30 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरसंपादकीयपिसाळलेल्या ममतांचे लोकशाहीवर विषारी फुत्कार...

पिसाळलेल्या ममतांचे लोकशाहीवर विषारी फुत्कार…

Google News Follow

Related

१५ वर्षांच्या सत्ताकाळात प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प.बंगालला अराजकाच्या वळणावर नेऊन ठेवले. पराभूत झाल्यानंतर त्या पिसाळल्या आहेत. सन्मानाने पायउतार व्हायचे सोडून त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. संविधान बचाओवाल्यांचा ना संविधानावर विश्वास उरला, ना देशावर. पराभवानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. भाजपा नेते शुभेंदु अधिकाऱ्यांचा खासगी सचिव चंद्रनाथ रथ याच्यासह दोन भाजपा कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. बांगलादेशातील कट्टरवादी ममतांना स्वातंत्र्य घोषित करण्याचे आव्हान करीत आहेत.

प.बंगालमध्ये निवडणूक हिंसाचाराची परंपरा भाजपाने मोडून काढली. परंतु पिसाळलेल्या तृणमूलच्या गुंडांनी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांचे बळी घेतले. न्यू टाऊन येथे मधू मोंडल या भाजपा कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सचिव चंद्रनाथ रथ यांनाही गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. ममतांचा भाचा अभिषेक बॅनर्जी याने रथ यांना जाहीरपणे धमकी दिली होती. बशीरहाटमध्ये रोहीत रॉय हा भाजपा कार्यकर्ता गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. ही उघड चिथावणी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपाच्या कार्यकर्त्यांचा हा रक्तपात आवरण्यासाठी नेमकी काय पावले उचलतात हे आता पाहावे लागेल.

निवडणुकीनंतर प.बंगालमध्ये मोठ्या संख्येने भाजपाच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचलेलेच होते. याचे पुरावे मिळत आहेत. अनेक ठिकाणी छापा मारून नंग्या तलवारी, ब़ॉम्ब हस्तगत करण्यात येत आहे. तृणमूलच्या कार्यालयातून पांढऱ्या साड्यांची बंडले सापडलेली आहेत. ही तृणमूलची धमकावण्याची खास पद्धत आहे. २०२४ मध्ये संदेशखालीतील भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी अशा प्रकारच्या साड्या पाठवण्यात आल्या होत्या. सोबत निरोप देण्यात आला होता. ‘तुम हरी कहो, मै हरी बोल कहूंगा…’ म्हणजे आपल्याकडे प्रेत यात्रेत ‘श्रीराम जयराम…’ बोलतात तसे बंगालमध्ये ‘हरी बोल…’ म्हणण्याची पद्धत आहे. या निरोपाचा अर्थ असा की आता नवऱ्याच्या नावाने कपाळाला लावलेले कुंकू पुसण्याची तयारी ठेवा.

हिंसाचाराच्या माध्यमातून तृणमूलचे गुंड दहशत माजवण्याचा प्रय़त्न करीत आहेत. केवळ एवढेच नाही. भारतीय लोकशाहीची बदनामी करण्याचा मनसुबाही खुद्द ममता बॅनर्जी यांनी जाहीर केला आहे.

‘जर या देशातील सर्वोच्च संस्था आणि आमची न्यायालये ९१ लाख मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करू शकली नाहीत, तर आम्हाला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे (International Court of Justice) दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय उरणार नाही. हा केवळ बंगालचा प्रश्न नसून लोकशाहीच्या हत्येचा जागतिक मुद्दा आहे. ९१ लाख लोकांचे मतदानाचे अधिकार हिरावून घेऊन तुम्ही लोकशाही जिंकल्याचा दावा कसा करू शकता? आम्ही हे प्रकरण ‘हेग’ (The Hague) पर्यंत नेऊ आणि जगाला दाखवून देऊ की भारतात निवडणूक कशा प्रकारे हायजॅक केली जाते हे जगाला दाखवून देऊ.’

पराभवानंतर ५ मे रोजी घेतलेल्या पहील्या पत्रकार परीषदेत ममता बॅनर्जी यांनी ही मुक्ताफळे उधळली होती. हा शुद्ध निलाजरेपणा आहे. भ्रष्टाचाराचे शेण ओरपल्यामुळे, मुस्लीम तुष्टीकरणामुळे, अकार्यक्षम कारभारामुळे सत्ता गमावल्याची या बाईला लाज नाही, उलट्या बोंबा ठोकण्याची हीचा कार्यक्रम सुरू आहे. देशाला बदनाम करायलाही ही मागे पुढे पाहाणार नाही, ते तिने स्पष्ट केले आहे.

ममता यांचा हेतू काही प्रमाणात सिद्ध झाला आहे, असे मानायला वाव आहे. द गार्डीयन, अल जझिरा या आंतरराष्ट्रीय मीडियातून ममता बॅनर्जी यांच्या विधानाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. पराभवाने तोंड काळे झालेल्या ममता जगाच्या हाती भारतविरोधी कोलीत देत आहेत.

ममतांच्या त्राग्याचे कारण समजून घ्या. या बाईला ठाऊक आहे की, फक्त सत्ता गमावली एवढाच या पराभवाचा अर्थ नाही. ही तर सुरूवात आहे. पुढे बरेच काही घडणार आहे. तृणमूलचे बरेच नेते आधीच शरणागती पत्करतायत. निवडणुकीच्या आधी शुभेंदु यांचा अर्वाच्य भाषेत उल्लेख करणाऱ्या तृणमूलच्या प्रवक्त्याला अचानक उपरती झाली असून ‘यापूर्वी मी जे काही तुमच्या विरोधात बोललो ते दबावापोटी होते. मला माफ करा’, अशी जाहीर माफी रिजू दत्ता या प्रवक्त्याने मागितली आहे.

वृत्तवाहिन्यांवर तृणमूलचे जोरदार समर्थन करणारा आणखी एक नेता तौसिफ खान याने रिपब्लिक भारतवर एका चर्चे दरम्यान ‘माझा तृणमूलशी संबंध नाही’ असे विधान करत कोलांटी मारलेली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्तेही टोपी बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. हे इतक्या मोठ्या प्रमाणात घडते आहे की, भाजपाचे प्रवक्ते देबजीत सरकार यांना जाहीरपणे सांगावे लागले की, भाजपाच्या संघटनेच्या परवानगी शिवाय कोणालाही पक्ष प्रवेश नाही. म्हणजे हाती भाजपाचा झेंडा घेतला म्हणून तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते बनत नाही. पक्ष संघटनेने तुम्हाला आधी आत येण्याची परवानगी दिली पाहीजे. ममता यामुळे हादरलेल्या आहेत. पक्ष फुटणार हे त्यांना स्पष्ट दिसते आहे. तृणमूलच्या अनेक खासदार, आमदारांचे भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांना फोन जातायत.

गेल्या १५ वर्षात झालेला भ्रष्टाचार, हत्या, गुंडगिरी प्रकरणात भाचा अभिषेक बॅनर्जी तुरुंगात जाणार हे निश्चित आहे. सचिवालयाच्या नबाना या इमारतीचाही केंद्रीय सुरक्षा दलांनी ताबा घेतला आहे. या घटनाक्रमामुळे ममता घायकुतीला आलेल्या आहेत.

ममता यांचा पराभव बांगलादेशलाही प्रचंड झोंबलेला आहे. बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार डॉ.खलिलुर रेहमान याने भारताला इशारा दिलेला आहे. ‘बंगाली मुस्लीमांना आमच्या सीमेत लोटू नका’. याला म्हणतात भिकाऱ्याला ओकाऱ्या. भारताच्या कृपेवर जगणारा हा देश उलटया बोंबा ठोकतो आहे. भाजपा सरकार सत्तेवर आले तर बांगलादेशींची परत पाठवणी सुरू होणार, ही काळ्या दगडावरची रेघ. म्हणून आधीत त्याने ‘तुमचे बंगाली भाषिक मुसलमान आमच्याकडे पाठवू नका’ असा इशारा दिलेला आहे. अल्लाच्या नावाने लोकसंख्या वाढवायची आणि ती पोसण्यासाठी भारतात पाठवायची असा हा मामला आहे. यांचा व्यवस्थित इलाज कऱण्याची गरज आहे.

ममता दुखावल्यात, बांगलादेशही घाबरलेला आहे. दोघांची हात मिळवणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या बाईला आपल्याच सरकारवर, न्यायालयावर विश्वास नाही. जी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याच्या धमक्या देते, ती काहीही करू शकते. ममता यांची ही मानसिकता तिथल्या कट्टरवाद्यांनाही ठाऊक आहे. ‘ममतांनी प.बंगाल हे स्वतंत्र राष्ट्र आहे, असे घोषित करावे, बांगलादेशातील १७ कोटी मुसलमान त्यांना पाठिंबा देतील’, अशी ऑफर बांगलादेशचा निवृत्त निवडणूक आयुक्त मोहमद नुरुल हुडा याने ममता यांना दिलेली आहे. बांगलादेशीचे धुण्याचे आणि पिण्याचे पाणीही भारतातून पुढे जाते, तरीही हे भिकारी भारतावर डोळे वटारण्याचा प्रयत्न करत असतात. १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने जे घाऊक बलात्कार केले, त्यातून जन्माला आलेली ही पिलावळ आहे.

ममता यांचा एकूण रागरंग पाहून केंद्र सरकारने यांचा व्यवस्थित बंदोबस्त केला पाहीजे. यापुढे आणखी बळी जाऊ नये अशी इच्छा असेल तर अभिषेक बॅनर्जी याला तात्काळ अटक केली पाहीजे. प.बंगाल भाजपाच्या विजयानंतर सुरक्षित झाला असे चित्र दिसायचे असेल तर भाजपाने कठोर उपाययोजना करायला हव्यात नाही तर प.बंगालमध्ये हिंसाचार थांबणार नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा