29 C
Mumbai
Thursday, February 5, 2026
घरसंपादकीयएक अर्धवट देखणी, एक अर्धवट...

एक अर्धवट देखणी, एक अर्धवट…

Google News Follow

Related

कधी काळी पंजाबचे रवनीत बिट्टू काँग्रेस पक्षात होते, परंतु राहुल यांचे देशबुडवे रागरंग पाहून ते पक्षाबाहेर पडले. बिट्टू यांनी या अर्धवटरावांना औकात दाखवली. संसदेत समोरासमोर आल्यावर राहुल त्यांना गद्दार म्हणाले. एका क्षणाचाही विलंब न लावता रवनीत म्हणाले की, तुम्ही देशाचे गद्दार आहात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करोलिन लेव्हीट आणि राहुल गांधी जे काही बोलले तो निव्वळ अर्धवटपणाचा नमुना आहे. एक नमुना भारतातला एक अमेरिकेतला निर्बुद्धपणाला देशाच्या सीमांचे बंधन नसते, हे स्पष्ट करणारी ही उदाहरणे.

काँग्रेस पक्ष इतका पिसळला आहे की पंतप्रधान देशाचा असतो, याचे त्यांना भान उरलेले नाही. मोदींचा जेफ्री एप्स्टीनशी बादारायण संबंध जोडून त्यांना एक एआय व्हीडीयो बनवला. त्या ते नाचतायत असे दाखवण्यात आले. नाचण्याचा नेहरु गांधी खानदानाशी घट्ट संबंध आहे. जवाहरलाल नेहरुंना एडविना माऊंटबॅटन नाचवत होत्या. अवघ्या काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या सरकारला रशियाची केजीबी अनेक वर्षे नाचवत होती. मित्रोखीन अर्काईव्हच्या माध्यमातून ही माहिती जगासमोर आलेली आहे. राजीव गांधी यांना सोनियांनी नाचवले. सोनिया गांधी यांचा नाचाशी कसा संबंध आहे, याची भारतात आजवर बरीच चर्चा झाली आहे. राहुल गांधींना पुस्तकावर चर्चा करण्याची फार खुमखुमी असेल तर मित्रोखीन अर्काईव्ह, स्पॅनिश लेखक जेविअर मोरो यांनी लिहीलेले रेड सारी, चीन प्रकरणी नेहरुंनी कशी माती खाल्ली, देशाची जमीन कशी गमावली, यावर ले.जनरल शंकरराव थोरातांनी लिहीलेले माझी शिपाईगिरी, ब्रिगेडीअर जॉन दळवी यांनी लिहीलेले हिमालयन ब्लंडर ही पुस्तके वाचावीत.

एपस्टीन फाईलमध्ये जे मोदींचे संदर्भ आले आहे ते कुठल्याही सेक्स स्कॅंडल किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भात नाहीत. एपस्टीन हा जगातील बड्या नेत्यांच्या गोतावळ्यात होता. तो पॉवर ब्रोकर होता. अमेरिकेत राजकीय दलाली किंवा लॉबिंग करणे हा गुन्हा नाही. जे काही समोर आले आहे, त्यातला एकही शब्द मोदी बोलले नाहीत. तिसरा चौथ्याला मोदींच्या संदर्भात काही तरी सांगतो आहे. जी माहिती उघड झाली ती सरकारने फेटाळली आहे. ती खरी असल्यावर राहुल गांधी ठाम असतील तर त्याच एपस्टीन फाईलमध्ये सोनिया गांधींचाही उल्लेख आहे. २०१४ ची निवडणुकी आधी त्या म्हणे एपस्टीनकडून धडे घेणार होत्या, असा त्यात उल्लेख आहे. काँग्रेसच्या चवचाल सोशल मीडिया ब्रिगेडने मोदींचा एपस्टीनशी संबंध जोडत नाचताना एआय व्हीडीयो बनवला. आता सोनिया गांधींचा तसाच संबंध उघड झाल्यानंतर नाचताना त्यांचाही एखादा व्हीडीयो बनवला तर राहुल गांधींचा त्याला आक्षेप नसावा. ते सोनियांच्या पूर्वायुष्याशी सुसंगत होईल.

राहुल गांधी हा वर्तमानातील मीर जाफर आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी, देश हितासाठी जर काही चांगले घडत असेल, त्याचा विरोध करणे आणि आपला राजकीय कंड शमवणे हा धंदा ते २०१४ मध्ये सत्ता गमावल्यापासून करतात. त्यासाठी कधी चीनच्या तर कधी अमेरिकेच्या मांडीवर बसतायत. एपस्टीन फाईल आणि अदाणींच्या विरोधात अमेरिकेने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे मोदींनी अमेरिकेसमोर शरणागती पत्करली, असा त्यांचा दावा आहे. भारत आणि अमेरिकेत मुक्त व्यापार करार होणार अशी अजूनपर्यंत फक्त घोषणा झाली आहे. त्यात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत, याचा तपशील बाहेर आलेला नाही. या करारातून कृषी आणि डेअरी उत्पादने बाजूला ठेवण्यात आलेली आहेत, असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिलेला आहे. किंबहुना ‘भारताच्या हिताचे भान ठेवून हा करार होत असेल तरच आम्ही करार करू, आम्हाला डेड लाईनची चिंता नाही’, असे पियूष गोयल यांनी वारंवार स्पष्ट केलेले आहे. तरीही अजूनपर्यंत ज्या करारावर सह्या झालेल्या नाही, ज्यात काय आहे हे उघड झालेले नाही, ते ऐकण्याची राहुल गांधी यांची इच्छा नाही. तरीही त्यावरून राहुल गांधी मोदींवर शेलकी टीका करत असतील तर देश सहन करणार नाही. चीनने देशावर डोकलामचा संघर्ष लादलेला असताना अंधारात चीनी राजदूताची भेट घेऊन चर्चा करणाऱ्या आणि परदेश दौऱ्यावर देशद्रोह्यांसोबत खलबते करणाऱ्या राहुल गांधी यांची लायकी सगळ्या देशाला माहिती आहे. त्यामुळे सतत पराभवाचे चपलाहार त्यांच्या गळ्यात पडत आहेत.

एका बाजूला देशातला एक अर्धवट या कराराबाबत बिनडोक विधाने करतोय. दुसऱ्या बाजूला व्हाईट हाऊसमधील एक अर्धवट देखणी कॅरोलिना लेव्हीट या कराराबाबत उथळ बडबड करते आहे. ज्या बाईला सॅक्शन आणि टेरीफ यातला फरक कळत नाही, ती पुन्हा एकदा ट्रेड डीलवरून बकवास करते आहे.

ट्रम्प हा नेता देखण्या कन्यकांवर भाळणारा आहे, म्हणून एपस्टीन त्यांचा मित्र होता. अलिकडे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ इंटेरिअर डॉऊग बरगम यांच्याबाबत त्यांनी एक विधान केले. मी एकदा बरगम आणि त्यांची कॅथरीन यांचा घोडेस्वारी करतानाचा फोटो पाहीला, मी तिला पाहीले आणि बरगम यांची नियुक्त कऱण्याचा निर्णय घेतला. व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती करण्याचा ट्रम्प यांचा निकष काय आहे, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. कॅरोलिना काय किंवा कॅथरिनचा नवरा काय. त्यामुळे तिथे देखणेपणा हाच निकष आहे. कॅरोलिना काय बडबडते आणि डाऊग बरगम काय दिवे लावतो हे महत्वाचे नाही.

हे ही वाचा:

AI च्या भीतीने आयटीचे शेअर्स गडगडले

बलूचिस्तानवरुन पाकिस्तानचा ताबा सुटतोय?

क्रिकेटचा हा बदल उशिरा आला; नाहीतर वर्ल्डकप हातचा गेला असता!

थॉमसची शतकी तोफ! ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंड फायनलमध्ये

भारताने रशियन तेल खरेदी करणार नाही, असे मान्य केल्याचा दावा तिने केला आहे. हा दावा ट्रम्प यांनीही केला आहे. परंतु तो भारताने मान्य कुठे केला आहे? ट्रम्प आणि त्यांच्या देखण्या प्रेस सेक्रेटरीची ही इच्छा भारतीयांना आणि मोदी सरकारला आधी पासून माहिती आहे, परंतु जोपर्यंत मोदी म्हणत नाहीत की आम्ही रशियन तेलाची खरेदी करणार नाही, हे मान्य केले आहे, तोपर्यंत भारताची जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही. रशियाचे प्रवक्ते ड्रीमिटी पेस्काव्ह यांनी सुद्धा नेमके हेच सांगितले आहे. तेल खरेदी बंद करण्याची कोणतीही सूचना भारताकडून आलेली नाही. म्हणजे खरेदी करणारा बोलत नाही, ज्याच्याकडून खरेदी केली जाते ते बोलत नाही, मग कॅरोलिना यांनी देखणी वटवट करून काही उपयोग होणार आहे का ? २०२५ च्या ऑक्टोबर महिन्यात व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर ट्रम्प यांनी जाहीरपण सांगितेल होते की, येत्या काही दिवसात रशियन तेल विकत घेणे बंद करण्याचे आश्वासन मोदींनी मला दिले आहे. पुढे भारताने रशियाकडून विक्रमी तेल खरेदी जारी ठेवली. नोव्हेंबरमध्ये या तेल खरेदीने उच्चांक गाठला हा इतिहास आहे. त्यामुळे राहुल गांधी, ट्रम्प आणि त्यांची प्रेस सेक्रेटरी काय म्हणते आहे, त्यापेक्षा वाणिज्य मंत्री पियूष गोयल, परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काय म्हणतील त्यावर आम्ही विश्वास ठेवू. कारण ट्रम्प यांच्याप्रमाणे मोदी, गोयल आणि जयशंकर यांचा इतिहास थापा मारण्याचा नाही. जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते या संदर्भात काही तरी बोलतीलच. बोलताना ते कुणाची भीडभाड बाळगत नाहीत, अगदी स्पष्ट बोलून मोकळे होतात.

अमेरिकेसोबत करार करताना भारत पुरेशी काळजी घेणार याबाबत माझ्या मनात शंका नाही. कारण ट्रम्प हा काही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही. त्यांच्यासोबत केलेल्या करार केल्यानंतही जग त्यांना फार गंभीरपणे घेत नाही. युरोपसोबत ट्रम्प यांनी मुक्त व्यापार करार केला, त्यानंतर ट्रम्प असे म्हणाले होते की युरोपियन देश आता अमेरिकेकडून ७५० अब्जचे इंधन विकत घेईल आणि अमेरिकेत ६०० अब्जची गुंतवणूक कऱणार आहेत. युरोपियन कमिशनने लगेच कानावर हात ठेवले. हे शक्य होईल असे आम्हाला वाटत नाही, युरोपियन कमिथनच्या अध्यक्षा उर्सूला वॉन डेर लेन, असा खुलासा करून मोकळ्या झाल्या. भारत अमेरिकेत ५०० अब्जची गुंतवणूक करेल असे कॅरोलिना बाई म्हणते आहे, हे विधान त्यामुळे फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. युरोपियन युनियनसोबत करार केल्यानंतर ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपच्या पाठीत खंजीर खुपसलाच. हे भारताने पाहिले आहे. त्यामुळे भारत सावध आहे.

भारत अमेरिकेच्या ट्रेड डीलमध्ये नेमके काय आहे, हे ऐकण्याची विरोधकांची इच्छा नाही, त्यामुळे संसदेत गोंधळ घालण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला आहे. निवृत्त लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी अनेक मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे की, ‘आम्ही चीनला सडेतोड उत्तर दिले, त्यांना देशाची एक इंच जमीन घेऊ दिली नाही. जे योग्य असेल ते तुम्ही करा, अशी मोदींची स्पष्ट भूमिका होती’. तरीही नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा हवाला देऊन राहुल गांधी संसदेत ट्रेड डीलवर होणाऱ्या चर्चेत खोडा घालत होते. संसदेच्या बाहेर येऊन, पत्रकारांना खोटी माहिती देत होते. मोदी सरकार देशहिताबाबत तडजोड करणार नाही, याबाबत देशवासियांच्या मनात खात्री आहे, पंरतु सत्तेवर आल्यापासून एक चूक मात्र मोदींनी निश्चितपणे केली आहे. देशाला लुटणाऱ्या मायलेकाची जागा तुरुंगात आहे. त्याचे खटले फास्ट ट्रॅक न करता आले, असते. खालिस्तानी अमरीत पाल सिंह याच्यासोबत या देशबुडव्यांची रवानगीही दिब्रुगडच्या तुरुंगात व्हायला हवी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा