23 C
Mumbai
Saturday, December 27, 2025
घरधर्म संस्कृतीदिल्लीच्या इतिहासात मराठे, जाट, शिखांचे योगदान, मोगलांचे नाही!

दिल्लीच्या इतिहासात मराठे, जाट, शिखांचे योगदान, मोगलांचे नाही!

शिवकालीन शस्त्रे व वंदे मातरम् प्रदर्शन उदघाटनावेळी मंत्री कपिल मिश्रा यांचे उद्गार

Google News Follow

Related

दिल्लीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘स्वराजाचा शौर्यनाद’ या प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला स्वामी दीपांकर यांनी भेट दिल्यानंतर प्रभावित होऊन स्वामीजी म्हणाले की, ही शस्त्र प्रदर्शनी पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. ही शस्त्रप्रदर्शनी पाहून आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी सार्थ अभिमान वाटेल. तसेच जीवनाला पुढील दिशा मिळेल, असे मला ठाम वाटते. ही प्रदर्शनी पाहण्यासाठी तुम्ही अवश्य या, असे आवाहनही स्वामी दीपांकर यांनी या वेळी केले.

या वेळी प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा म्हणाले, ‘दिल्लीच्या इतिहासात मोगलांचे मोठे योगदान असल्याचे सतत बोलले जाते; मात्र मोगलांचे योगदान जिऱ्याएवढेच होते. त्या तुलनेत मराठे, शीख, जाट यांचे मोठे योगदान होते. त्यांचा मोठा इतिहास आहे. मराठ्यांची परवानगी घेऊनच मोगल दिल्लीच्या लाल किल्ल्यातून एक पाऊल बाहेर टाकत असत. हा खरा इतिहास आहे. इंग्रजांना दिल्ली घेतली, तर मोगलांकडून नव्हे, तर मराठ्यांकडून घेतली; मात्र जाणीवपूर्वक अनेक वर्षे खरा इतिहास लपवला गेला आहे.

हे ही वाचा:

कॅप्टनचा आदेश: षटकार लागत राहू द्या!

७० फूटांचा ‘मेस्सी महाकाय’ कोलकात्यात उभा!

आठ बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशात हुसकावले

विरोधक घुसखोरांच्या बाजूने

 भव्य संग्रहालय उभारू !

या शिवकालीन शस्त्रांचे संग्राहक राकेश धावडे यांनी, शिवकालीन शस्त्रांचे संग्रहालय देशात कुठेच नाही, तर यासाठी कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्याची विनंती मिश्रा यांच्याकडे केली असता, मंत्री महोदयांनी त्वरीत ‘दिल्लीच्या मधोमध भारतीय शस्त्र परंपरा आणि पारंपरिक शस्त्रे यांचे भव्य संग्रहालय उभारू’, असे आश्वासन दिले.

‘वन्दे मातरम्’चे प्रदर्शन !

‘वन्दे मातरम्‌’ या राष्ट्रजागृतीच्या पवित्र स्तोत्राला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरक स्मृती, त्याग, राष्ट्रासाठीचे समर्पण आणि असंख्य क्रांतिकारकांच्या हृदयातील उर्जा जागवणारे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यात ‘वन्दे मातरम्‌’चा उगम, संघर्षगाथा व राष्ट्रउभारणीतली भूमिका मांडण्यात आली.

या वेळी लेखिका शेफाली वैद्य, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्‌शक्ति बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति अंजली गाडगीळ, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’चे अध्यक्ष आणि भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारत मंडपम्‌च्या प्रांगणातील हॉल क्र. १२ मध्ये लावण्यात आलेल्या ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन पहायला समस्त दिल्लीकरांनी आवर्जून यावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने या वेळी करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा