25 C
Mumbai
Thursday, February 19, 2026
घरक्राईमनामाबलुच बंडखोरांनी रेल्वे ट्रॅकवरच लावली स्फोटकं, जीवितहानी नाही

बलुच बंडखोरांनी रेल्वे ट्रॅकवरच लावली स्फोटकं, जीवितहानी नाही

जाफर एक्स्प्रेसला केले पुन्हा लक्ष्य

Google News Follow

Related

बलुच बंडखोर हे सातत्याने पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात कारवाया करत असतात. अनेकदा हे बंडखोर बलुचिस्तानमधून जाणाऱ्या गाड्यांना लक्ष्य करतात. तर लष्करी ताफ्यांनाही लक्ष्य करतात. बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून एक्स्प्रेसही थोडक्यात बचावली आहे.

नासिराबाद जिल्ह्यात बलुच बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसवर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकवर स्फोटके लावण्यात आली होती. मात्र, या भागातून ट्रेन गेल्यानंतर हा स्फोट झाला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मते, शहीद अब्दुल बुलो परिसरात रेल्वे ट्रॅकवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. जाफर एक्स्प्रेस क्वेटाहून पेशावरला जात होती. या हल्ल्यात कोणताही प्रवासी किंवा कर्मचारी जखमी झाला नाही.

बलुचिस्तानमधील सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान रेल्वेने रविवारपासून क्वेटा आणि पेशावर दरम्यान जाफर एक्सप्रेस सेवा चार दिवसांसाठी स्थगित केली होती. काही महिन्यांपूर्वी ट्रेनवर झालेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांची, रेल्वे कर्मचाऱ्यांची, नागरिकांची आणि महत्त्वाच्या रेल्वे मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या सल्ल्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून ९ ते १२ नोव्हेंबरपर्यंत सेवा स्थगित करण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा..

माई-बहिण सन्मान योजना आधी घरातून सुरु करा

बंगालमधील एसआयआरमुळे घुसखोर बांगलादेशात पळू लागलेत!

डिजिटल अरेस्ट दाखवून महिलेचे ३२ कोटी लुटले

दिल्ली स्फोटाचे धागेदोरे पश्चिम बंगालमध्ये; तुरुंगात असलेल्या आरोपींची चौकशी

अलिकडच्या काही महिन्यांत जाफर एक्सप्रेसला वारंवार बंडखोर आणि अतिरेक्यांनी लक्ष्य केले आहे. मार्चमध्ये, बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने ३८० प्रवाशांना घेऊन जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले. हे अपहरणाचे प्रकरण दोन दिवस चालले आणि सुरक्षा दलांसोबत झालेल्या गोळीबारात २६ प्रवासी आणि ३३ इतर बंडखोरांचा मृत्यू झाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
293,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा