जालना जिल्ह्यातील परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल या सीबीएसई संलग्नित शाळेत फेब्रुवारी २०२५ च्या स्नेहसंमेलनात लहान मुले डमी तलवारी हातात घेऊन पाकिस्तानी नशीद ‘गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा’ यावर नृत्य करताना दिसली. या गाण्याचे शब्द ‘नबीचा अपमान करणाऱ्या काफिर किंवा मुस्लिमेतर व्यक्तीची शिक्षा सर तन से जुदा करणे’ अशी हिंसक आणि जिहादी धर्मांध संदेश देतात. त्यापुढे जाऊन मुले नाचत होती त्या मंचावर पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अतिरेकी मुमताज कादरी यांचा फोटो सुशोभित करण्यात आला होता.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तसीर यांनी ईशनिंदा केल्याचा आरोप असलेल्या आयेशा बी नावाच्या एका ख्रिस्ती महिलेला समर्थन दिल्याच्या रागातून कादरीने २०११ मध्ये त्यांची हत्या केली होती. थोडक्यात त्याने ‘गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा’ या इस्लामच्या हिंसक आदेशाचे तंतोतंत पालन केले. अशा गाण्याचे आणि कादरीसारख्या धर्मांध, हिंसक अतिरेक्यांचे उदात्तीकरण केल्याने विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार होतील हे वेगळे विशद करण्याची गरज नाही. त्यामुळे या प्रकारामागे गंभीर आणि अत्यंत चिंताजनक धर्मांध प्रवृत्ती आहे हे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे ही शाळा एका काँग्रेस नेत्याकडून चालवली जाते. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात लहान मुलांनी केलेल्या या नाचाचा व्हिडीओ सार्वजनिक झाला तेव्हा राजकीय वरदहस्तामुळे उन्मत्त झालेल्या शाळा व्यवस्थाप
नाने व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती.
ही घटना केवळ एका शाळेच्या कार्यक्रमाची मर्यादा पार करणारी नाही, तर जिहादी धर्मांधता आणि कट्टरतावादी विचारसरणी मुलांच्या कोमल मनात रुजविण्याचा सुस्पष्ट प्रयत्न आहे. शाळेचे मालक व संचालक तारिक सिद्दीकी यांच्यावर या कार्यक्रमाच्या मंजुरीची पूर्ण जबाबदारी आहे. ते स्थानिक पातळीवर काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात. ही शाळा स्वतःला ‘सीबीएसई पॅटर्न इंग्लिश स्कूल ऑफ इस्लामिक थॉट्स’ म्हणून प्रचारित करते. अशा शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे आवरण घालून मुस्लिमेतर विरोधी कट्टरतावादी विचारसरणी पसरविली जाते. मुलांना तलवारींसारख्या हिंसक प्रतीकांसह ‘सर तन से जुदा’ सारख्या नार्यांचा गौरव करायला शिकविणे हे केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे, तर भावी पिढीच्या मनात मुस्लिमेतर (काफिर) समाजाविरुद्ध द्वेष भरून हिंसक वागण्याला उत्तेजन देणे ठरेल.
मदरशांमधून होणाऱ्या घातक संस्कारांची तीव्रता आणि त्यांच्या परिणामांचे भविष्यातील दुष्परिणाम कोणत्याही विचारी पालकांच्या डोळ्यासमोर लगेच उभे राहतील. ही घटना केवळ एका शाळेत घडलेला अपवादात्मक प्रसंग नाही. देशभरातील मदरसे आणि काही मशिदींमध्ये देखील ईद-उल-अधा किंवा बकरीदच्या सुमाराला लहान मुलांना बकरे कापायला शिकविण्याचे आणि प्रत्यक्षात कत्तल करायला लावण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असतात. हे व्हिडिओ केवळ धार्मिक संस्कार म्हणून सादर केले जात असल्याचे दावे दरवर्षी केले जातात. परंतु त्यांचा मूलभूत हेतू मुलांच्या मनात हिंसाचाराची सहजता आणि धार्मिक श्रेष्ठत्वाची भावना रुजविणे हा असतो. अपरिपकव वयातील लहान मुलांना अशा कृत्यांमध्ये सहभागी करणे त्यांच्या मानसिक विकासाला हानिकारक आहे. यातून त्यांच्यात मुस्लिमेतर समाजाविरुद्ध कट्टरतावादी हिंसक दृष्टिकोन खोल रुजेल, कारण अशा कार्यक्रमांमधून ‘काफिर’ किंवा मुस्लिमेतरांना सातत्याने ‘शत्रू’ किंवा ‘अपमानकर्ता’ म्हणून चित्रित केले जाते.
हे ही वाचा:
अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत ‘नीट’ परीक्षा
21 JUNE 2026
केरळमध्ये शिगेला-निपाहचा दुहेरी धोका
नेमार पुनरागमनासाठी सज्ज; ब्राझीलला मोठा दिलासा
मदरशांमध्ये दिली जाणारी शिक्षणपद्धती अधिक चिंताजनक आहे. येथे मुलांना प्रथम धर्मग्रंथ, इस्लामी इतिहास आणि कट्टर व्याख्या शिकविल्या जातात, त्यानंतरच संविधान किंवा आधुनिक ज्ञानाचा विचार केला जातो. ‘धर्म प्रथम, संविधान नंतर’ ही शिकवण मूलतः देशविरोधी आहे. भारतीय संविधान सर्व धर्मांना समान स्थान देते, व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि समानतेवर भर देते. परंतु काही मदरशांमध्ये ही मूल्ये दुय्यम ठरवून धार्मिक कट्टरतावादाला प्राधान्य दिले जाते. याचा परिणाम असा होतो की मुले राष्ट्राच्या मूलभूत तत्त्वांपेक्षा धार्मिक श्रेष्ठत्व आणि मुस्लिमेतर विरोधी भावनांना प्राधान्य देतात. हे भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही स्वरूपाला थेट आव्हान आहे.
भारतात सर्वधर्मसमभावाची संकल्पना हिंदू समाजाने दीर्घकाळापासून स्वीकारली आहे. हिंदू संस्कृतीत ‘वसुधैव कुटुंबकम्’ किंवा ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ सारख्या तत्त्वांचा आदर केला जातो. हिंदूंनी विविध धर्मांच्या अनुयायांना आदर दिला, त्यांच्या पूजास्थळांचे रक्षण केले आणि सामाजिक सुसंवादासाठी प्रयत्न केले. परंतु याउलट, काही कट्टरतावादी गट आणि संस्थांमध्ये लहानपणापासूनच मुस्लिमेतर विरोधी कट्टरतावादी विचारसरणीची पेरणी केली जाते. इस्लामिक शाळा, मदरसे यांसारख्या संस्थांमार्फत मुले ‘काफिर’ समाजाविरुद्ध द्वेष, हिंसाचाराची तयारी आणि धार्मिक वर्चस्वाची भावना घेऊन वाढतात. ही घातक पद्धत भारतात रूढ होत चालली आहे. एका बाजूला हिंदू समाजाकडून सर्वधर्मसमभावाची अपेक्षा केली जाते, तर दुसऱ्या बाजूला काही हिंदुविरोधी,देशविरोधी घटक मुलांच्या मनात कट्टरतावादाची बीजे रुजवतात. हा दुटप्पीपणा आणि असंतुलन राष्ट्राच्या एकात्मतेला धोका पोहोचवतो.
या सर्व घटनांविरुद्ध – मग त्या परतूरच्या शाळेच्या कार्यक्रमाच्या असोत किंवा मदरशांतील कुर्बानी शिकवण्याच्या व्हिडिओंच्या – एकाही मुस्लिम नेते, बुद्धिजीवी किंवा तथाकथित पुरोगामी व्यक्तीने ठोस निषेध व्यक्त केल्याचे दिसत नाही. ही शांतता किंवा दुर्लक्ष हा खोटेपणा आणि दांभिकता दर्शवितो. खऱ्या पुरोगामी विचारसरणीला धर्मांधता आणि कट्टरतावाद यांचा विरोध करणे अपेक्षित असते, मग तो कोणत्याही धर्माचा असो. परंतु येथे केवळ हिंदू किंवा इतर मुस्लिमेतर समाजाकडूनच टीका आणि निषेध येतो. मुस्लिम समाजातील मुख्य प्रवाह किंवा पुरोगामी मंडळी या घटनांकडे डोळेझाक करतात किंवा त्यांना ‘धार्मिक स्वातंत्र्य’ म्हणून समर्थन देतात. हा दृष्टिकोन केवळ दांभिक नाही, तर तो कट्टरतावादाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणारा आहे. वारंवार अशा घटना घडतात आणि त्याविरुद्ध आवाज उठत नाही, यातून समाजातील एका वर्गाची निष्क्रियता आणि दुसऱ्या वर्गाची एकतर्फी अपेक्षा स्पष्ट होते.
या प्रकारच्या कट्टरतावादी शिक्षणाचा दीर्घकालीन परिणाम अत्यंत गंभीर आहे. लहान वयातच मुलांच्या मनात मुस्लिमेतर विरोधी भावना रुजवल्याने ते प्रौढत्वात येऊन सामाजिक सुसंवाद, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांशी विसंगत वागू शकतात. जिहादी धर्मांध गट आणि कट्टरतावादी संघटना यांचा हा एक सुसंगत धोरण आहे – शिक्षणाच्या नावाखाली भावी सैनिक तयार करणे. परतूर शाळेतील कार्यक्रम, मदरशांतील कुर्बानी प्रशिक्षण आणि ‘धर्म प्रथम’ शिकवण यातून एकच संदेश जातो: मुस्लिमेतर समाज हा ‘इतर’ आहे, त्याच्याविरुद्ध संघर्ष करणे हे धार्मिक कर्तव्य आहे. हे भारताच्या संविधानिक मूल्यांशी – समानता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव – पूर्णपणे विसंगत आहे.
राष्ट्राच्या हितासाठी या प्रवृत्तीला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. सीबीएससी सारख्या मंडळांनी अशा शाळांची संलग्नता तपासून रद्द करावी. जालना पोलिसांनी सुरू केलेली चौकशी पूर्ण करून जबाबदार व्यक्तींवर – जसे की तारिक सिद्दीकी यांच्यावर – कठोर कारवाई करावी. एनसीपीसीआरने मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी सक्रिय भूमिका घ्यावी. मदरशा शिक्षणात आधुनिक, वैज्ञानिक आणि संविधानिक मूल्यांचा समावेश अनिवार्य करावा. केवळ हिंदू समाजाकडून सर्वधर्मसमभावाची अपेक्षा न करता, सर्व समुदायांनी आपापल्या संस्थांमध्ये कट्टरतावाद आणि मुस्लिमेतर विरोधी विचारसरणीला विरोध करणे गरजेचे आहे.
अंततः, भारताचे भविष्य त्याच्या पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. जर त्या पिढीला लहानपणापासूनच जिहादी धर्मांधता आणि कट्टरतावादाची पेरणी केली गेली, तर राष्ट्राची एकता आणि प्रगती धोक्यात येईल. सर्वधर्मसमभाव हा केवळ एका बाजूचा नव्हे, तर सर्वांचा दायित्व आहे. मुस्लिमेतर विरोधी कट्टरतावादाचा प्रसार करण्यासाठी शिक्षणाचा वापर न करता शिक्षणाला शांतता, सहिष्णुता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला वाढवण्यासाठी वापरणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, अशा घटना वारंवार घडत राहतील आणि त्यांचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागेल.