पाकिस्तानविरोधात भारताला जर्मनीचा पाठींबा

एस. जयशंकर यांचा जर्मनी दौरा

पाकिस्तानविरोधात भारताला जर्मनीचा पाठींबा

गेल्या महिन्यात २६ नागरिकांचा बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना जर्मन परराष्ट्रमंत्री योहान वाडेफुल यांनी शुक्रवारी म्हटले की, भारताला दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

बर्लिनमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले, जिथे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत ते उपस्थित होते. भारत-पाकिस्तानमधील विद्यमान परस्परसमज टिकवून ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि स्थिर संवादाच्या माध्यमातून द्विपक्षीय मार्गाने वाद मिटवण्याचे आवाहन केले.

“दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाया झाल्यानंतर, भारताला अर्थातच दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. सध्या युद्धविराम लागू आहे, हे आम्ही खूप महत्त्वाचे मानतो.”

भारयाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, जे सध्या जर्मनीत आहेत, त्यांनी पत्रकार परिषदेत भारताची दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

हे ही वाचा:

शेअर बाजाराला मिळालेलं ‘गिफ्ट’ : आशीषकुमार चौहान

अदाणींना टार्गेट का करण्यात आले, त्याचा उलगडा होतोय..

मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात आता ‘ऑपरेशन सिंदूर’ ?

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या शिखरावर आजपासून चढणार सोन्याचा मुलामा

ते म्हणाले, “दहशतवादाच्या संदर्भात भारत अजिबात सहिष्णू नाही. भारत कधीही अण्वस्त्राच्या धमक्यांपुढे झुकणार नाही.” जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारत पाकिस्तानबरोबर केवळ द्विपक्षीय मार्गानेच संवाद साधेल. याबाबत कोणाच्याही मनात कोणतीही शंका राहू नये.

जयशंकर यांनी जर्मनीकडून भारताच्या भूमिकेच्या समजुतीचे स्वागत केले. ते म्हणाले, “दहशतवादाविरोधात प्रत्येक देशाला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे, ही गोष्ट जर्मनीने समजून घेतली आहे, याचे आम्हाला समाधान आहे.”

२६ जणांचा बळी गेलेल्या २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे की, भारत आता कोणत्याही सीमा पार करून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला “युद्धाचे स्वरूप” मानेल.

ठळक मुद्दे:

Exit mobile version