मुंबईतल्या कुदळवाडीवर कारवाई कधी?

मुंबईतल्या कुदळवाडीवर कारवाई कधी?

मालवणीत मोठया प्रमाणात झोपड्या उभारून जमिनी कब्जा करण्याची जी मोहीम सुरू आहे, त्याच्यात जिहादी एजेंडा तर आहेच. याचा एक आर्थिक पैलूही आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एसआरए योजनेची घोषणा केली होती. सध्या मुंबईत परिस्थिती अशी आहे, की झोपड्या उभारून जमिनी कब्जा करायच्या, त्यावर एसआरए योजना राबवून कब्जावर शिक्कामोर्तब करायचे असे प्रकार सर्रास सुरू आहेत.

मालवणीमध्ये घाऊक प्रमाणात यासाठी घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा वापर केला जात आहे. भविष्यात त्यांना पक्क्या टॉवरमध्ये पाठवण्याची तयारी सुरू आहे.
मालवणी आठ भागात विभागली गेलेली आहे. १५ ते २० वर्षांपूर्वी सेक्टर सहा आणि सातमध्ये मुस्लीम वस्ती होती. बाकीच्या सगळ्या सेक्टरमध्ये हिंदू वस्ती होती. आज सगळ्या आठ सेक्टरमध्ये मुस्लीम मोठ्या संख्येने येतायत. त्यांची संख्या सतत वाढते आहे. हिंदू इथून पलायन करतायत. इथल्या पक्क्या इमारतीतील घरे विकून हिंदू मोठ्या संख्येने पलायन करतायत. पलायनाची ही संख्या किती मोठी आहे हे मालवणी सेक्टर क्रमांक ८ मध्ये रिद्धी सिद्धीच्या उदाहरणावरून स्पष्ट व्हावे.

२५ वर्षांपूर्वी इमारतीतील ३५ पैकी २ फ्लॅटमध्ये मुस्लीम कुटुंब होती बाकी हिंदू होते. आज फक्त दोन हिंदू कुटुंब इथे शिल्लक आहेत. ही कथा अनेक इमारतींची आहे.
दुसऱ्या बाजूला अंबोजवाडी, धारीवली, न्यू कलेक्टर कंपाऊंड, ओल्ड कलेक्टर कंपाऊड या मोकळ्या जमिनीवर झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. झोपड्यांची संख्या हजारोमध्ये आहे. या झोपड्यांमध्ये जे लोक वसवण्यात येतात ते कुठून येतात हे कोणालाही माहित नाही. परंतु हे मुंबईकर नाहीत. ते मराठी बोलत नाहीत. झोपड्या उभारल्या जात असताना ना पालिकेचे अधिकारी तिथे फिरकत, ना पोलिस फिरकत. यातून काही निष्कर्ष काढता येतात. सरकारला अंधारात ठेवून सरकारी अधिकारी यात सामील आहेत. ते लाभार्थी आहेत. स्थानिक आमदार अस्लम शेख यांचे त्यांना आशीर्वाद आहेत. काही राजकीय नेते त्यांची काळजी घेत आहेत.

एकदा इथे झोपड्या थाटल्या. बांगलादेशी वसवले की त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या रोजी रोटीसाठी फूटपाथवर त्यांचे धंदे वसवले जातात. त्यालाही पालिका पोलिस खात्यातील अधिकारी चिरीमिरी घेऊन मदत करतात. आज अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की, स्थानिक फेरीवाले या बांगलादेशींच्या दहशतीखाली धंदा करताना दिसतायत. अनेक ठिकाणी त्यांना हुसकावून लावण्यात आले आहे. बोरीवलीचे आमदार यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात जी कठोर मोहीम सुरू केली आहे, त्याचे कारणही हेच आहे. हे फेरीवाले स्थानिक नाहीत. ते वाळवी सारखे परतायत.

दादरमध्ये ऐन दिवाळीच्या काळात पालिका आणि पोलिसांनी भरपूर पैसे घेऊन दादरच्या भाजी मार्केटमध्ये फटाक्यांचे ७० स्टॉल लावले होते. स्टॉल लावणारे सगळे मुस्लीम होते. अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई केली. हे जर दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी होते, तर मालवणी तर खूपच आड बाजूला आहे.
हे खूप मोठे आर्थिक षडयंत्र आहेत. एका बाजूला घुसखोर वसवण्याची जिहादी फॅक्टरी वसवताना या फॅक्टरीला भविष्यात शेकडो कोटींची रसद मिळेल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. देशात घुसलेले बांगलादेशी सरकारी हॉस्पिटल, मोफत रेशन, इथले रस्ते, पाणी, वीजेचा उपभोग घेतच आहेत. आता ते एसआरआरए इमारतीतील घरांचे मालकही होतायत. बिल्डरांसाठी ही सरकारी जमिनी कब्जा करणारी जिदाही फौज आहे. यात नुकसान हिंदूंचे आहे, देशाचे आहे.

हे ही वाचा:

आणखी एक भव्य राममंदिर उभारले जाणार….

देशासाठी एसआयआर गरजेचे

प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

कॅनडात भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या!

या षडयंत्राचे करविते बांगलादेशींचा वापर करून शेकडो कोटींच्या जमिनी घशात घालतायत. जिथे भविष्यात शरीया कॉम्प्लेक्स थाटल्या जातील. जिथे हिंदूंना प्रवेश निषिद्ध असेल.
ही काळजी का घेतली जाते आहे, हे लक्षात घ्या. मालवणी सेक्टर ६ मध्ये साडे तीन एकराचा सरकारी भूखंड झोपड्यांनी व्यापला आहे. मुंबईत मालाड पश्चिममध्ये एका एकर मोकळ्या जमिनीची किंमत किमान ६५ ते कमाल १३० कोटी रुपये आहे. साडे तीन एकरची किंमत अडीचशे ते पाचशे कोटी रुपये. एखाद्या बिल्डरला ही जमीन विकत घेण्यासाठी किती पैसा खर्च करावा लागेल हे लक्षात घ्या. इथे झोपड्या निर्माण करायच्या. मुंबईत एसआरए योजनेसाठी झोपड्यांच्या मुदतीची वर्षे सतत वाढत असतात. सुरूवातीला ही मुदत १९९५ पूर्वीच्या झोपड्यांसाठी होती. आता ती २००० पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. शिवाय २००० ते २००१ च्या झोपड्यांसाठी माफक पैसे भरा आणि इमारतीत फ्लॅट घ्या अशी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे मालवणीतील आज ज्या भूखंडांवर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वसवण्यात येत आहे, त्या झोपड्या भविष्यात एसआरए योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. एसआरएच्या नावाखाली हे भूखंड बिल्डरांच्या घशात जाणार आहेत. ही जी स्ट्रेटेजी आहे, त्याच्या पहिल्या पायरीची अमंलबजावणी मालवणीत झालेली आहे.

झोपड्या उभारणारे वजनदार आहेत. नंतर त्यांना पाणीची जोडणी, वीज देणे हे काम करणारे कंत्राटदार राजकीय पक्षाचे स्थानिक पातळीवर काम करणारे नेते असतात. पाच पंचवीस हजार घेऊन ते ही वाळवी इथे कायम स्थिरस्थावर होईल, याची व्यवस्था करतात.

ब्रिजेश सिंह हे या भागात अनेक वर्षे राहतात. ते या झोपडपट्टी माफियांच्या विरोधात लढतायत. ते म्हणतात. झोपड्यांमध्ये राहणारे लोक स्थानिक नाहीत. मुंबईशी त्यांचा संबंध नाही. हे बांगलादेशी आहेत. हे रोहिंगे आहेत. त्यांना इथे पद्धतशीरपणे वसवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या वस्त्या निर्माण करण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षात यांची संख्या वाढते आहे, त्यांच्या उपद्रवामुळे स्थानिक हिंदू पलायन करतायत.

बांधकाम क्षेत्रातील मजूर बांगलादेशी आहेत. ही बाब तर सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांच्या बायका इमारतींमध्ये जाऊन घरकाम करतात. आता मुंबईतील जमिनी कब्जा कऱण्यासाठी त्यांचा वापर सुरू आहे. पालिका आणि पोलिस खात्यातील अधिकारी मूठभर पैशांसाठी या लोकांना विकले जात आहेत. देशहिताला चूड लावण्याचे काम करतायत. हा विषय़ इतका गंभीर असताना त्या विरुद्ध पोटतिडकीने भांडणारे संजय उपाध्याय, अतुल भातखळकर, ब्रिजेश सिंह यांच्यासारखे मूठभर लोक आहेत. बाकीचे स्वस्थ बसून देशाच्या बर्बादीचा हा तमाशा बघतायत. अस्लम शेख यांच्यासारखे लोक साम्राज्य निर्माण करायत. जिहादी एजेंडा रेटतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version