27.8 C
Mumbai
Saturday, August 15, 2026
घरसंपादकीयभूतकाळ पुसण्याची गरज काय? कुछ तो है जिसकी पर्दादारी है...

भूतकाळ पुसण्याची गरज काय? कुछ तो है जिसकी पर्दादारी है…

Google News Follow

Related

दी सरकारच्या अकाऊंटेबिलिटीवर वारंवार प्रश्नचिन्ह लावणारा कॉकरोच अभिजित दीपके स्वतःच्या भानगडी मात्र झाकताना दिसत आहे. त्याच्या एक्स (X) अकाऊंटमधील बराचसा डेटा त्याने साफ केल्याचे उघड झाले आहे. आधी आम आदमी पार्टीशी संबंध सांगणाऱ्या अकाऊंटचे नाव बदलण्यात आले, नंतर शेकडो पोस्ट्स डिलीट करण्यात आल्या. हे सगळे संशयास्पद आहे. ही साफसफाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. नवी ओळख निर्माण करून लोकांना बेवकूफ बनवण्यासाठी आधीचा इतिहास पुसून टाकणे हा यामागील इरादा असावा. दीपके या खेळातला एक मामूली मोहरा आहे; त्याचा पडद्यामागचा सूत्रधार खरा खेळ खेळतो आहे. बहोत कुछ है जिसकी पर्दादारी है.

सोशल मीडियावर अभिजित दीपकेचा पर्दाफाश करणाऱ्या पोस्ट्सची सध्या लाट आली आहे. सोशल मीडियावर माहितीचा पूर कायम असतो; त्यात खरी किती आणि खोटी किती, हे तपासणे महत्त्वाचे आहे. सॅण्ड्रा पारकर नावाचे एक एक्स अकाऊंट आहे. त्यात ती बाई म्हणते की, दीपके हा पॉर्नचा ॲडिक्ट असून त्याने एका पॉर्नसाईटचे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतले आहे. या बाईने असा दावा केला आहे की, तिचे अकाऊंट मास रिपोर्ट करण्यात आले. हा दावा खरा की खोटा, ते दीपकेच जाणे! या तपशिलाची खातरजमा करा, असे आव्हान या सॅण्ड्राबाईने दीपकेचे समर्थन करणाऱ्या अनेक इन्फ्लुएन्सर्सना दिले आहे. आम्ही सॅण्ड्रा यांच्या पोस्टचे ना समर्थन करत, ना खंडन.

सोशल मीडियावर देण्यात आलेले काही पुरावे नाकारणे दीपकेला जड जाणार आहे.

अभिजित मित्रा अय्यर, ऑफिस ऑफ विजय पटेल, स्टार बॉय तरुण अशा अनेक सोशल मीडिया हँडल्सनी कॉकरोच टोळीचे कपडे उतरवणाऱ्या पोस्ट्स केल्या आहेत. अनेकांनी असा दावा केला आहे की, दीपकेने त्याच्या एक्स अकाऊंटची साफसफाई केली आहे.

सोशल मीडियावर येणाऱ्या सगळ्याच पोस्ट्स तथ्यहीन आणि बिनबुडाच्या असतात असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. पोस्ट्स डिलीट केल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आम्ही @Grok लाच प्रश्न विचारला की, @abhijeet_dipke या एक्स अकाऊंटवरील काही पोस्ट्स डिलीट करण्यात आल्या आहेत का? या प्रश्नाचे मिळालेले उत्तर स्वयंस्पष्ट आहे.

२०१४ ते २०२० या कालावधीत दीपकेची एकही पोस्ट सापडत नाही; २०१७ मधील एकमेव पोस्ट दिसते. २०२१ नंतरच्या मात्र दरवर्षी हजारपेक्षा जास्त पोस्ट्स आहेत, हे ग्रोकचे उत्तर आहे. जो माणूस एका पक्षाचा सोशल मीडिया सांभाळायचा आणि ज्याचे ट्विटर अकाऊंट २०१४ पासून अस्तित्वात आहे, तो २०१४ ते २०२० या काळात एकही पोस्ट करत नाही (अपवाद फक्त २०१७ च्या एका पोस्टचा), असे कसे होऊ शकते?

डिलीट केलेल्या काही पोस्ट्समध्ये काय होते, हेही ग्रोकने उघड केले आहे.

काही पोस्ट्स सीएए (CAA) कायद्याच्या विरोधात आहेत: ‘धर्माच्या आधारे नागरिकत्व दिले जात असेल तर ते काढूनही घेता येते. हे विधेयक राज्यसभेत पास होण्याचा अर्थ फॅसिझमचा मार्ग मोकळा झाला आहे.’

‘नरेंद्र मोदी देश नही, आरएसएस संसद नही, मनुस्मृती संविधान नही.’

अमित शाह यांच्याबद्दल एक पोस्ट आहे: ‘धीस मॅन इज मोर डेंजरस दॅन नरेंद्र मोदी.’

आदित्य ठाकरेंबाबत एक पोस्ट आहे — तेच आदित्य ठाकरे जे अलीकडेच सौरव दास या कॉकरोच प्रवक्त्याला कडकडून भेटले. आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारलेला आहे: ‘आर यू पप्पू?’ पुढे म्हटले आहे: ‘एका बाजूला आरेतील एकही झाड पाडू देणार नाहीस असे तू म्हणतोस, तर दुसऱ्या बाजूला तुझे वडील मेट्रो भवनचे उद्घाटन करतायत; मुंबईकरांना वेडे समजता काय?’

कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्या पोस्ट्स आहेत, उमर खालिदचे समर्थन करणाऱ्या पोस्ट्स आहेत, तसेच शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट्स आहेत.

दीपकेच्या मूळ अकाऊंटची ओळख आम आदमी पार्टीशी संबंध स्पष्ट करणारी आहे. पूर्वी ते @aaptimist_ या नावाने होते. हे अकाऊंट २७ जानेवारी २०१४ पासून अस्तित्वात आहे आणि २०१९ पर्यंत ते वापरण्यात आले. दीपके जेव्हा शिक्षणाच्या नावाखाली बोस्टनमध्ये गेला, तेव्हा हे नाव बदलून आता अस्तित्वात असलेले @abhijeet_dipke हे अकाऊंट सुरू करण्यात आले. ज्या काळात दीपके अमेरिकेत होता, त्या काळातही त्याचे लोकेशन सतत बदलत असल्याचे त्याच्या झोमॅटोवरील पोस्ट्सवरून दिसते. काही वेळा तो भारतात मोहाली, गोवा, तर अनेकदा अमेरिकेत बोस्टनपासून खूप दूरवर असलेल्या भागात होता.

बोस्टनमध्ये त्याची रवानगी करण्यापूर्वीच एका नव्या खेळाची पटकथा तयार झाली होती. भारतात एक अमेरिका-प्रायोजित आंदोलन पेटवून दीपकेला या आंदोलनाचा चेहरा बनवण्याचे निश्चित झाले होते. दीपकेच्या एक्स अकाऊंटमधील पोस्ट्स त्यातला मोठा अडथळा होत्या. तो वर्षानूवर्षे आम आदमी पार्टीच्या पालख्या नाचवत होता, हे त्यावरून स्पष्ट होत होते. त्यामुळे एक्स अकाऊंटच्या कायापालटापासून या खेळाची सुरुवात झाली. सगळी तयारी झाली होती; केजरीवाल आणि कंपनी फक्त एका ठिणगीच्या शोधात होती. दीपके हा काही फार प्रसिद्ध आणि चर्चेतला चेहरा नव्हता, परंतु त्याच्या एक्स अकाऊंटवर केजरीवाल आणि कंपनीबाबतची निष्ठा अन् अर्बन नक्षल भूमिका स्पष्ट दिसत होती. जुन्या पोस्ट्स लोकांच्या नजरेत पडल्या असत्या तर सुरुवातीपासून हा केजरीवाल यांची धुणीभांडी करत होता हे उघड झाले असते. एका पक्षाशी बांधील असल्यामुळे अनेकांनी समर्थन करताना विचार केला असता.

आम आदमी पार्टीशी संबंध लपवणे कठीण आहे हे उघड झाल्यानंतर २०२० ते २०२३ या काळात तो आम आदमी पार्टीचे काम करत होता अशी कथा बनवण्यात आली. आधीचा इतिहास दडवण्यात आला, कारण त्यात अनेक देशविरोधी आणि हिंदूविरोधी पोस्ट्सची रेलचेल होती. २०२० ते २०२३ च्या पोस्ट्स बहुधा डिलीट करता आल्या नाहीत, किंवा डिलीट केल्या तर लोकांच्या सगळेच लक्षात येईल अशी भीती वाटल्यामुळे या पोस्ट्स ठेवण्यात आल्या असाव्यात.

ही लपवाछपवी फक्त दीपके करतो आहे अशातला भाग नाही. सौरव दासचे वेगळेच गौडबंगाल आहे. ग्रेटर कैलाशच्या आलिशान वस्तीतील बंगला कोणी स्पॉन्सर केला? त्याचा भाडेकरार गायब कसा झाला? भाडेकरू म्हणून सौरव दासचे पोलीस व्हॅलिडेशन/व्हेरीफिकेशन का टाळण्यात आले? सगळाच मामला गौडबंगाल आहे. सौरव दासच्या पुद्दुचेरी येथील घरी जेव्हा त्याच्याबद्दल माहिती घ्यायला पोलीस गेले, तेव्हा हा पुन्हा “सूड सूड” म्हणून ओरडायला लागला. पोलीस माहिती घेत आहेत, ते भारतातील पोलीस आहेत, शत्रू देशातील नाहीत. विचारतात ते सांग आणि मोकळा हो! परंतु सांगणे म्हणजे आफत ओढवून घेणे, म्हणून सगळी लपवाछपवी सुरू आहे. दिल्लीतील एका पार्कमध्ये अभिजित दीपके त्याच्या टोळीसह गेला होता; तिथे लोकांनी त्याला हुसकावून लावले.

आम आदमी पार्टीची दलाली कॉकरोच टोळीच्या रक्तात इतकी भिनली आहे की, पंजाबमध्ये फार्मसीचा पेपर लीक झाला हेच मुळात त्यांना मान्य नव्हते. मान्य केले असते तर मुख्यमंत्री भगवंत सिंह मान आणि तिथल्या शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करावे लागले असते; केले नसते तर जनतेने जाब विचारला असता. बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये झालेल्या फार्मसीच्या परीक्षेत पेपर फुटला होता, परंतु कॉकरोच मंडळी कानावर हात ठेवत होती. परीक्षेत घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना आता पंजाब उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संदीप मौडगिल यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने पुढील सुनावणीपर्यंत ४५४ फार्मसी ऑफिसर्सची भरती प्रक्रियाच स्थगित करण्याचा आदेश पंजाब सरकारला दिला आहे. जनहित याचिकेत प्रथमदर्शनी तथ्य आढळले नसते तर न्यायालयाने याचिकाच केराच्या टोपलीत फेकून दिली असती. घोटाळा झाला असा विश्वास पंजाब सरकारलाही आहे, म्हणूनच पंजाब पोलिसांनी याप्रकरणी २७ वायरलेस संच आणि पेन कॅमेरा जप्त केला आहे; २७ उमेदवारांसह ७ आरोपींना अटक केली आहे. तरीही कॉकरोच मंडळी पंजाब सरकारला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देत होती; कारण दीपके असो, दास असो वा आशुतोष रांका, हे सगळेच कधीकाळी केजरीवाल यांच्या पक्षासाठी काम करत होते. आज त्यांनी फक्त टोपी बदललेली आहे, परंतु त्यांचा चालक-मालक केजरीवालच आहे. दीपके केजरीवालइतकाच बोगस आहे. तो मालकाच्या काळ्या कारनाम्यांकडे दुर्लक्ष करणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भुंकत राहणार.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा