संभाजी ब्रिगेडच्या या हिंसक आणि जातीयवादी विचारसरणीची विषवल्ली तिचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्याच मेंदूतून आणि लेखणीतून जन्माला आली आहे. त्यांची ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ आणि ‘भटांचा कर्दनकाळ’ ही पुस्तकं म्हणजे जातीय विद्वेषाने बरबटलेली आणि समाजाला कलंकित करणारी विषारी गरळ आहे. ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकातून ब्राह्मण समाजावर अत्यंत विकृत आणि किळसवाणी टीका करण्यात आली. या पुस्तकातली काही अत्यंत अश्लाघ्य विधाने “आम्हाला ब्राह्मणांना मानसिक तसेच सामाजिक शत्रू मानावे लागेल” यांसारखे आवाहन यातून जातीय दंगली भडकवण्याचा आणि समाजात कायमची फूट पाडण्याचा त्यांचा क्रूर आणि स्पष्ट हेतू उघड होतो.
या लेखनापलीकडे खेडेकर यांनी जाहीर सभांमधूनही थेट हिंसाचाराला चिथावणी दिली. साताऱ्यातील एका जाहीर सभेत त्यांनी लोकांना थेट “इथून घरी गेल्यावर कोण कोण बामणांच्या घरावर एक तरी दगड फेकणार त्यांनी हात वर करा” असा जाहीर सवाल करून आपल्या आत दडलेल्या हिंसक आणि गुन्हेगारी मानसिकतेचं उघड प्रदर्शन केलं होतं. या प्रक्षोभक लिखाणामुळे त्यांच्यावर पुणे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ आणि ५०५ अंतर्गत जातीय विद्वेष पसरवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
इतिहासाचं विकृतीकरण, पुतळ्यांचा विध्वंस आणि गुंडगिरीचे राजकारण
भांडारकर प्रकरणानंतरही संभाजी ब्रिगेडने इतिहासाच्या विकृतीकरणाचा आणि गुंडगिरीचा आपला धंदा सुरूच ठेवला.
दादोजी कोंडदेव वाद: दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत असा दावा करत ब्रिगेडने पुण्यातील लाल महालातील त्यांचा पुतळा हटवण्यासाठी आंदोलन केलं. यावेळी सुमारे ३० ते ४० कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात घुसून तोडफोड केली.
राम गणेश गडकरी पुतळा प्रकरण (२०१७): नाटककार राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली पुण्यातल्या छत्रपती संभाजी उद्यान असलेला गडकरींचा पुतळा उखडून मुठा नदीत फेकून दिला. या कृत्याला निर्लज्जपणे ‘वैचारिक लढाई’ असे नाव दिले.
रायगडावरील ‘वाघ्या’ कुत्रा पुतळा वाद: रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेल्या ‘वाघ्या’ कुत्र्याच्या पुतळ्याची तोडफोड करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
दिल्ली: २० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या!
वांद्रे येथे तीन मजली चाळ कोसळली!
पंतप्रधान मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
शाईफेक: विचारांचा सामना विचारांनी करण्याच्या गप्पा करणाऱ्या या टोळक्याने डिसेंबर २०२१ मध्ये लेखक गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमध्ये शाई फेकून आपली लायकी पुन्हा एकदा दाखवून दिली. महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरेंवरही शाई फेकली. जरांगेंविरुद्ध लेखन केलं म्हणून डॉ. विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून त्यांच्यावर शाई ओतली. त्यांचा व्हिडिओ करून प्रसारित केला. ठाणे, नवी मुंबई इथे दैनिक सामनाच्या कार्यालयावर दगडफेक, शाईफेक करण्यात आली.
महापुरुषांचा अवमान: प्रभू श्रीराम, अक्कलकोट स्वामी अशा महापुरुषांबद्दल बदनामीकारक बोलणे, ‘इतिहासाचं पुनर्लेखन’ या नावाखाली लिहिलेल्या निराधार, काल्पनिक भाकड कथांना इतिहास म्हणणे, जाणीवपूर्वक एकाच समाजाला लक्ष्य करणे असे अनेक समाजविघातक उद्योग या ब्रिगेडने केले आहेत.
सामाजिक विद्वेषाला खतपाणी: छत्रपती शाहू महाराजांनी नियुक्त केलेल्या पेशव्यांची बदनामी करताना ब्रिगेडने सगळ्या मर्यादा तोडल्या. ही टीका करताना त्यांनी दलित समाजालाही लक्ष्य केलं आहे. ब्रिगेडच्या लेखकांनी इतिहास म्हणून जे अकलेचे तारे तोडलेत ते सभ्य माणसाला वाचताही येणार नाही. पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकात पान .
५४ -५५ वर खेडेकर मराठा तरुणांना जातीय दंगली घडवयाचं आणि ब्राह्मणांना कापनू, जाळून मारायचं आवाहन करतात.
गुन्हेगारी पार्श्वभूमी: ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. खंडणी, बलात्कार, मारपीट असे गंभीर आणि समाजविघातक गुन्हे या कार्यकर्त्यांनी केले आहेत. सहाय्यक निबंधकाकडून १० लाखांची खंडणी घेताना सुयोग औंधकर आणि इतर दोघांना अटक आणि शासकीय अधिकाऱ्यांना धमकावणे, खंडणी मागणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा कारणांसाठी तडीपारी लागली होती. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी ब्रिगेडचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कुलदीप खुटाळे आणि अन्य पाच आरोपींना अटक करण्यात आली.
इस्लामी दहशतवादी संघटनेशी लागेबांधे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव संघटनेला देऊन इस्लामचं समर्थन करणारी ही संघटना आहे. ब्रिगेडी कार्यकर्ता अरुण गाढवे बुरख्याचं समर्थन करतो. इस्लामच्या प्रचारासाठी ब्रिगेड सदैव तत्पर असते. ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाला जाहीर विरोध करणारा जमाते इस्लामी हिंदचा नेता नौशाद उस्मान याच्यासोबत मुहम्मद पैगंबराचे गुणगान करायला ब्रिगेडी जातात.
कर्माचा फेरा:
अखेर निसर्गाचा नियम लागू झाला. ज्या हिंसेच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर संघटना मोठी झाली; त्याच हिंसेचा प्रसाद अखेर त्यांच्याच नेत्याला मिळाला. अक्कलकोट इथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. त्यांच्या तोंडाला काळं फासून, शाई फेकून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यामागे ‘संभाजी ब्रिगेड’ या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी उल्लेख’ होत असल्याचा आक्षेप होता. गंमत म्हणजे ज्या प्रकारच्या भावनिक आणि अस्मितेच्या मुद्द्यांवरून ब्रिगेडने इतरांवर हल्ले केले, त्याच प्रकारच्या मुद्द्यांवरून त्यांच्या नेत्याला मार खावा लागला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी “जे पेरले तेच उगवले” या शब्दांत या घटनेचे केलेले वर्णन म्हणजे या संघटनेच्या संपूर्ण इतिहासाचे अचूक सार आहे. या हल्ल्यानंतर अचानक गायकवाडांना संविधान, वैचारिक लढाई इ. रडीचे डाव आठवले. पत्रकार परिषदेत ज्या खोट्या खोट्या धीरोदात्तपणाचा आव आणत आपण कसे बळी ठरलो हे रडगाणं गाणाऱ्या गायकवाडांना महाभारतात अभिमन्यूला कोंडीत गाठून अधर्माने मारणाऱ्या कर्णासारखी स्वतःवर तीच वेळ आल्यावर धर्म, नैतिकता आठवू लागली.
गुन्हेगारी, जातीयवाद आणि विध्वंसाचा कलंकित वारसा
संभाजी ब्रिगेडची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही कोणत्याही सामान्य गुन्हेगारी टोळीपेक्षा अधिक धोकादायक आहे. कारण ती वैचारिक आणि जातीय विद्वेषाच्या पायावर उभी आहे. दंगल, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय द्वेष पसरवणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. भांडारकर प्रकरणातला निकाल हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी एक काळा दिवस होता. जिथे दिवसाढवळ्या गुन्हा करणारे गुंड ‘पुरावे नाहीत’ या तांत्रिक कारणास्तव मोकाट सुटले. संभाजी ब्रिगेड हे नाव महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला लागलेला एक कधीही न मिटणारा कलंक आहे.







