29.4 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरविशेषनेतान्याहूंचा ‘मोदी जॅकेट’ लूक; पंतप्रधान मोदींसाठी खास सरप्राइज!

नेतान्याहूंचा ‘मोदी जॅकेट’ लूक; पंतप्रधान मोदींसाठी खास सरप्राइज!

खास व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट

Google News Follow

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जेरुसलेममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास आश्चर्य भेट देऊ केली. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या जेवणापूर्वी नेतान्याहू यांनी विशेष पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करून त्यांचे समकक्ष नरेंद्र मोदी यांना आश्चर्यचकित केले. याचा खास व्हिडीओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत त्याला हिंदीतून कॅप्शनही दिले आहे. त्यामुळे इस्रायल आणि भारत यांच्यातील दृढ संबंधांची चर्चा पुन्हा एकदा झाली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी त्यांचे भारतीय समकक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या संयुक्त जेवणापूर्वी पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करून आश्चर्यचकित केले. त्यांनी पांढऱ्या फुल-स्लीव्ह शर्टवर राखाडी रंगाचे ‘नेहरू जॅकेट’ किंवा ज्याला ‘मोदी जॅकेट’ म्हणतात ते परिधान केले होते. तसेच गडद नेव्ही फॉर्मल ट्राउझर्स आणि पॉलिश केलेले काळे लेदर शूज घातले होते. तसेच सोशल मीडियावर हिंदीमध्ये लिहिले की, “आमच्या संयुक्त जेवणापूर्वी, मी पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करून माझे मित्र पंतप्रधान मोदींना आश्चर्यचकित केले.”

हे ही वाचा:

“आताही आणि पुढेही भारत पूर्ण विश्वासाने इस्रायलसोबत”

दानाच्या बहाण्याने वृद्धांना लुटणारा ‘इराणी’ अंधेरी पोलिसांच्या जाळ्यात

इराणनंतर पाकिस्तानचा गेम?

व्हेनेझुएलाचे कच्चे तेल पुन्हा भारताकडे

नेसेटमध्ये पोहोचल्यानंतर, सभापती अमीर ओहाना यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यांच्या भाषणापूर्वी, नेतन्याहू, विरोधी पक्षनेते यायर लापिड आणि सभापती ओहाना यांनी पूर्ण बैठकीला संबोधित केले आणि भारत- इस्रायल संबंधांना द्विपक्षीय पाठिंबा दर्शविला. आपल्या भाषणाची सुरुवात करताना, मोदींनी ‘नेसेटचे अध्यक्ष’ पदक मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, ते भारत आणि इस्रायलच्या शाश्वत मैत्री आणि सामायिक लोकशाही परंपरांना समर्पित केले. या प्रसंगाचे औचित्य साधून, नेसेटची इमारत भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळून निघाली होती. आपल्या ३२ मिनिटांच्या भाषणात, मोदींनी दोन्ही राष्ट्रांमधील खोलवर रुजलेले बंध अधोरेखित केले, प्राचीन संस्कृतीतील दुवे तसेच तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याने चालणाऱ्या आधुनिक भागीदारीकडे लक्ष वेधले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा