24 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरदेश दुनियारायगडच्या जवानाला काश्मीर खोऱ्यात आले ‘वीरमरण’

रायगडच्या जवानाला काश्मीर खोऱ्यात आले ‘वीरमरण’

रायगडच्या सुपुत्राला आले काश्मीरमध्ये वीरमरण.

Google News Follow

Related

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील ईसाने कांबळे गावचा सुपुत्र राहुल आनंद भगत यांचा काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागात दहशदवाद्यांशी लढताना शहिद झाले. भगत हे २८ वर्षाचे असून, या घटनेनंतर ईसाने कांबळे गावावर शोककळा पसरली आहे. राहुल भगत यांच्यामागे पत्नी, मुलगा आई व वडील असा परिवार आहे. अशी माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड  यांनी दिली.

२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात पाळण्यात येणाऱ्या अहिंसा दिनीच शहीद राहुल भगत यांना वीरगती प्राप्त झाली आहे. तसेच शहीद राहुल आनंद भगत यांचे पार्थिव भारतीय लष्कराच्या माध्यमातून त्यांच्या मुळगावी आणून शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहे. अशी माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.

हे ही वाचा:

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागात संध्याकाळी दहशदवाद्यांशी लढताना झालेल्या चकमकीत गोळी लागून ठार झाले. अशी माहिती रायगड चे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रसार माध्यमांशी दिली. वीरगती प्राप्त झालेले शहीद राहुल आनंद भगत यांचे पार्थिव मंगळवारी मूळगावी आणण्यात येणार आहे. अशी माहिती भारतीय लष्करांच्या सूत्रांनी दिली.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा