महाराष्ट्रात अनेक बार, दारूची दुकाने, रेस्टॉरंट यांना गड किल्ल्यांची, देवीदेवतांची, महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. शिवभक्त संग्राम ढोले पाटील यांनी त्याला विरोध दर्शवत गुरुवारी २५ सप्टेंबरला लक्षणीय उपोषण केले.
त्यांनी याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला आवाहन केले आहे. तसेच लोकजागृतीही केली आहे.
ते म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गड किल्ल्यांची, देवीदेवतांची, संतांची, महापुरुषांची नावे दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट यांना देण्यात आली आहेत. हे अपमानजनक आहे. तेव्हा या नावात बदल करण्यात यावा आणि अशी नावे या दुकानाना देता येणार नाहीत, असा जीआर शासनाने काढावा.
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे हे आंदोलन करण्यात आले आणि शासनाच्या निदर्शनास ही बाब आणली गेली. समस्त हिंदू आघाडी, भगवाधारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले.
हे ही वाचा:
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी कृषी क्षेत्राला दिला नवा आकार
पॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा
पंतप्रधान मोदींची राजस्थानला ₹१.२२ लाख कोटींच्या प्रकल्पांची भेट!
अनेक ठिकाणी राजे बार, राजगड रेस्टॉरंट, तोरणा बार या नावाने दुकाने असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावना दुखावतात. म्हणून संग्राम ढोले पाटील यांनी आंदोलन करून ही बाब शासनाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.







