26 C
Mumbai
Friday, June 13, 2025
घरसंपादकीयअदाणींना टार्गेट का करण्यात आले, त्याचा उलगडा होतोय..

अदाणींना टार्गेट का करण्यात आले, त्याचा उलगडा होतोय..

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अदानींची सुपारी घेतली होती.

Google News Follow

Related

दोन वर्षांपूर्वी उद्योगपती गौतम अदाणी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. अमेरिकी कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च एण्ड शॉर्ट सेलिंग फर्मने अदाणी समुहाच्या विरोधात आघाडी उघडली होती. हा हल्ला इतका जबरदस्त होता की जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले अदाणी २२ व्या क्रमांकावर ढकलले गेले. सुपारी देऊन एखाद्याचा गेम वाजवतात तसा हा प्रकार होता. ज्याने सुपारी वाजवली त्याचे नाव समोर आले. परंतु ती कोणाच्या सांगण्यावरून वाजवली हे अद्यापि गुलदस्त्यात आहे. ज्याने कोणी हे केले त्यामागे फार दूरचा विचार होता हे निश्चित. ऑपरेशन सिंदूरनंतर गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर एक नजर टाकली तर आपल्या या खेळी मागील कार्यकारण भाव लक्षात येऊ शकतो.

भारत संरक्षण निर्मितीबाबत गंभीरपणे प्रयत्न करतो आहे, याची कुणकुण जगाला होती. परंतु भारताने संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात नेमका कुठे आहे. याचा अचूक अंदाज कोणालाच नव्हता. ऑपरेशन सिंदूरमुळे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया म्हणजे नेमका काय प्रकार आहे, हे जगाच्या लक्षात आले. लक्षात आले म्हणजे त्याची उघड चर्चा सुरू झाली. त्या आधी ही बाब महासत्तांच्या नजरेतून सुटली असेल असे मानण्याचे काही कारण नाही. जगाच्या पाठीवर काय घडते आहे, यावर महासत्तांची बारीक नजर असते. त्यांचे उपग्रह, त्यांचे एजण्ट, त्यांची इको सिस्टीम तुमची बित्तंबातमी पोहोचवण्याचे काम करीत असतात.

हे ही वाचा:

मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात आता ‘ऑपरेशन सिंदूर’ ?

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या शिखरावर आजपासून चढणार सोन्याचा मुलामा

पाकसाठी हेरगिरी करणारा तुफैल ६०० पाकिस्तानी नंबरच्या होता संपर्कात

वैष्णवी हागवणेचे सासरे, दीर सापडले, पोलिसांनी केली अटक

ज्या महासत्ता भारतावर नजर ठेवून आहेत, त्यांना ठाऊक आहे की, अदाणी हे अत्यंत आक्रमकपणे संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रात शिरले. देशात सत्तारुढ असलेल्या सरकारसोबत त्यांचे संबंधही उत्तम आहे. अनेक नव्या क्षेत्रात ते मुसंडी
मारतायत, धोकादायक असलेल्या क्षेत्रातही नशीब आजमावतायत हे सातत्याने दिसते आहे. इस्त्रायलच्या हायफा बंदर अदाणी समुहाने घेतले तेव्हा अदाणींच्या धोका पत्करण्याच्या क्षमतेचा परीचय जगाला झाला. जागतिक स्तरावर चीनी कंपन्यांशी स्पर्धा घेत असल्यामुळे त्यांचा पंगा थेट चीनशी आहे.

जगात ज्या महासत्ता आहेत, त्यांना महासत्ता बनवण्यात शस्त्रास्त्र निर्मिती आणि निर्यातीचा वाटा मोठा आहे. अमेरीका ही महासत्ता आहे कारण शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाबाबत जगातील एकही देश अमेरिकेच्या आसपास नाही. मग निर्मिती लढाऊ विमानांची असो किंवा विमानवाहू जहाजांची. शस्त्र जगात विकून अमेरिकेला बरकत आलेली आहे.

भारत आता कुठे या क्षेत्रात रांगायला लागलेला आहे. देशांतर्गत शस्त्र निर्मितीला चालना देण्याचे काम मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात तडफेने केले. त्याचे परीणाम आता दिसू लागले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात २.७६ अब्ज डॉलर्सची शस्त्र निर्यात भारताने केली. ही अमेरिकेच्या दृष्टीने चिल्लर आहे. परंतु गंगेचा प्रवाह ज्या गंगोत्री येथून सुरू होतो तो किरकोळच असतो. भारताची शस्त्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरीका, फ्रान्सच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत, हे जेव्हा
जगाच्या लक्षात येईल तेव्हा भारताकडे शस्त्रांसाठी रांगा लागतील.

ऑपरेशन सिंदूरनंतर नेमके हेच होताना दिसते आहे. अदाणी समुहातील अल्फा डिफेन्स या बंगळुरू स्थित स्काय स्ट्रायकर या आत्मघाती ड्रोनने भारत-पाक संघर्षात दमदार कामगिरी केली. अदाणी समुह ज्या आक्रमकतेने संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रात घुसतोय ते पाहून अनेकांना घाम फुटला आहे. गेल्या काही काळात संरक्षण क्षेत्रात त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे, अनेक कंपन्यांशी ते हातमिळवणी सुद्धा करतायत. भांडवलाची कमी नसल्यामुळे जगातील अनेक कंपन्या अदाणी समुहाशी हात मिळवणी करण्यास इच्छूक आहेत.

अदाणी डीफेन्स एण्ड एरोस्पेस या कंपनीने उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये स्फोटकांच्या निर्मितीसाठी दोन मोठे कारखाने सुरू करण्यासाठी गेल्या वर्षी ३६२ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. बंदूकीच्या गोळ्या आणि
तोफ गोळ्यांची भारताची २५ टक्के गरज हे कारखाने पूर्ण करणार आहेत. हे उत्पादन ५०० एकरांच्या निर्मिती संकूलात होणार आहे. दक्षिण आशियातील हे सगळ्यात मोठे कारखाने असतील.

इस्त्रायलच्या एलबिट सिस्टीमसोबत हातमिळवणी करून अदाणी समुह ड्रोन निर्मितीच्या क्षेत्रातही उतरला आहे. हैदराबादेत मनुष्यरहीत विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. टेहळणी आणि मारा करण्यासाठी दृष्टी या ड्रोनची निर्मिती
ही कंपनी कऱणार आहे. इस्त्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजची निर्मिती असलेल्या हॅरोप ड्रोनने ऑपरेशन सिंदूरमध्ये शानदार कामगिरी बजावली. या ड्रोनची निर्मिती भारतात करण्याचे कामही अदाणी समूह करतोय.

इस्त्रायलची आणखी एक कंपनी इस्त्रायल वेपन इंडस्ट्रीसोबत भारतात रायफल निर्मितीच्या क्षेत्रातही उतरली आहे. रॉकेट निर्मितीसाठी फ्रान्सच्या थेल्स समुहासोबत अदाणी समुह काम करणार आहे. हिंदुस्तान एरॉनॉटीक्स निर्मिती
प्रचंड आणि रुद्र या हेलिकॉप्टरसाठी ही ७० एमएमची रॉकेट्स बनवण्यात येणार आहे. यूएईच्या एड्ज समुहासोबतही संरक्षण निर्मितीच्या तंत्रज्ञानाबाबत अदाणी समुह काम करतो आहे.

पाणबुडी शोधक सोनाबुआ यंत्रणा निर्माण करण्यासाठी अमेरीकेच्या स्पार्टन या कंपनीसोबत अदाणी डिफेन्सने हात मिळवणी केली आहे. देशातील अनेक बंदरामध्ये अदाणी समुहाची गुंतवणूक आहे. विदेशात श्रीलंकेतील कोलंबो, टांझानियातील दार ए सलाम, इस्त्रायलमधील हायफा बंदर अदाणींकडे आहे. भारताच्या संरक्षण निर्मिती क्षेत्रातील बड्या कंपन्यंकडे नजर टाकली तर प्रत्येक मोठी कंपनी संरक्षण निर्मितीकडे वळते आहे. रिलायन्स, टाटा, महिंद्रा, एल एण्ड
टी, कल्याणी, गोदरेज, असे सगळे मोठे समुह संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहेत. या सगळ्यांच्या सहभागाने येत्या काही वर्षात भारता शस्त्रांचा एक प्रमुख निर्यातदार बनू शकतो. मग जगाची नजर फक्त अदाणी समुहावर का? असा
सवाल अनेकांना पडू शकतो. परंतु इतर कंपन्या आणि अदाणी समुहात एक मुलभूत फरक आहे. अदाणी समुह जे काही करतो आहे त्यात आक्रमकता असते. वेग असतो. हा वेग अनेकांना धडकी भरवतो.

दोन वर्षांपूर्वी अदाणी समुहाचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सुपारी घेतली होती. ते सतत अदाणी समुहाच्या विरोधात बोलत होते. त्यांचा एकूण अविर्भाव असा होता की, अदाणी हे व्यावसायिक नसून डाकू आहेत. त्यामुळे त्यांचे सगळे धंदे बंद करून त्यांना एखाद्या निर्जन बेटावर नजरकैदेत ठेवले पाहिजे. हे सगळे का घडत होते, याचा उलगडा आज होतो आहे. अदाणी समुह फक्त भारतातच नव्हे जागतिक स्पर्धेत उतरला आहे. बंदरे, विमानतळ अशी सगळीच क्षेत्र ज्याचे सामरीक महत्व आहे. जिथे महासत्तांचे लक्ष असते. तिथेही तीच आक्रमकता आहे. या वेगाने या आक्रमकतेने जर काम झाले तर अदाणी समूह संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रातील बड्या कंपन्यांना भविष्यात स्पर्धा निर्माण करू शकतो याची जाणीव जागतिक महासत्तांना आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा