे दहशतवाद असल्याने आम्ही पाकिस्तानशी बोलणार नाही. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा महत्त्वाची आहे. अन्यथा पाकिस्तानला वाटेल की, भारत अहंकारामुळे आम्हाला जगात छोटं दाखवत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधला कोणताही वेडा माणूस अणुबॉम्बचा वापर करु शकतो,” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा