प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे शिल्प अफजलखानाच्या थडग्यासमोर बसवा, अशी मागणी २०२३ च्या शिवप्रताप दिना दिवशी प्रतापगडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणीची दखल घेऊन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिल्प बनवण्याचे आदेश काढले.
अफजल खान वधाचा शिवप्रतापाचे शिल्प पुणे येथील मूर्तिकार दीपक थोपटे यांनी बनवले असून गेल्या वर्षभर हे शिल्प त्यांच्या स्टुडिओ मध्ये उभे आहे. शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी वेळोवेळी राज्यातल्या सरकारकडं हे अफजल खान वाधाचे शिल्प बसवा म्हणून मागणी केली आहे. परंतु सरकारने पावसाळ्याचे व निवडणुकीचे कारण सांगून अफजल खान वधाचे शिल्प बसवले नाही.
हे ही वाचा:
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक निवृत्तीपूर्वी एसीपी होणार
जलद गतीने वाढताहेत ऑनलाइन व्यवहार
डीआरडीओकडून ‘प्रलय’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण
मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात राज्याचे सांस्कृतिक मंत्री ऍड. अशीषजी शेलार यांना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनात निवेदन दिले.
यावेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले की, अफजलखान वधाच्या जागेजवळ अफजल खान वधाचे शिल्प उभे करण्याचे काम गेले वर्षभर रखडले असून पावसाळ्याचे व निवडणुकीचे कारण सरकारकडून सांगितले जात आहे. हा पावसाळा संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागणार आहे. त्या निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्यापूर्वी आणि पावसाळा संपल्या संपल्या अफजलखान वधाचे शिल्प बसवले जाईल असे आश्वासन मंत्री शेलार यांनी दिले.
यावेळी नगरसेविका ऍड. स्वातीताई शिंदे, गजानन मोरे, चेतन भोसले, आदी उपस्थित होते.







