अनेक गोष्टींचा शोध हा पश्चिमेकडील शास्त्रज्ञांनी लावला असे आपण ऐकत आलो आहोत, पण वेदांमध्ये हे सगळे आधीपासून नमूद असून अशा जवळपास ४००-५०० वैज्ञानिक संशोधनावर मी माझ्या पुस्तकात लिहिले आहे, जे शोध पश्चिमेकडील शास्त्रज्ञांनी लावल्याचा दावा केला जातो, अशा शब्दात विवान कारूळकरने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लिखाणाचे मर्म सांगितले आहे.
विवानने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अशा अनेक रहस्यांचा उल्लेख केला आहे. जवळपास ५५ मिनिटे झालेल्या या प्रदीर्घ मुलाखतीत विवानने अगदी मोकळेपणाने आपल्या संशोधनाविषयी, सनातन धर्माच्या अभ्यासाविषयी, त्यासाठी घ्याव्या लागलेल्या मेहनतीविषयी आणि त्याला आईवडिलांच्या मिळालेल्या पाठींब्याविषयी सांगितले आहे.
हे ही वाचा:
भूज लष्करी तळावर संरक्षण मंत्र्यांचे ‘शस्त्रपूजन’
गाझामध्ये जे थांबतील त्यांना दहशतवादी मानले जाईल!
पंतप्रधानांकडून १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण; पहिल्यांदाच चलनावर भारत मातेचे चित्र!
गोधऱ्यात ३५ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर
विवानने वयाच्या १६ व्या वर्षी सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत शिवाय सनातन धर्माचे काय महत्त्व आहे हेदेखील त्याने विषद केले आहे.
या सगळ्यांचा उहापोह या पॉडकास्टमध्ये करण्यात आला आहे.
वेदांमधील अनेक श्लोकातून विश्वातील अनेक रहस्यांचा उल्लेख आढळतो. गॅलिलिओ, न्यूटन यासारख्या शास्त्रज्ञानी जे संशोधन केले, त्याचे सगळे संदर्भ वेदात आढळतात हे विवान स्पष्ट करतो तेव्हा त्याने याबाबत केलेल्या अभ्यासाचे कौतुक वाटते.
सिद्धार्थ कन्नन यांनीही अगदी खोलात जाऊन विवानला प्रश्न विचारले आहेत, पण विवानने त्याची अगदी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
विवान म्हणतो की माझ्या पुस्तकातील दाव्यांवर अनेक आक्षेप किंवा प्रश्न विचारले गेलेत पण मी त्यांना आव्हान देत वेदांच्या पलीकडे कोणते संदर्भ आहेत ज्याचा उपयोग करून शास्त्रज्ञानी शोध लावले ते सांगावे मग मी माझे दावे गुंडाळून ठेवायला तयार आहे, असे आव्हान विवानने दिले आहे.
विवानला ही प्रेरणा कुठून मिळाली, सनातन धर्माची नेमकी व्याख्या काय करता येते या प्रश्नांवर विवानने समर्पक उत्तरे दिली आहेत. हा पॉडकास्ट त्यासाठी निश्चितच पाहायला हवा.त्यासाठी या लिंकवर जाऊन विवानची सविस्तर मुलाखत पाहता येईल.







