“करार झाला होता, पण पंतप्रधान मोदींनी फोन केला नाही”

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचा दावा

“करार झाला होता, पण पंतप्रधान मोदींनी फोन केला नाही”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्र हाती घेताच भारतीय आयातीवर २५ टक्के परस्पर कर लादला, तसेच रशियन तेल खरेदीसाठी अतिरिक्त २५ टक्के दंड लादला, ज्यामुळे काही उत्पादनांवरील एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला. या निर्णयामुळे नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील संबंधांमध्ये तीव्र ताण निर्माण झाला आहे. अशातच आता अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी मोठा खुलासा करत भारत- अमेरिका यांच्यातील व्यापार करार प्रत्यक्षात येऊ न शकल्याचे कारण दिले आहे.

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित व्यापार करार धोरणात्मक मतभेदांमुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट बोलण्यास नकार दिल्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकला नाही. एका मुलाखतीत, लुटनिक यांनी दावा केला की, संपूर्ण व्यापार करार निश्चित झाला होता, परंतु तो निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना फोन करणे आवश्यक होते. तथापि, त्यांनी असा युक्तिवाद केला की भारत सरकारला हे आवडत नाही आणि पंतप्रधान मोदींनी फोन केला नाही.

हेही वाचा..

खोमेनी राजवटीविरोधातील निदर्शेने तीव्र; इंटरनेट, टेलिफोन लाईन्स बंद

“स्ट्रॅटॅजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय” काय म्हणाले ठाकरे बंधू?

१० हजार सिमकार्डद्वारे सायबर ठगी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात उडी घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

“संपूर्ण करार ठरलेला होता. पण पंतप्रधान मोदींनी फोन केला नाही. आम्ही इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनामशी व्यापार करार केले. त्यांच्या आधी आम्ही भारतासोबत व्यापार करार केला,” असे अमेरिकेचे वाणिज्य सचिव म्हणाले. लुटनिक यांनी असेही उघड केले की ज्या अटींनुसार भारत आणि अमेरिका व्यापार करार पूर्ण करणार होते त्या आता चर्चेत नाहीत. “आम्ही आधी ज्या व्यापार करारावर सहमती दर्शवली होती त्यापासून अमेरिका मागे हटली आहे. आम्ही आता त्याबद्दल विचार करत नाही,” लुटनिक म्हणाले.

Exit mobile version