28.3 C
Mumbai
Friday, August 14, 2026
घरस्पोर्ट्समहिला हॉकी वर्ल्ड कपसाठी भारत सज्ज

महिला हॉकी वर्ल्ड कपसाठी भारत सज्ज

भारत कोणत्याही संघाला टक्कर देऊ शक

Google News Follow

Related

एफआयएच नेशन्स कपचे सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाचा आत्मविश्वास वाढला असून, हॉकी महिला विश्वचषक २०२६मध्ये कोणत्याही संघाला आव्हान देण्याची आमची क्षमता आहे, असा विश्वास अनुभवी गोलरक्षक सविता पूनियाने व्यक्त केला आहे.

सविता सलग तिसऱ्यांदा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्यासाठी हा विश्वचषक विशेष महत्त्वाचा आहे. यापूर्वीच्या दोन विश्वचषकांत भारताकडून खेळल्यानंतर आता तिसऱ्यांदा या मोठ्या व्यासपीठावर उतरणे ही अनेक वर्षांच्या मेहनतीची फलश्रुती असल्याचे तिने सांगितले.

सविताने ‘जिओस्टार’शी बोलताना सांगितले की, “विश्वचषकात खेळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा माझा तिसरा विश्वचषक आहे. हॉकीपटूसाठी विश्वचषक आणि ऑलिम्पिक ही दोन सर्वात मोठी व्यासपीठे आहेत. सलग तिसऱ्या विश्वचषकाचा भाग होणे ही मोठी उपलब्धी आहे.”

वरिष्ठ खेळाडू म्हणून संघाचे नेतृत्व करण्यासोबतच दबावाच्या परिस्थितीत शांत राहून सहकाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मदत करण्याचे लक्ष्य असल्याचेही सविताने सांगितले.

नेशन्स कपच्या सुवर्णपदकाने आत्मविश्वास उंचावला

एफआयएच नेशन्स कपमध्ये भारताने मिळवलेल्या यशामुळे संघाचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या स्पर्धेत जगातील अव्वल संघांचा सहभाग होता आणि अनेक कठीण सामन्यांनंतर भारताने सुवर्णपदक पटकावले.

अर्जेंटिना, नेदरलँड्स आणि जर्मनीसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध एफआयएच प्रो लीगमध्ये खेळलेल्या सामन्यांचाही भारताला मोठा फायदा झाला आहे.

सविता म्हणाली, “जगातील सर्व संघ वर्ल्ड-क्लास आहेत; पण असा एकही संघ नाही ज्याचा आम्ही सामना करू शकत नाही. आमच्याकडे स्किल, फिटनेस आणि योग्य मानसिकता आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी आम्ही कोणत्याही संघाला आव्हान देऊ शकतो.”

पोडियमवर पोहोचण्याचे लक्ष्य

विश्वचषकातील प्रत्येक संघ मजबूत असल्याने कोणताही सामना सोपा नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचे लक्ष प्रतिस्पर्ध्यापेक्षा स्वतःच्या खेळावर आणि आखलेल्या रणनीतीवर राहणार आहे.

“आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने विश्वचषकात जात आहोत. जर आम्ही आमच्या ताकदीनुसार खेळलो आणि आमच्या योजनांवर ठाम राहिलो, तर पोडियमपर्यंत पोहोचण्याची आमच्याकडे चांगली संधी आहे,” असे सविताने म्हटले.

फिटनेस आणि रिकव्हरीची जबाबदारी खेळाडूंचीच

भारतीय महिला हॉकी संघाच्या तयारीच्या पद्धतीतही बदल झाला आहे. आता खेळाडू केवळ प्रशिक्षकांच्या सूचनांवर अवलंबून न राहता स्वतःच्या फिटनेस, रिकव्हरी, आहार आणि दुखापत टाळण्याची जबाबदारी घेत आहेत.

गोलरक्षक म्हणून सविता आणि तिच्या सहकाऱ्यांना आठवड्यातून तीन ते चार अतिरिक्त सराव सत्रे करावी लागतात. मात्र, मोठ्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ही मेहनत आवश्यक असल्याचे तिने सांगितले.

स्किल, फिटनेस आणि योग्य विचारसरणीच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकात मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा