महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना (NDA)चे मुख्य राष्ट्रीय समन्वयक डॉ. अभिषेक वर्मा यांनी वृंदावन येथील जीवन दीप आश्रम उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. या आश्रमाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आणि पूज्य संत, मान्यवर अतिथी आणि उपस्थितीत पार पडले.
या पवित्र प्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, माजी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, साध्वी ऋतंबरा यांचीही उपस्थिती लाभली होती.
हे ही वाचा:
रशियन तेल भारतासाठी ‘महागाईविरोधी ब्रह्मास्त्र’
अफवांचा भंडाफोड! पेट्रोल-डिझेल-गॅस टंचाईची बातमी फेक
अमेरिकेच्या Lincoln युद्धनौकेवर क्रुझ दागल्याचा इराणचा दावा
भारताच्या AI क्षेत्रात मोठी झेप
हा कार्यक्रम वृंदावन या पवित्र भूमीवर सेवा, सनातन मूल्ये आणि राष्ट्रचिंतन यांचा सुंदर संगम म्हणून पार पडला. आपल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली. संतुलित कुटुंब आणि सामाजिक विकासासाठी तीन मुलांचा सिद्धांत त्यांनी समर्थन केला. तसेच अवैध घुसखोरी हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगत समाजाने सजग राहावे, घुसखोरांची ओळख करावी आणि त्यांना देशात रोजगार मिळणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यासोबतच सामाजिक समरसता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सनातन मूल्यांचे संरक्षण ही समाज आणि व्यवस्थेची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आश्रम हे केवळ आध्यात्मिक केंद्र नसून समाज, संस्कार आणि राष्ट्रीय चेतनेला दिशा देणारे केंद्र आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

स्वामी यतिंद्रानंद महाराज मुंबईत आलेले असताना कारुळकर प्रतिष्ठानला भेट दिली होती. प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि स्वामी यतिंद्रानंद महाराजांमध्ये अनेक विषयांवर चर्चाही झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अभिषेक वर्मा यांनी आभार प्रदर्शन करत सरसंघचालक मोहन भागवत, संत समाज आणि सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले आणि हा कार्यक्रम आशीर्वादमय व स्मरणीय केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.







